शहरं
Join us  
Trending Stories
1
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
2
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्तांवर हल्ला; जनसुनावणीदरम्यान कागद हातात दिला, केस ओढले अन्....
3
बेस्ट निवडणूक २०२५: शशांक राव-महायुती पॅनलची बाजी, ठाकरे बंधू चितपट; विजयी उमेदवारांची यादी
4
HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! २२-२३ ऑगस्टला 'या' ऑनलाईन सेवा राहणार बंद
5
BEST Election Results: 'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
6
India-China Trade: भारत की चीन.. या मैत्रीचा सर्वाधिक फायदा कोणाला होणार? काय सांगते आकडेवारी
7
महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली
8
"एकटीच राहते, मुलगा माझ्यासोबत राहत नाही...", ७९ वर्षीय उषा नाडकर्णी जगताहेत एकाकी जीवन, दुःख व्यक्त करत म्हणाल्या...
9
पंतप्रधान, मुख्यमंत्री असो अथवा मंत्री...; ३० दिवसांपेक्षा अधिक काळ तुरुंगात राहिल्यास खुर्ची जाणार! आज संसदेत ३ विधेयकं सादर होणार
10
आजचे राशीभविष्य, २० ऑगस्ट २०२५: नवीन कार्याच्या प्रारंभात अडचणी; व्यवसायात अपेक्षित सहकार्य
11
थकबाकी तिप्पट, व्याज चार पट; सरकारवर वाढतोय कर्जाचा डोंगर; सध्याची रक्कम २०० लाख कोटींवर
12
मुंबईची 'लाइफ'लाइन पाण्यात; रायगड, पुणे परिसराला आजही 'रेड अलर्ट', नांदेड जिल्ह्यात आठ बळी
13
पावसाची दहशत! ८००हून जास्त लोकल रद्द; २५०+ विमानांना फटका, भुयारी मेट्रो स्थानकांवर पाणीगळती
14
काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
15
वाहतूक बंद, साचले पाणी; परिस्थितीचा गैरफायदा घेत ॲप आधारित खासगी वाहनांची मनमानी भाडेवाढ
16
सोन्याचे दागिने ‘एसआयपी’वर घ्यावे का? पैसे भरताना ज्वेलरची बाजारातील पतही तपासा
17
मिठी नदी धोका पातळीपर्यंत; रहिवाशांचा गोंधळ; गर्दी नियंत्रित करताना यंत्रणेच्या नाकीनऊ
18
४२,८९२ कोटींची गुंतवणूक, २५,८९२ रोजगाराची निर्मिती; १० गुंतवणूक सामंजस्य करारांवर स्वाक्षरी
19
ऑनलाइन गेमिंगला बसणार चाप! विधेयकाला केंद्राची मंजुरी; पैसे ट्रान्सफर करण्यास बँकांना मनाई
20
‘लोकमत’कडून नमामी गंगे प्रकल्पासाठी ५७.५० लाखांचा निधी; देवेंद्र दर्डा यांनी दिला धनादेश

शाळांमधील शुद्ध पाणी पुरवठा यंत्रात ‘झेडपी’ची अशुद्धता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2018 23:46 IST

चौदाव्या वित्त आयोगाच्या निधीतून तालुक्यातील शाळांना शुध्द पाणी पुरवठा यंत्र पुरविण्यात आले आहे. विशेषत: शाळांकडून मागणी नसतांनाही जिल्हा परिषद यंत्रणेकडून हे यंत्र थोपविण्यात आल्याने अल्पावधीतच त्याची वाट लागली आहे.

