शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

देऊरवाड्यात ११० घरांत शिरले पावसाचे पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2022 05:00 IST

साेमवारी रात्री सुरू झालेल्या पावसाने तालुक्यात सर्वदूर हजेरी लावली असली तरी तालुक्यातील आर्वी, वाठोडा, वाढोणा, विरुळ, रोहणा व खरांगणा येथे अतिवृष्टीच झाली आहे. याच पावसादरम्यान देऊरवाडा परिसरातील नागरिकांच्या घरात पावसाचे पाणी शिरल्याने नागरिकांची एकच तारांबळ उडाली. सततच्या पावसामुळे दोन घरांची पडझड झाली असून, अनेकांना तीन ते चार फूट पाण्यातून मार्ग काढून सुरक्षित ठिकाण गाठावे लागले.

लोकमत न्यूज नेटवर्कदेऊरवाडा (आर्वी) : सोमवारी रात्री सुरू झालेल्या संततधार पावसाने मंगळवारी सकाळी विश्रांती घेतली. याच पावसादरम्यान देऊरवाडा येथील तब्बल ११० घरांत पावसाचे पाणी शिरल्याने संसारोपयोगी साहित्याची मोठ्या प्रमाणात नासाडी झाली आहे.साेमवारी रात्री सुरू झालेल्या पावसाने तालुक्यात सर्वदूर हजेरी लावली असली तरी तालुक्यातील आर्वी, वाठोडा, वाढोणा, विरुळ, रोहणा व खरांगणा येथे अतिवृष्टीच झाली आहे. याच पावसादरम्यान देऊरवाडा परिसरातील नागरिकांच्या घरात पावसाचे पाणी शिरल्याने नागरिकांची एकच तारांबळ उडाली.सततच्या पावसामुळे दोन घरांची पडझड झाली असून, अनेकांना तीन ते चार फूट पाण्यातून मार्ग काढून सुरक्षित ठिकाण गाठावे लागले. नुकसानग्रस्तांना शासकीय मदत देण्यात यावी, अशी मागणी नुकसानग्रस्तांची आहे.

थोडक्यात बचावली ‘आशा’  - शोभा मधुकर थोरात (६७) या  पहाटेच्या सुमारास झोपेत असताना काही तरी पडल्याचा जोराचा आवाज झाला. अशातच ‘आशा’चा मुलगा खडबडून जागा झाला. त्याने तातडीने वृद्ध आईसह घरातून पळ काढल्याने ते थोडक्यात बचावले.- विशेष म्हणजे या माय-लेकांनी घराबाहेर पळ काढताच अवघ्या काही मिनिटांत थोरात यांचे घर जमीनदोस्त झाले. तर मधुकर गवळी यांच्या घराचा काही भाग कोसळल्याने त्यांचेही मोठे नुकसान झाले आहे. 

तीन ते चार फूट पाण्यातून काढावा लागला मार्ग- पावसाचे पाणी घरात शिरल्याने नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली होती. अशातच नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्यासाठी तीन ते चार फूट पाण्यातून मार्ग काढावा लागला. विशेष म्हणजे रस्त्यावरही तीन ते चार फूट पाणी साचले होते.

संसार आला उघड्यावर- इंदू उईके,  नंदा छत्रपती दाभाडे, रामकृष्ण शिरसागर, संजय पुंडे, मनोहर मेश्राम, शेख मुस्तफा, दिवाकर खैरकर, अशोक खडसे, संतोष खडसे, सुधीर खडसे, सुभाष खरकुटे, देवीदास धाडगावे, हरिदास दाभाडे, मनोहर मानकर यांच्यासह तब्बल ११० घरांत पावसाचे पाणी शिरल्याने संसारोपयोगी साहित्याची मोठी नासाडी झाली आहे. या घटनेमुळे संबंधित कुटुंबीयांचा संसार उघड्यावर आला असून, या नुकसानग्रस्तांना शासकीय मदत द्यावी, अशी मागणी आहे.

 

टॅग्स :Rainपाऊस