फेऱ्या वाढविण्याची मागणी मोझरी (शेकापूर) : महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाची बस ही प्रवाशांच्या सोयीसाठी की असुविधेकरिता असा प्रश्न येथील प्रवाशांना पडला आहे. ग्रामीण भागातील जनतेच्या प्रवासाची मुख्य वाहिनी असलेल्या बसने या परिसरातून मोठ्या प्रमाणात विद्यार्थी व प्रवासी ये-जा करतात. मात्र बसफेरींची मर्यादित संख्या पाहता येथील प्रवाशांची ताटकळ होते. मोझरी (शेकापूर) येथून दररोज मोठ्या प्रमाणात विद्यार्थी, कर्मचारी, व्यापारी कामानिमित्त वर्धा, हिंगणघाट येथे ये-जा करतात. मोठ्या संख्येने बसने प्रवास करणारे प्रवासी असताना वर्धा आगारातून वर्धा-वरूड व वर्धा-साती अशा दोनच बसफेऱ्या आहे. तसेच हिंगणघाट आगारातून हिंगणघाट-पोटी-साती अशा मोजक्या बसफेऱ्या मोझरीमार्गे ये-जा करतात. त्यामुळे येथील प्रवाशांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागतो. मोझरी (शे.) स्थानकावर प्रवाशांची संख्या मोठी आहे. त्यामुळे अनेकांना बसमध्ये चढता येत नाही. खासगी वाहनाने प्रवास करणे धोक्याचे असून खर्चिक ठरत आहे.(वार्ताहर)
अपुऱ्या बसफेऱ्यांचा प्रवाशांना फटका
By admin | Updated: August 12, 2016 01:50 IST