शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

सहासूत्री कार्यक्रम राबविल्यास वाढेल पीककर्ज वाटपाचा टक्का

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2021 05:00 IST

जिल्ह्यात २२ बँकांच्या एकूण १४१ शाखा आहेत. यात २६ खासगी, तर ११५ शासकीय आहेत. पीककर्जाचे उद्दिष्ट मिळताच प्रत्येक बँक शाखेला वेगवेगळे पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले. पीककर्ज वाटपाची प्रक्रिया राबविताना काही बँकांना समाधानकारक तर काहींनी कासवगतीचा अवलंब केल्याचे वास्तव आहे. पीककर्ज वाटपातील हयगय लक्षात येताच जिल्हाधिकाऱ्यांनी हयगय करणाऱ्या बँकांवर कठोर कारवाईसाठी प्रस्ताव पाठविण्याचे संकेत दिले आहेत.

ठळक मुद्दे११४९ कोटींचे उद्दिष्ट : जिल्ह्यात झाले केवळ ४० टक्के पीककर्ज वाटप

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : खरीप हंगामात ८५० कोटी, तर रब्बी हंगामात २९९ कोटी असे आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये जिल्ह्याला एकूण ११४९ कोटींचे पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. असे असले तरी आतापर्यंत केवळ ४० टक्केच पीककर्ज वाटप करण्यात आल्याचे वास्तव आहे. सहासूत्री कार्यक्रम राबवून त्याची शहरी व ग्रामीण भागात प्रभावी अंमलबजावणी झाल्यास नक्कीच जिल्ह्यात पीककर्जाचा टक्का वाढेल, असा विश्वास बँकिंग सेक्टरमधील तज्ज्ञांकडून वर्तविला जात आहे.जिल्ह्यात २२ बँकांच्या एकूण १४१ शाखा आहेत. यात २६ खासगी, तर ११५ शासकीय आहेत. पीककर्जाचे उद्दिष्ट मिळताच प्रत्येक बँक शाखेला वेगवेगळे पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले. पीककर्ज वाटपाची प्रक्रिया राबविताना काही बँकांना समाधानकारक तर काहींनी कासवगतीचा अवलंब केल्याचे वास्तव आहे. पीककर्ज वाटपातील हयगय लक्षात येताच जिल्हाधिकाऱ्यांनी हयगय करणाऱ्या बँकांवर कठोर कारवाईसाठी प्रस्ताव पाठविण्याचे संकेत दिले आहेत. तर जिल्हा अग्रणी बँकेकडून जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनांना केंद्रस्थानी ठेवून कार्यवाही केली जात आहे. असे असले तरी, जिल्ह्याचा पीककर्ज वाटपाचा टक्का वाढविण्यासाठी विशेष उपक्रम राबविण्याची गरज आहेच. जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागात सहासूत्री कार्यक्रम राबविण्यास नक्कीच पीककर्ज वाटपाचा टक्का वाढणार आहे. 

पीककर्ज वाटप वाढविण्यासाठी उपाययोजना

जिल्ह्याची आणेवारी ५० पैसेपेक्षा कमी जाहीर केल्यास मागील कर्जाचे पुनर्गठन करून नवीन पीककर्ज उपलब्ध करून देता येईल.महसूल विभागाकडून शेतकऱ्यांची गावनिहाय यादी उपलब्ध करून दिल्यास त्या यादीची बँकांकडून पडताळणी करीत पीककर्ज न घेतलेल्या शेतकऱ्यांना संपर्क करून पीककर्ज वाटप करता येईल.१.६० लाखांपर्यंतच्या पीककर्जाची सात-बारावर नाेंद होत नसल्याने मल्टिपल कर्जवाटप होत आहे. त्यामुळे बँका आपल्या कार्यक्षेत्राच्या बाहेर कर्जवाटप करणे टाळत आहेत. पीककर्जाची नोंद सात-बारावर केल्यास बँकांना सर्व्हिस एरियाच्या बाहेर कर्जवाटप करणे सोयीचे होईल.

रजिस्टर मोर्टगेजऐवजी महाराष्ट्र प्रोव्हिजन फॅसिलिटिज फॉर ॲग्रिकल्चर क्रेडिट बाय बँक ॲक्ट १९७४ च्या तरतुदीनुसार प्रभार नोंदणी प्रक्रिया वापरल्यास तसेच महिला बचत गटांप्रमाणे १० लाखांपर्यंत स्टॅम्प शुल्क माफ केल्यास पीककर्ज वाटपाची प्रक्रिया साेयीची होईल.जुनी एनपीए कर्ज खाती एकरकमी परतफेड योजनेत बंद करून नवीन पीककर्ज उपलब्ध करून देण्याच्या सूचना सर्व बँकांना देणे.पीककर्ज नवीनीकरण करण्यासाठी आणि इतर कर्ज योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना पत्र पाठवून प्रोत्साहित करणे. या सहा विषयांवर भर देण्यात आल्यास पीककर्जाचा टक्का वाढेल.

 

टॅग्स :Crop Loanपीक कर्ज