शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

शबरी आवास योजनेच्या लक्ष्यांकात वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2018 22:34 IST

आदिवासी विकास महामंडळाद्वारे अनेक योजना राबविल्या जातात; पण लक्ष्य कमी असल्याने गरजूंना लाभापासून वंचित राहावे लागते. आदिवासींकरिता असलेल्या शबरी आवास योजनेचे लक्ष्यांकही शासनाने यावर्षी अत्यल्प केले होते. परिणामी, लाभार्थ्यांना वंचित राहावे लागले असते.

ठळक मुद्देलाभार्थ्यांना दिलासा : जि.प. अध्यक्षांचा पाठपुरावा

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : आदिवासी विकास महामंडळाद्वारे अनेक योजना राबविल्या जातात; पण लक्ष्य कमी असल्याने गरजूंना लाभापासून वंचित राहावे लागते. आदिवासींकरिता असलेल्या शबरी आवास योजनेचे लक्ष्यांकही शासनाने यावर्षी अत्यल्प केले होते. परिणामी, लाभार्थ्यांना वंचित राहावे लागले असते. ही बाब लक्षात घेत पाठपुरावा केल्याने लक्ष्यांक दीड पट वाढविण्यात आले. पूर्वी १०० असलेले लक्ष्यांक आता २४५ झाले. यामुळे लाभार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत येणाºया सर्व योजनांचे उद्दीष्ट शासनाकडून वाढवून देण्यात आले आहे. वर्धा जिल्ह्याला शबरी आवास योजनेचे २०१६-१७ मध्ये ३०२ एवढे उद्दिष्ट देण्यात आले आहे. वर्धा जिल्हा परिषदेने ते पूर्ण करीत सर्व लाभार्थ्यांना आवास योजनेंतर्गत घर, निधीचे वाटप केले. यंदा तो लक्ष्यांक वाढवून मिळेल, अशी अपेक्षा असताना केवळ १०० आवास एवढे उद्दिष्ट देण्यात आले होते. यामुळे अनेक लाभार्थी वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली होती. यावरून आ. समीर कुणावार, जि.प. अध्यक्ष नितीन मडावी तथा जि.प. सदस्य शरद सहारे यांनी लक्ष्यांक वाढवून देण्याची मागणी केली. यासाठी आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा, प्रधान सचिव, मुख्य सचिव तथा सचिवांना निवेदन देण्यात आले होते. याची दखल घेत आदिवासी विकास मंत्रालयाकडून लक्ष्यांक वाढवून देण्यात आले आहे. आता जिल्ह्याला २४५ एवढे लक्ष्यांक देण्यात आले आहे. यामुळे लाभार्थ्यांना या योजनेत सामावून घेणे शक्य होणार आहे.शबरी आवास योजना गरजू आदिवासी समाजातील लाभार्थ्यांना घरकूल उपलब्ध करून देण्यासाठी राबविली जात आहे. आदिवासी विकास महामंडळाकडून आदिवासी विकास प्रकल्प नागपूर यांच्या अंतर्गत या योजनेचे कार्यान्वयन केले जाते. गरजू लाभार्थ्यांची त्यांच्या पात्रतेनुसार निवड करून शबरी आवास योजनेचा लाभ दिला जातो. आता लक्ष्यांक वाढल्याने जिल्ह्यातील गरजू आदिवासी लाभार्थ्यांना घरकूल उपलब्ध होणे शक्य होणार आहे.योजनेसाठीचे निकष व निधीशबरी आवास योजनेचा लाभ घेण्याकरिता लाभार्थी अनुसूचित जमातीचा असावा. लाभार्थी दारिद्र्य रेषेखालील असावा तथा त्याच्याकडे स्वत:ची जागा असावी, असे निकष देण्यात आलेले आहेत. हे निकष पूर्ण करणारे व्यक्ती शबरी आवास योजनेचा लाभ घेऊ शकतात. या योजनेतील घरकूलासाठी शासनाकडून प्रत्येकी १ लाख २० हजार रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला जातो.मागील वर्षी ३०२ चे लक्ष्यांक पूर्ण केले असता यावर्षीसाठी १०० एवढेच उद्दिष्ट देण्यात आले होते. याबाबत आ. समीर कुणावार, जि.प. सदस्य शरद सहारे व मी स्वत: आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांना भेटून निवेदन दिले. लक्ष्यांक चारपट करण्याची मागणी केली. याची दखल घेत किमान दीडपट वाढ करून देत २४५ लक्ष्यांक देण्यात आले आहे.- नितीन मडावी, अध्यक्ष, जिल्हा परिषद, वर्धा.