शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

तापाने वाढविला मनस्ताप; कोविड लसीकरणाला लागतोय ब्रेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2021 05:00 IST

तापाने लाभार्थ्यांचा मनस्ताप वाढविला असून, त्याचा परिणाम लसीकरण मोहिमेवरही होत आहे. उसंत घेत सुरू असलेल्या पावसाने विश्रांती घेतली असली तरी वातावरणातील बदलामुळे जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागात व्हायरल फ्लू, तसेच डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढला आहे. प्रत्येक घरी ताप-सर्दी-खोकल्याचे रुग्ण कमी-अधिक प्रमाणात असून, शासकीय आणि खासगी रुग्णालयांमध्ये रुग्णांची गर्दी होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागात नवीन कोविडबाधित सापडण्याची गती बऱ्यापैकी मंदावली असली तरी सध्या डेंग्यू व व्हायरल फ्लूने चांगलेच डोके वर काढल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा पहिला किंवा दुसरा डोस घेऊ इच्छिणाऱ्या अनेकांना तापाची लागण झाल्याने नेमकी लस केव्हा घ्यावी, असा प्रश्न लाभार्थ्यांना सतावत आहे. एकूणच तापाने लाभार्थ्यांचा मनस्ताप वाढविला असून, त्याचा परिणाम लसीकरण मोहिमेवरही होत आहे. उसंत घेत सुरू असलेल्या पावसाने विश्रांती घेतली असली तरी वातावरणातील बदलामुळे जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागात व्हायरल फ्लू, तसेच डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढला आहे. प्रत्येक घरी ताप-सर्दी-खोकल्याचे रुग्ण कमी-अधिक प्रमाणात असून, शासकीय आणि खासगी रुग्णालयांमध्ये रुग्णांची गर्दी होत आहे. याच पार्श्वभूमीवर सध्या जिल्ह्यात कोविड लसीकरण मोहिमेला गती दिली जात आहे; परंतु ताप-सर्दी-खोकल्याची लागण झाल्याने कोरोना प्रतिबंधात्मक लस घ्यावी की नाही, शिवाय कोविडची लस नेमकी केव्हा घ्यावी, असा प्रश्न लाभार्थ्यांना सतावत आहे. अशातच सोशल मीडियावर काही गैरसमज पसरविले जात असल्याने याचा थेट परिणाम काेविड लसीकरण मोहिमेवर होत आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनातील आरोग्य यंत्रणेकडून कोविड लसीकरणाबाबत आणखी जनजागृती करण्याची गरज आहे.

काय म्हणतात वैद्यकीय तज्ज्ञअंगात ताप असताना रुग्णाने कोविडची लस घेतल्यास काही गुंतागुंत होण्याची शक्यता असते. त्यामुळे तापाची लागण झालेल्या रुग्णाने ताप उतरल्यावर किमान पाच दिवसांनी कोविड प्रतिबंधात्मक लस घ्यावी. लस घेतल्यावर ताप येणे हे लसीचा सौम्य प्रतिकूल प्रतिसाद असतो. त्यामुळे लाभार्थ्यांनी घाबरण्याचे कारण नाही, असे जिल्हा माता व बालसंगोपन अधिकारी डॉ. प्रभाकर नाईक यांनी सांगितले.

३० दिवसांत झाली १२९ नव्या डेंग्यूबाधितांची नोंदजिल्ह्यात आतापर्यंत ३८९ डेंग्यूबाधितांची नोंद घेण्यात आली आहे. यात २१२ पुरुष, तर १७७ महिलांचा समावेश आहे. असे असले तरी सप्टेंबर महिन्यात जिल्ह्यात तब्बल १२९ नवीन डेंग्यूबाधित आढळले आहेत. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने अधिक दक्ष राहण्याची गरज आहे.

बडे अधिकारी जाताहेत गावागावातजिल्ह्यातील एकही लाभार्थी कोविड प्रतिबंधात्मक लसीपासून वंचित राहू नये, तसेच वर्धा जिल्हा १०० टक्के व्हॅक्सिनेट व्हावा या हेतूने जिल्हा प्रशासनातील बडे अधिकारी जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार, जि.प.चे मुख्य कार्यपालन अधिकारी डॉ. सचिन ओंबासे यांच्या मार्गदर्शनात गावागावात जाऊन जनजागृती करीत आहेत.

 

टॅग्स :dengueडेंग्यूCorona vaccineकोरोनाची लस