शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

माथाडी कामगार, सुरक्षा रक्षकांना तातडीने ग्रॅज्युइटी योजना लागू करा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2024 16:58 IST

Wardha : लाखो कामगार व सुरक्षा रक्षक योजनेपासून वंचित

लोकमत न्यूज नेटवर्क आर्वी : शासनाकडे नोंद असलेल्या माथाडी कामगार व सुरक्षा रक्षक यांच्यासाठी एलआयसीमार्फत ग्रुप ग्रॅज्युइटी योजनेच्या प्रस्तावास तातडीने मान्यता देण्याची मागणी स्वाभिमान सुरक्षा रक्षक कामगार न्याय संघटनेने केली आहे.

राज्यात ३६ माथाडी आणि १५ सुरक्षा रक्षक मंडळे कार्यरत आहेत. महाराष्ट्र माथाडी कामगार व इतर श्रमजीवी कामगार अधिनियम १९६९ व खासगी सुरक्षा रक्षक अधिनियम १९८१ अन्वये शासन व कामगार प्रशासन महाराष्ट्र यांच्या अधिपत्याखाली त्यांचा कारभार चालतो. उपदान प्रदान अधिनियम १९७२ च्या तरतुदींनुसार आजपर्यंत उल्लंघन झाले. मागील ५ वर्षापासून निवेदन, आपले सरकारवर तक्रारी करूनही लाभ झाला नाही. शासन व प्रशासनाने बैठका घेऊन कायद्यांतर्गत प्रस्ताव जून २०२२ रोजी शासन मान्यतेसाठी पाठविला. मात्र, शासन व प्रशासनाने अजूनही प्रस्तावास मान्यता दिली नाही. त्यामुळे लाखो कामगार व सुरक्षा रक्षक योजनेपासून वंचित आहेत. योजना नसल्याने मृत कामगार व सुरक्षा रक्षकांच्या अवलंबितांना लाभ होत नाही. त्यामुळे तातडीने प्रस्तावास मान्यता द्यावी, अशी मागणी स्वाभिमान सुरक्षा रक्षक कामगार न्याय संघटनेचे महाराष्ट्र अध्यक्ष अमित देशे, विदर्भ अध्यक्ष भरत जयसिंगपुरे यांनी निवेदनातून केली आहे. ही योजना राज्यात लागू झाल्यास लाखोंच्यावर कामगार व सुरक्षा रक्षक व त्यांच्या कुटुंबांना लाभ होईल. उपदान एलआयसीमार्फत झाल्यास लाखो रुपयांपर्यंत फायदा होईल, असे संघटनेचे जिल्हाध्यक्ष रणजित सहारे यांनी सांगितले. 

मंडळाकडे पुरेसा निधी उपलब्ध प्रस्ताव शक्य तितक्या लवकर लागू झाल्यास भविष्य निर्वाह निधी अधिनियम १९५२ अन्वये कर्मचारी पेन्शन १९९५ व कर्मचारी विमा १९७६ या योजना एलआयसीमार्फत लागू होऊ शकतात. त्यामुळे संबंधित कामगार व सुरक्षा रक्षकांच्या भविष्याच्या दृष्टीने चांगले होईल. योजना राबविण्याकरिता पुरेसा निधी मंडळात आहे. मात्र, मार्गील ४३ वर्षांपासून या मंडळाकडे शासन व प्रशासनाने लक्ष केंद्रित केले नाही, असे सहकोषाध्यक्ष मनीष पवार यांनी सांगितले.

टॅग्स :wardha-acवर्धाgovernment schemeसरकारी योजना