शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर निवडणूक विभागाची तयारी जोरात

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2024 15:32 IST

जिल्ह्यात ११.१९ लाख मतदार : २५ हजार ६७५ नवीन मतदार वाढले

लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : आगामी विधानसभेच्या निवडणुकीची तयारी जिल्हा प्रशासनाकडून सुरू करण्यात आली आहे. याचा महत्त्वाचा भाग म्हणून चारही विधानसभा क्षेत्राची अंतिम मतदार यादी जाहीर करण्यात आली आहे. जाहीर मतदार यादीनुसार चारही विधानसभा क्षेत्रात २५ हजार ६७५ हजार मतदार वाढले आहे. आचारसंहितेच्या पार्शभूमीवर निवडणूक विभागाने तयारी सुरू केली आहे. चार विधानसभा क्षेत्रांत एकूण ११ लाख १९ हजार मतदार हक्क बजावणार आहे.

येत्या काळात राज्यात विधानसभेची सार्वत्रिक निवडणूक होणार आहे. त्यामुळे विविध राजकीय पक्षाचे पुढारी व त्यांचे कार्यकर्ते कामालाही लागले आहे. विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाकडून जाहीर होताच आदर्श आचारसंहिता लागू होणार आहे. त्यामुळे निवडणुकीचा कार्यक्रम केव्हा जाहीर होतो याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. 

जिल्हा प्रशासनाने निवडणुकीची तयारी म्हणून मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनर्निरीक्षण कार्यक्रम हाती घेतला होता. अंतिम मतदार यादी जाहीर केली. अंतिम मतदार यादीनुसार वर्धा विधानसभा मतदार क्षेत्रात २लाख ९० हजार २५८ मतदार आहे. यात १ लाख ४५ हजार ६४७ महिला, १ लाख ४४ हजार ५९९ पुरुष तर १२ इतर मतदारांचा समावेश आहे. हिंगणघाट विधनसभा मतदार क्षेत्रात २ लाख ९४हजार ६२९ मतदार, देवळी विधानसभा मतदार क्षेत्रात २ लाख ७१ हजार ७६९ मतदार आहेत. आर्वी विधानसभा मतदार क्षेत्रात २ लाख ६२ हजार ७५५ मतदार आहे. 

९ हजार १९२ पीव्हीटीजी मतदार भटक्या-विमुक्त जमातींच्या व असंरक्षित आदिवासी गट समाजाची मतदार नोंदणी व्हावी या हेतूने। जिल्ह्यात विशेष मतदान नोंदणी शिबिर घेण्यात आले. जिल्ह्यातील ८५ गावांत ४ हजार ३३० मतदार असून नवीन १०८ मतदारांची नोंदणी करून घेण्यात आली आहे. जिल्ह्यातील चारही विधानसभा क्षेत्रात एकूण ९जार १९२ पीव्हीटीजी मतदारांची नोंद घेण्यात आली आहे. 

८,७६२ दिव्यांगाची नोंद जिल्ह्यात ८ हजार ७६२ दिव्यांग मतदारांनी त्यांचे नावासमोर मतदार यादीमध्ये अपंगत्वाची नोंद केली आहे. नवमतदारांची मोठ्या संख्येने नोंदणी व्हावी यासाठी महाविद्यालयीन स्तरावर विशेष शिबिरे घेण्यात आली. याच शिबिरांच्या माध्यमातून १६३४ नवमतदारांची नोंदणी करण्यात आली. अंतिम मतदार यादीनुसार १८ ते १९ वयोगटातील मतदारांची २.१९ टक्क्यांनी वाढ झाली आहे

 

टॅग्स :wardha-acवर्धा