शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

अवघ्या बारा दिवसात सोन्याच्या भावात तब्बल दोन हजारांची तेजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2022 05:00 IST

रशिया आणि युक्रेन यांच्यात तणाव वाढत आहे. इतकेच नव्हे तर अमेरिकेने या प्रकरणात हस्तक्षेप करण्यास सुरुवात केली आहे. याचा थेट परिणाम सोन्याच्या दरावर पडला असून शुक्रवारी ४८ हजार ९०० रुपयांवर पाहिलेल्या सोन्याचे दर शनिवारी थेट ४९ हजार ९०० वर पोहोचले. ३१ जानेवारीला सोन्याचे दर प्रती तोळा ४८ हजार रुपये होता. तर शनिवार १२ फेब्रुवारीला सोन्याचा प्रती तोळा भाव ४९ हजार ९०० रुपये राहिला. एकूणच मागील बारा दिवसांच्या काळात सोन्याच्या दरात दोन हजारांची तेजी आली आहे.

महेश सायखेडेलोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : मागील दोन दिवस ४८ हजार ९०० रुपयांवर स्थिरावलेल्या सोन्याच्या दरात शनिवारी तब्बल एक हजारांनी तेजी आली आहे. शनिवारी सोन्याचा भाव ४९ हजार ९०० रुपये प्रती तोळा (दहा ग्रॅम) राहिला. विशेष म्हणजे मागील बारा दिवसांच्या काळात सोन्याच्या भावात दोन हजारांची तेजी आली आहे. रशिया आणि युक्रेन यांच्यात तणाव वाढत आहे. इतकेच नव्हे तर अमेरिकेने या प्रकरणात हस्तक्षेप करण्यास सुरुवात केली आहे. याचा थेट परिणाम सोन्याच्या दरावर पडला असून शुक्रवारी ४८ हजार ९०० रुपयांवर पाहिलेल्या सोन्याचे दर शनिवारी थेट ४९ हजार ९०० वर पोहोचले. ३१ जानेवारीला सोन्याचे दर प्रती तोळा ४८ हजार रुपये होता. तर शनिवार १२ फेब्रुवारीला सोन्याचा प्रती तोळा भाव ४९ हजार ९०० रुपये राहिला. एकूणच मागील बारा दिवसांच्या काळात सोन्याच्या दरात दोन हजारांची तेजी आली आहे.

कोरोना संकट काळात पहिल्या लॉकडाऊनमध्ये गाठली होती ५५ हजारी-    कोरोना संकटामुळे जाहीर करण्यात आलेल्या पहिल्या लॉकडाऊन दरम्यान सोन्याच्या भावाने ५५ हजारी गाठली होती. तर त्यानंतर वेळोवेळी सोन्याच्या भावात चढ-उतार राहिला. तर आता गुरुवार आणि शुक्रवारी ४८ हजार ९०० वर स्थिरावलेल्या सोन्याने शनिवारी तब्बल एक हजाराने मुसंडीच मारली आहे.

भाव ५५ हजारांवर जाण्याची शक्यता-   रशिया आणि युक्रेन यांच्यातील तणाव आणखी वाढल्यास अल्पावधीतच सोन्याचे दर ५५ हजारांच्यावर जाण्याची शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. भाववाढीचा लग्नसराईच्या हंगामावर परिणाम होणार आहे.

३१ जानेवारीला ४८ हजारांवर सोन्याचे दर होते. गुरुवारी व शुक्रवारी सोन्याचे भाव ४८ हजार ९०० रुपये प्रती तोळा होते. तर शनिवारी सोन्याच्या भावात एकाएकी एक हजाराने तेजी आली. रशिया आणि युक्रेन यांच्यात तणाव वाढल्यास अल्पावधीतच सोन्याचे भाव ५५ हजार रुपये पार होण्याची शक्यता आहे.- सौरभ ढोमणे, सराफा व्यावसायिक, वर्धा.

 

टॅग्स :Goldसोनं