शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

शकुंतला रेल्वेला अर्थसंकल्पात वाटाण्याच्या अक्षता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2022 05:00 IST

सध्या रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे  महाराष्ट्राचे असल्याने आता तरी या गाड्यांचे चांगले दिवस येतील, अशी आशा होती, पण ती फोल ठरली. शकुंतला रेल्वे विकसित करून चालू केल्यास सामान्य जनतेची सोय होऊन केंद्र शासनाला आर्थिक लाभ होईल. पण याकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते. २०१४ च्या निवडणुकीत दिलेले वचन हे सरकार विसरले असल्याचा आरोप शकुंतला रेल्वे मुक्ती व विकास परिषदेने केला आहे.

फनिन्द्र रघाटाटेलोकमत न्यूज नेटवर्करोहणा : २०२०-२१ च्या अर्थसंकल्पात तत्त्वतः मान्यता दिलेल्या विदर्भातील तिन्ही शकुंतला रेल्वे मार्गाच्या विकासासाठी अर्थसंकल्पात कोणतीच आर्थिक तरतूद न केल्याने याहीवर्षी शकुंतलेची चाके जागीच राहणार असल्याची भावना शकुंतला रेल्वे मुक्ती व विकास संघटनेने केली आहे.  मागील १५ वर्षांपासून विदर्भातील आर्वी पुलगाव, अचलपूर परतवाडा, ब्रह्मपुरी नागभीड या तिन्ही शकुंतला रेल्वे बंद स्थितीत आहेत.  २०१६ मध्ये या रेल्वे ब्रिटिशांच्या मालकीतून मुक्त झाल्या आहेत. तेव्हापासून या रेल्वेचे नॅरोगेजमधून ब्राॅडगेजमध्ये परिवर्तित करून ती सुरू करावी म्हणून या मार्गावरून वाहतूक करणाऱ्या नागरिकांची मागणी आहे.काँग्रेसच्या काळात या सर्व गाड्या आर्थिक तोट्यात असतात हीच मानसिकता सरकारची होती. पण नंतर  भाजपच्या काळात या रेल्वे विकसित करून सुरू करण्यासाठी प्रयत्न झाला. त्यानिमित्ताने सर्व्हेदेखील केला. या तिन्ही मार्गाच्या विकास कामाला तत्त्वतः मान्यता दिली, पण त्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली नाही. यासाठी निधीची तरतूददेखील झाली नाही. यावरून याही सरकारची या गाड्यांबाबत उदासीनता लक्षात येते. सध्या रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे  महाराष्ट्राचे असल्याने आता तरी या गाड्यांचे चांगले दिवस येतील, अशी आशा होती, पण ती फोल ठरली. शकुंतला रेल्वे विकसित करून चालू केल्यास सामान्य जनतेची सोय होऊन केंद्र शासनाला आर्थिक लाभ होईल. पण याकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते. २०१४ च्या निवडणुकीत दिलेले वचन हे सरकार विसरले असल्याचा आरोप शकुंतला रेल्वे मुक्ती व विकास परिषदेने केला आहे. विदर्भातील  लोकप्रतिनिधींनी  पुरवणी मागण्यांच्या वेळी या रेल्वेसाठी आर्थिक तरतूद करावी,   कामाला  सुरुवात करावी, अशी मागणी शकुंतला रेल्वे मुक्ती  विकास परिषदेने  केली   आहे.

 

टॅग्स :Shakuntala Trainशकुंतला रेल्वे