शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

बौद्ध धम्म परिषदेचे थाटात उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2017 23:56 IST

येथील डॉ. आत्मारामजी उपाख्य बाबूजी जवादे स्मृती परिसरामध्ये द्विदिवसीय बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले असून शनिवारी उद्घाटनपर कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात धम्मध्वज ध्वजारोहण व बुद्ध वंदना भदंत सत्यानंद महाथेरो येणाळा, अरण्यवास यांच्या हस्ते करण्यात आले.

ठळक मुद्देविविध विषयांवर चर्चा : संघटनात्मक कार्यावर देणार भर

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगणघाट : येथील डॉ. आत्मारामजी उपाख्य बाबूजी जवादे स्मृती परिसरामध्ये द्विदिवसीय बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले असून शनिवारी उद्घाटनपर कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात धम्मध्वज ध्वजारोहण व बुद्ध वंदना भदंत सत्यानंद महाथेरो येणाळा, अरण्यवास यांच्या हस्ते करण्यात आले.व्यासपीठावर भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष अशोक आंबेडकर, माजी उपजिल्हाधिकारी अशोक गेडाम, शिक्षण महर्षी जयानंद खडसे, प्राचार्य आर. के. पाटील, उपप्राचार्य गुडधे, पर्यवेक्षक दिनेश वाघ, सुधीर राऊत, बन्सोड, देवतळे, रुईकर आदींची उपस्थिती होती.त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शहरातील पुतळ्याला माल्यार्पण करण्यात आले. शालेय विद्यार्थ्यांनी बुद्धवंदना व नृत्य सादर केले. धम्म परिषदेचे उद्घाटन अनिल जवादे यांनी केले. उपस्थित पाहुण्यांचे स्वागत माजी प्राचार्य गोरख भगत यांच्या हस्ते करण्यात आले. सर्वप्रथम गोरख भगत यांनी दैनंदिन जीवनातील अनुभव सांगितले. तसेच डॉ. आंबेडकर यांच्या विचारातून स्थापन केलेल्या समता सैनिक दल, आरपीआयची आजची दिशा आणि दशा या विषयावर माहिती दिली.मार्गदर्शन करताना अनिल जवादे यांनी डॉ. आंबेडकर यांनी बौद्ध दिक्षा घेतलेल्या नागपूरच्या दीक्षा भूमीला बौध्द धम्मपिठ स्थापनेत बौद्ध संघाने पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले. कार्यक्रमातील विशेष अतिथी सेवानिवृत्त सनदी अधिकारी ई. झेड. खोब्रागडे यांनी बौद्धधम्मा पुढील आव्हाने यावर माहिती दिली. शिवाय पंचशीलाचे आचरण करावे स्पष्ट केले. प्राचार्य शेंडे यांनी एकविसाव्या शतकात संपूर्ण भारत बौद्ध मय होईल, असे सांगितले. सत्कारमूर्ती राजरत्न आंबेडकर यांनी सत्काराला उत्तर देताना सांगितले की, आम्ही दलित व नवबौद्ध नसून आम्ही केवळ बौद्ध आहोत, असे सांगत विषयाला अनुसरून मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष भदंत आनंद महाथेरो (आग्रा) यांनी राजकीय पक्ष स्वार्थासाठी बौद्ध बांधवांचा कसा वापर करतात हे स्पष्ट केले. सांकृतिक कार्यक्रमाने धम्म परिषदेच्या पहिल्या दिवसाचा समारोप झाला. या धम्म परिषदेला शहरासह परिसरातील बौद्ध बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. परिषदेचा समारोप रविवारी होणार आहे.