शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
2
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
3
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
4
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
5
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
6
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
7
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
8
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
9
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
10
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
11
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!
12
Viral Video: रीलसाठी कायपण! थेट धावत्या रेल्वेसमोर...; तरुणाच्या व्हिडीओचा शेवट भयंकर
13
शेअर असावा तर असा! लिस्टिंगच्या दुसऱ्या दिवशीही गुंतणुकदार मालामाल, लागलं २०% चं अपर सर्किट
14
करून दाखवलं! प्रेग्नेन्सीमध्ये प्रिलिम्सची तयारी; डिलिव्हरीच्या १७ दिवसांनी UPSC मेन्स, झाली IAS
15
चेहरा एकच, मतदान ४ ठिकाणी! २ कर्नाटकात, १ मुंबईत आणि १ उत्तर प्रदेशात; कोण आहे हा युवक?
16
केलेल्या आरोपांबाबत २४ तासांत स्वाक्षरीसह शपथपत्र द्या, अन्यथा..., निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना आदेश
17
“देशाच्या राजकारणात १५ दिवसांत मोठे बदल दिसतील”; प्रकाश आंबेडकरांचा दावा, विरोधकांवर टीका
18
धक्कादायक! कुत्र्यांनी एका बकरीला मारले, बदला म्हणून त्या माणसाने २५ कुत्र्यांना गोळ्याच घातल्या
19
भयंकर! बारमध्ये घुसून तरुणावर चाकूने सपासप वार, ३ वर्षांपूर्वी झालेल्या भांडणाचा काढला राग
20
"ही अमानवी प्रथा बंद करा..."; सरन्यायाधीश संतापले; सुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश

जीवनात सेवेला महत्त्वाचे स्थान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2018 23:33 IST

चित्रकला स्पर्धांमधून भावी चित्रकार व शिल्पकारांची पिढी घडत असते. प्रत्येकाने आपल्या आयुष्यात कुणाची ना कुणाची सेवा करायला हवी. मग, ती देवाची, आई-वडिलांची, गुरूजणांची वा कलेची असो. जीवनात सेवेचे महत्त्वाचे स्थान आहे.

