लोकमत न्यूज नेटवर्कहिंगणघाट : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी स्वाभिमान योजनेच्या कर्जमाफी यादीतून नावे सुटलेल्या शेतकऱ्यांची नावे कर्ज वितरणाच्या यादीत समाविष्ट करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे.हिंगणघाट विधानसभा क्षेत्रातील हिंगणघाट, समुद्रपूर, सेलू तालुक्यातील शेतकºयांना पिक कर्जाचे वाटप त्वरीत करण्यात यावे या मागणीचे निवेदन माजी आमदार राजू तिमांडे यांच्या नेतृत्वात राकाँच्या शिष्टमंडळाने उपविभागीय अधिकाºयांना दिले. पिक कर्ज वितरणात विदर्भ माघारलेला असून १० हजार ८० कोटीचे उद्दीष्ट असताना केवळ ४ हजार कोटी रूपये कर्ज वाटप झाले आहे. वर्धा जिल्ह्यात ८५० कोटीचे उद्दीष्ट असताना केवळ ५० कोटी रूपयाचे वाटप करण्यात आले. शेतकºयांना वारंवार बँकेत येरझारा घालाव्या लागत आहे. असेही राकाँने म्हटले आहे.निवेदन देताना गजानन गलांडे, अमोल गायकवाड, अनंता बोबडे, गजानन सातपुते, ऋषी थूल, गजानन बोबडे, मधुकर कुटे, केशव बुरीले, संभाजी देवढे, कविता वानखेडे, सुधीर सायंकार, राहुल दौलतकर, बाळा दौलतकर आदी उपस्थित होते.
कर्जमाफीतून नाव सुटलेल्यांची नावे यादीत समाविष्ट करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2018 00:41 IST
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी स्वाभिमान योजनेच्या कर्जमाफी यादीतून नावे सुटलेल्या शेतकऱ्यांची नावे कर्ज वितरणाच्या यादीत समाविष्ट करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे.
कर्जमाफीतून नाव सुटलेल्यांची नावे यादीत समाविष्ट करा
ठळक मुद्देराकाँची मागणी : मुख्यमंत्र्यांना निवेदन