शहरं
Join us  
Trending Stories
1
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
2
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
3
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
4
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
5
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
6
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7७ लाख कोटींची कमाई
7
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
8
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
9
शेअर आहे की पैशांचं झाड...? या महारत्न कंपनीनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल, 1 लाखाचे केले थेट 25 लाख! 3 वेळा वाटले बोनस शेअर
10
पाकिस्तानात निसर्गाचा हाहाकार; मुसळधार पाऊस अन् पुरामुळे 1 हजारहून अधिक जणांचा मृत्यू
11
भारताविरोधात गन सेलिब्रेशन करणाऱ्या पाकिस्तानच्या फरहानचा माजोरडेपणा कायम, आता म्हणाला....
12
काँग्रेसचे नेते आणि हिमाचलमधील मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी केलं दुसरं लग्न, कोण आहे त्यांची दुसरी पत्नी?
13
डीजेचा मोठा आवाज ठरेल जीवघेणा; हार्ट अटॅक, ब्रेन हॅमरेजचा धोका, फुटू शकते मेंदूची नस
14
चार्ली किर्कच्या शोकसभेत पत्नीने केलं अनपेक्षित विधान; एरिका किर्क म्हणाल्या," त्या तरुणाला मी..."
15
जुगाराच्या व्यसनामुळे बनला 'चोर'; वडिलांशी खोटं बोलून मित्रांच्या नावाने घेतलं ३३ लाखांचं कर्ज
16
टाटा-महिंद्राच्या कंपनीचे शेअर आपटले! पण अदानींचा 'हा' स्टॉक ठरला टॉप गेनर; IT क्षेत्राला सर्वाधिक फटका
17
मेट्रोचे सर्व टप्पे २०२६च्या अखेरपर्यंत प्रवाशांकरता खुले होतील- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
18
“आता रिकामे ठेवू नका, काहीतरी जबाबदारी द्या, चुकलो असेन तर...”; धनंजय मुंडेंची भरसभेत विनंती
19
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
20
VIDEO: आईची माया! सिंहीणने रेडकूवर घातली झडप, म्हशीने शिंगाने लावलं उडवून अन् पुढे...

वाढत्या पर्यटनामुळे वाघांच्या अधिवासासह वागणुकीवर परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 05:00 IST

व्याघ्र पर्यटनामुळे पुन्हा मनुष्य जंगलामध्ये शिरकाव करु लागला. सर्वच पर्यटक सारख्या मानसिकतेचे नसल्याने काही पर्यटक जंगल सफारीदरम्यान नियमांना तिलांजली देतात. म्हणून पर्यटनानेही वाघांच्या अधिवासाला धोका निर्माण होऊन त्यांच्या वर्तवणुकीवरही परिणाम होत असल्याचे निदर्शनास येत आहे. वाघ्र पर्यटनातून वनविभागासह शासनाला निधी मिळत असल्याने ही बाब दुर्लक्षित होत आहे.

ठळक मुद्देजागतिक व्याघ्र दिन विशेष : शोभेची बाहुली न बनविता दूरगामी व्यवस्थापनाची गरज

आनंद इंगोलेलोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : गेल्या शतकापासून माणसाने पर्यावणाशी दोनहात करुन जंगलांमध्येही घुसखोरी चालविली. शिकार, जंगलतोड आणि अतिक्रमणामुळे वाघांच्या अधिवासाचे क्षेत्र कमी झालेत. परिणामी वाघांची संख्या कमी होऊ लागल्याने त्यांचे जतन करण्याची गरज निर्माण झाली. यातूनच २०१० मध्ये रशियातील सेंट पीटर्सबर्ग येथे झालेल्या वाघांविषयीच्या शिखर परिषदेत २९ जुलै या दिवसाची जागतिक व्याघ्र दिन म्हणून घोषणा करण्यात आली. त्या अनुशंगाने वाघांच्या संरक्षणाकरिता व्याघ्र प्रकल्पाच्या विस्तारासह पर्यटन विकासालाही चालना देण्यात आली.व्याघ्र पर्यटनामुळे पुन्हा मनुष्य जंगलामध्ये शिरकाव करु लागला. सर्वच पर्यटक सारख्या मानसिकतेचे नसल्याने काही पर्यटक जंगल सफारीदरम्यान नियमांना तिलांजली देतात. म्हणून पर्यटनानेही वाघांच्या अधिवासाला धोका निर्माण होऊन त्यांच्या वर्तवणुकीवरही परिणाम होत असल्याचे निदर्शनास येत आहे. वाघ्र पर्यटनातून वनविभागासह शासनाला निधी मिळत असल्याने ही बाब दुर्लक्षित होत आहे. वाघांना शोभेची बाहुली न बनविता जंगलाच्या राजाचे स्थान कायम ठेवण्यासाठी शासनाने अधिक संशोधन करुन दूरगामी ठोस व्यवस्थापन करण्याची गरजही आज जागतिक व्याघ्र दिनानिमित्त व्यक्त होत आहे. असे असतानाही वर्धा जिल्ह्यातील बोर तर जिल्ह्याबाहेरील  ताडोबा, मेळघाट, टिपेश्वर येथील नियोजनबद्ध अधिवास व्यवस्थापनाने गेल्या दशकात वाघाची संख्या झपाट्याने वाढवून जागतिक पातळीवर विदर्भाचा लौकिक वाढला आहे, हे विशेष.

