शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

गाव नाल्यावरील पुलाची उंची वाढवा

By admin | Updated: May 23, 2017 01:08 IST

हमदापूर येथील गाव नाल्यावरील पूल ठेंगणा आहे. त्यामुळे या पुलाची उंची वाढविण्याची मागणी होत आहे.

प्रशासनाचे दुर्लक्ष : पावसाळ्यापूर्वी काम करण्याची मागणीलोकमत न्यूज नेटवर्कसेवाग्राम : हमदापूर येथील गाव नाल्यावरील पूल ठेंगणा आहे. त्यामुळे या पुलाची उंची वाढविण्याची मागणी होत आहे. मात्र ही मागणी अनेक वर्षांपासून प्रलंबीत असून येथील नागरिकांना पावसाळ्यात पुराच्या पाण्याचा त्रास सहन करावा लागतो. येथील ग्रामपंचायतने प्रशासनाकडे प्रस्ताव पाठविला मात्र येथील पुलाची उंची वाढविण्याचे काम अद्याप सुरू झालेले नाही.पावसाळा सुरू होण्यास काही दिवस शिल्लक असताना अद्याप या मागणीकडे प्रशासन गांभिर्याने लक्ष देत नसल्याने ग्रामस्थांत संताप व्यक्त होत आहे. सेवाग्राम-कांढळी या मार्गावर हमदापूर हे गाव आहे. येथे आठवडी बाजार, शाळा, अधिकोष, प्राथमिक आरोग्य केंद्र आदी सुविधा असून परिसरातील २२ येथे गावे येथे जोडली आहे. या गावांचा हमदापूर येथे नियमीत संपर्क येतो. मुख्य मार्गावर हा पूल असल्याने कामानिमित्त आलेल्या नागरिकांना ये-जा करण्यास अडचणीचे ठरते. हमदादपूर गावात जाण्यासाठी नाला ओलांडून जावे लागते. या नाल्यावर ढोल्यांचा वापर करुन त्यावेळी पूल बांधण्यात आला. मात्र उंची कमी असल्याने पावसाळ्यात या नाल्याला कायम पूर असतो. पाणी पुलावरुन वाहते. अशावेळी आवागमन करणे कठीण होते. त्यामुळे ग्रामस्थांना देर्डा चौकातील रस्त्याने जावे लागते. हा मार्ग जास्त अंतराचा आहे. अल्पशा पावसानंतर पुलावरुन पाणी वाहते. त्यामुळे पूर ओसरेपर्यंत ग्रामस्थांना प्रतीक्षा करावी लागते. येथील नाल्याचे खोलीकरण करण्यात येत असून संरक्षण भिंतीचे काम सुरू केले आहे. यासोबत पुलाची उंची वाढविण्याचे काम करण्याची मागणी ग्रामस्थांची आहे. पावसाळा सुरू होण्यापूर्वी बांधकामाला प्रारंभ केल्यास ग्रामस्थांना दिलासा मिळेल. समस्येचे स्वरुप पाहता या मागणीकडे लक्ष देणे गरजेचे ठरत आहे.