शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

पीक कर्जावरील तारण मर्यादा वाढवा

By admin | Updated: July 7, 2015 01:42 IST

गत तीन वर्षांपासून शेतपिकांवर नैसर्गिक आपत्ती आली. यामुळे शेतकरी भयंकर आर्थिक अडचणीत आहे.

मागणी : लाखोंच्या दरातील शेतीवर अल्प कर्जवर्धा : गत तीन वर्षांपासून शेतपिकांवर नैसर्गिक आपत्ती आली. यामुळे शेतकरी भयंकर आर्थिक अडचणीत आहे. यावर उपाय म्हणून कर्जाचे पुनर्गठण करण्यात येत आहे; पण यात कर्जमर्यादा शेतकऱ्यांना सुलभ कर्ज भरण्याच्या सवलतीपासून वंचित ठेवत असल्याचे दिसते. यामुळे पीक कर्जावरील तारण मर्यादा वाढविणे गरजेचे झाले आहे.दुष्काळी स्थितीत शेतकऱ्यांना दिलासा देण्याकरिता पीक कर्जाचे पुर्नगठन करण्याचे आदेश शासनाने बँकांना दिले; पण त्यात शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. यात विना तारणखत (मॉरगेज) ची मर्यादा ही एक लाख रुपये आहे. यामुळे नियमानुसार बँका पुनर्गठण करू शकत नाही. परिणामी, शेतकऱ्याला पीक कर्ज मिळण्यास अडचणीचे होत आहे. शेतकऱ्यांना मागील वर्षी दोन वेळा कर्ज देण्यात आले. पीक कर्जासह तात्काळ कर्जही बँकांनी शेतकऱ्यांना वितरित केले. दोन कर्ज आणि त्यावरील व्याजाची रक्कम ही एक लाखाच्या वर जात आहे. एक लाखावरील कर्जाचे पुनर्गठण करताना बँकांना गहाणखत करून देणे बंधनकारक आहे. यामुळे बोटावर मोजण्याइतपत शेतकऱ्यांनाच कर्ज पुनर्गठण योजनेचा लाभ मिळत असल्याचे वास्तव आहे. गहाणखत प्रक्रियेसाठी १० ते २० हजार रुपयांचा खर्च करावा लागत आहे. यात शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे शासनाने मॉरगेजची मर्यादा एक लाखाहून पाच लाखांपर्यंत वाढवावी, अशी मागणी सुकळी (बाई) येथील नारायण पोकळे यांनी केली आहे.(कार्यालय प्रतिनिधी)असे होतात कर्जाचे हप्ते२०१४-१५ या वर्षात एका शेतकऱ्यास ९० हजार रुपये पीक कर्ज देण्यात आले. यात व्याज आणि त्यानंतर ४० हजार रुपयांचे तात्काळ कर्ज देण्यात आले. यामुळे शेतकऱ्याकडे एकूण १ लाख ४ हजार रुपयांचे कर्ज थकित झाले. या कर्जाचे पाच हप्ते केले तर २८ हजार रुपयांचा पहिला हप्ता शेतकऱ्यास भरावा लागेल. ही रक्कम अदा केल्यानंतर शेतकऱ्याकडे १ लाख १२ हजारांचे कर्ज शिल्लक राहते. हे कर्ज एक लाखाच्या वर असल्याने बँकेच्या नियमानुसार मॉरगेज करावे लागते. मॉरगेजचा खर्च १० ते १५ हजार रुपये आहे. सध्या शेतकरी हा खर्च करू शकत नाही. यामुळे मॉरगेजची मर्यादा एक लाखांवरून पाच लाखापर्यंत करावी. हे केल्यास शेतकऱ्यांना पीक कर्ज घेणे शक्य होणार आहे. यामुळे शासन व बँकांनी याकडे लक्ष देणे गरजेचे झाले आहे.