ठळक मुद्देरामदास तडस : रंगोत्सव २०१८ चित्रकला स्पर्धेचे यशस्वी आयोजन

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : चित्रकला स्पर्धांमधून भावी चित्रकार व शिल्पकारांची पिढी घडत असते. प्रत्येकाने आपल्या आयुष्यात कुणाची ना कुणाची सेवा करायला हवी. मग, ती देवाची, आई-वडिलांची, गुरूजणांची वा कलेची असो. जीवनात सेवेचे महत्त्वाचे स्थान आहे. लहान वयातच मुलांमध्ये सेवा आणि कर्तव्य भावना रूजल्यास आयुष्यात पूढे ते अनावश्यक गोष्टींचा त्याग करून गरजूंना मदतीचा हात देऊ शकतील. यासाठी पालकांनी मुलांना तशी शिकवण द्यायला हवी. सोबतच अशा कला-गुणांना वाव देणाऱ्या स्पर्धा जिल्ह्यात घ्याव्यात, असे आवाहन खा. रामदास तडस यांनी केले.जनहित मंच व खा. तडस यांच्या संयुक्त विद्यमाने ‘रंगोस्तव-२०१८’ चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेचे उद्घाटन खा. रामदास तडस यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी आ.डॉ. पंकज भोयर तर अथिती म्हणून नगराध्यक्ष अतुल तराळे, जिल्हाधिकारी शैलेश नवल, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी नयना गुंडे, जि.प. शिक्षण सभापती जयश्री गफाट, न.प. गटनेत्या शोभा तडस, जिल्हा क्रीडा अधिकारी नितीन तारळकर, न.प. शिक्षण सभापती विजय उईके, जि.प. सदस्य पंकज सायंकार, सुनील गफाट, अविनाश देव आदी उपस्थित होतेखा. तडस पूढे म्हणाले की, विध्यार्थ्यांच्या कला-गुणांना वाव देण्याकरिता त्यांच्यात स्पर्धा होणे गरजेचे आहे. स्पर्धेमुळे काहीतरी नवीन करण्याची उर्जा मिळते. यामुळे अशा स्पर्धा प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी सुद्धा घेण्यात याव्या. याद्वारे ग्रामीण भागातील विद्यार्थी यात सहभाग घेऊ शकतील. कलाकार वर्गाला व्यासपीठ उपलब्ध करून देणे महत्त्वाचे असून या उपक्रमाच्या माध्यमातून अनेक कलाकार उदयास येतील. या माध्यमातून त्यांना पूढे चांगली संधी प्राप्त होईल, असा विश्वासही खा. तडस यांनी व्यक्त केला.चित्रकला स्पर्धा विद्यार्थ्यांसाठी खुले व्यासपीठ आहे. त्यांचे सुप्त गुण व्यक्त करण्याचे साधन आहे. यामुळे अधिकाधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवावा, असे मत आ.डॉ. पंकज भोयर यांनी व्यक्त केले.सदर स्पर्धा चार गटांमध्ये घेण्यात आली. गट एकमध्ये इयत्ता पहिली ते चौथी मुक्त चित्र, गट दोनमध्ये इयत्ता पाचवी ते सातवी पर्यावरण, जल संवर्धन, निसर्ग चित्र, गट तीनमध्ये इयत्ता आठवी ते दहावी शहर स्वच्छता, नगर स्वच्छता, हागणदारीमुक्त अभियान तर गट चारसाठी व्यसनमुक्ती, वर्धा जिल्हातील आपल्या आवडीच्या ठिकाणाचे सौदर्यीकरण जसे सेवाग्राम आश्रम, पवनार आश्रम, जनहित मुक्तांगन, हनुमान टेकडी, शिवाजी चौक, शास्त्री चौक, बजाज चौक, आर्वी नाका, धुनिवाले मठ, महावीर उद्यान, आंबेडकर उद्यान हे विषय देण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये वर्धा जिल्ह्यातील २ हजार ३८० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. यात ५० ते मूकबधीर ६० विद्यार्थ्यांचा सहभाग होता. आजच्या स्पर्धेच्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी रेखाटलेली अनेक चित्रे व्यावसायिक चित्रकारांपेक्षा सुंदर व परिपूर्ण होती, हे विशेष!वर्धा रंगोस्तव-२०१८ चित्रकला स्पर्धा यशस्वी करण्याकरिता जनहित मंचचे अध्यक्ष सतीश बावसे, सचिव राजेश आसमवर, विपीन पिसे, उपाध्यक्ष सुभाष पाटणकर, नरेश चांडक, प्रशांत वकारे, पवन बोधनकर, आशिष पोहाणे, पंकज गायगोले, चैतन्य तेलरांधे, सुबोध वाघ, रजत शेंडे, रूद्रनाथ युवा पथक, हरी पिसे यांनी सहकार्य केले. खा. तडस, आ. भोयर यांनी चित्रांची पाहणी केली.चित्रकला स्पर्धा ठरली विद्यार्थ्यांसाठी खुले व्यासपीठचित्रकला स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या कला-गुणांना चालना मिळते. यामुळे अशा स्पर्धा विद्यार्थ्यांसाठी खुले व्यासपीठच ठरले आहे. रंगोत्सव २०१८ प्रमाणेच जिल्ह्यात सर्वत्र चित्रकला स्पर्धांचे आयोजन करण्यात यावे, असा मनोदय मान्यवरांनी व्यक्त केला. या स्पर्धेत मूकबधीर विद्यार्थ्यांनी सहभागी होऊन काढलेले चित्र सर्वांसाठी आकर्षण ठरले. एक-दोन नव्हे तर तब्बल ५० ते ६० मूकबधीर विद्यार्थ्यांनी चित्र रेखाटले.