ठळक मुद्देमागणी नसतानाही थोपविले यंत्र : १४ व्या वित्त आयोगातील निधी लाटण्याचा प्रयत्न

सुधीर खडसे।लोकमत न्यूज नेटवर्कसमुद्रपूर : चौदाव्या वित्त आयोगाच्या निधीतून तालुक्यातील शाळांना शुध्द पाणी पुरवठा यंत्र पुरविण्यात आले आहे. विशेषत: शाळांकडून मागणी नसतांनाही जिल्हा परिषद यंत्रणेकडून हे यंत्र थोपविण्यात आल्याने अल्पावधीतच त्याची वाट लागली आहे. यामुळे या यंत्र पुरवठ्यातही जिल्हा परिषदेच्या अशुध्द कारभाराची दुर्गंधी येत असल्याची ओरड होत आहे.गावाचा सर्वांगीण विकास साधण्याच्या उद्देशाने चौदाव्या वित्त आयोगातून थेट ग्रामपंचायतला निधी देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार ग्रामपंचायतींना निधीही पुरविला जात आहे. चौदावे वित्त आयोग या शिर्षाखाली ग्राम पंचायतींना गावाची एकूण लोकसंख्या गुणीला ४०९ रूपये या प्रमाणात एकत्रित निधी दिल्या जातो. या निधीतून शाळा, आरोग्य, मानवी विकास आणि महिला बालकल्याण याकरिता २५ टक्के निधी दरवर्षी खर्च करण्याचे निर्देश आहे. परंतू संबंधीत यंत्रणा शाळांना योग्य माहिती देत नसल्याने मानवी विकास व आरोग्य, खेळ साहित्य व बालविकास साधनाकरिता फारसा खर्च केल्या जात नाही, हे वास्तव आहेत. त्यामुळे शाळांच्या मागणीला दुर ठेऊन जिल्हा परिषद स्तरांवरील पदाधिकारी व अधिकारी आपल्या निकटवर्तीयांची तुमडी भरण्यासाठी स्वमर्जीने ठरविलेल्या वस्तू चौदाव्या वित्त आयोगातील निधीतून थोपवित आहे. त्यामुळे निकृष्ठ दर्जाच्या असलेल्या वस्तुंही गुपचूप स्विकाराव्या लागत असल्याने अल्पावधीच त्यांची वाट लागत असून शासनाच्या कोट्यवधीचा निधी व्यर्थ जात आहे.चार महिन्यातच यंत्राची लागली वाटसत्र २०१७-१८ मध्ये अर्धे सत्र संपताच मागणी नसतानाही जिल्हा परिषदेच्या विविध शाळांना शुद्ध पाणी पुरवठा यंत्र पुरविण्यात आले. पुरवठादाराच्या चमुने एक हजार लीटरच्या सुप्रिम कंपनीच्या दोन टाक्या, २० लीटरचा स्टोरेज ड्रम, ५० ते ६० फुट पारस कंपनीचे पाईप असलेली नळ वाहिनी, प्रि आणि मेमब्रन्ट असलेले तीन छोटे फिल्टर आणि एक पाणी घेण्याचा नळ बसविण्यात आला.या साहित्याची किंमत बाजार भावाप्रमाणे ४० ते ४५ हजाराच्या आसपास आहे. परंतु ग्राम पंचायतींनी लाख रुपये या पुरवठादाराला दिल्याचे कळते. या यंत्राची चार महिन्यातच हालत बिघडली आहे. जमिनीत बसविलेली टाकी अलगद जमिनीच्या वर आली. पाईपलाईन तुटली, फिल्टर व पाणी पुरवठ्याच्या टिल्लू मोटरपंपाला चार ते सहा महिन्यातच घरघर लागली आहे.जिल्हा परिषद स्तरावरुन दबावसमुद्रपूर तालुक्यातील गणेशपूर, मंगरूळ पुनर्वसन, दसोडा, खेक, सिल्ली, साखरा, ताडगाव, वाचनचुवा, तळोदी यासह अनेक गावांतील शाळांत हे यंत्र बसविलेले आहे.हे यंत्र बसविण्यासाठी आणि पुरवठादाराचे देयक देण्यासाठी जिल्हा परिषद स्तरावरुन ग्रामपंचायत प्रशासनावर दबाव टाकल्या जातात. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या हक्काच्या निधीवरही जिल्हा परिषद प्रशासनाचा डोळा असून मागणी नसतानाही वस्तू लादून अस्वच्छ कारभार चालविला असून या प्रकरणाची चौकशी करुन कार्यवाही करण्याची मागणी गावकऱ्यांकडून होत आहे.

टॅग्स :zp schoolजिल्हा परिषद शाळाWaterपाणी