यामुळे वाघांची सख्या रोडावली- वाघांना जगण्यासाठी भरपूर जागा लागते. शेती, अतिक्रमण आणि जंगलतोडीमुळे वाघांच्या अधिवासाचे क्षेत्र कमी होत आहे.- भारत आणि बांग्लादेशाच्या किणाºयावरच्या सुदरबन पाणथळीत वाघांची संख्या मोठी आहे. परंतु समुद्राच्या वाढत्या पातळीमुळे आगामी काळात या वाघांना बेघर व्हावे लागणार आहे.

- वाघांची चोरटी शिकार आणि तस्करी वाढतच आहे. भारतीय पट्टेदार वाघ जागतिक वैशिष्यपूर्ण प्राण्यांपैकी एक असून त्यांचीही संख्या रोडावली आहे. गेल्या शतकात ९७ टक्के शिकार माणसाच्या अतिरेकाने झाला असून जगात सध्या केवळ चार ते साडेचार हजारच वाघ शिल्लक राहिले आहे.

वाघांची काही वैशिष्ट्ये- वाघाची छाव्यांची जन्मापासून काही दिवस डोळेबंदच असतात. ते सुंगधाने आईला ओळखतात. जन्मलेले बहुतांश छावे उपासमार आणि थंडीने मरतात. काहिंना तर वाघच खाऊन टाकतात.- वाघिण छाव्यांना शिकार करण्याचे शिकविते. दिवसा प्रकाशात मानवी संघर्ष टाळणे वाघ पसंत करीत असल्याने ते साधारणत: रात्रीलाच शिकार करणे पसंत करतात.- रात्रभर ते त्यांच्या प्रदेशाभोवती गस्त घालत असतात. एका दिवसांत वाघ जवळपास ३० किलो मीटर अंतर पार करत असल्याचीही काही उदाहरणे आहेत.- वाघ हा उत्कृष्टपणे पाहू शकतो. त्याला तासंतास पोहाणे आवडतात. यासोबतच पाण्यात शिकार करण्याचीही कला वाघाला अवगत असते.- वाघांचे आयुर्मान अंदाजे २० ते २५ वर्षाचे असते. बहूतेक वाघ वयाच्या २० वर्षांपूर्वीच मरण पावतात. आतापर्यंत सर्वात जास्त २५ वर्षे जगणाºया ‘फ्लेव्हल’नावाच्या वाघाला सर्कशीतून सोडवून फ्लोरिडाच्या टँपा येथील प्राणी संग्रहालयात ठेवण्यात आले होते.- वाघाला झालेल्या जखमा भरुन काढण्यासाठी त्याची लाळच प्रभावी असते. साधारणत: वाघ माणसांकडे शिकार म्हणून बघत नाही. पण, माणसापासून धोक संभावत असल्याने तो हल्ला चढवितो. 

गेल्या शतकात माणसाने वाघांची अनिर्बंध शिकार केली. शिवाय जंगलतोड आणि अतिक्रमण करून वाघांच्या अधिवासाचे क्षेत्र हिरावले. परिणामी अन्नासाठी जवळच्या वस्त्यांवर वाघ हल्ले करु लागले. यातूनच माणूस-वाघ संबंध अधिक बिघडू लागले. त्यात व्याघ्र पर्यटनाने आणखीच भर घातली आहे. वाघ हा जंगलाचा राजा असल्याने त्याचे जंगलातील स्थान कायम ठेवण्यासाठी शासनाने ठोस पावले उचलण्याची गरज आहे.- प्रा.संदीप पेटारे,  पर्यावरण अभ्यासक. 

टॅग्स :Tigerवाघ