लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शहरालगतच्या सिंदी (मेघे)ग्रामपंचायतीच्या हद्दीत वॉर्ड क्र.३ मध्ये एक महिण्यापूर्वी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्यावतीने नळ योजनेकरिता खड्डे करण्यात आले. त्या ठिकाणी नळाची पाईप लाईन अजून पर्यंत टाकण्यात आली नाही. त्याचा गेल्या एका महिण्यांपासून नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. ही नाली खोल असल्याने येथे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.सदर पाईपलाईन टाकण्याचे काम पूर्ण करण्याची मागणी येथील नागरिकांनी केली आहे. स्थानिक सिंदी मेघे वॉर्ड क्र. ३ व इतर भागात जीवन प्राधीणकरण विभागाच्यावतीने रस्त्याच्या बाजूला नळाकरिता जेसीबीच्या सहाय्याने खोदकाम केलेले आहे. पण मागील एक ते दीड महिण्यापासून खोदकाम करून झाले अद्यापही काही ठिकाणी नळाची पाईपलाईन टाकण्यात आलेली नाही. व ते खोदलेले खड्डे तसेच आहे. या पाईपलाईनचे काम तातडीने करावे. अशी मागणी नागरिकानी केली आहे. तर ज्या ठिकाणी जुनी नळ योजना होती ती सुध्दा कामाच्या वेळेस तुटली त्यामुळे अनेक ठिकाणी पाणी पुरवठा बंद झाला आहे. खड्डे खोदून ठेवले असल्याने पावसामुळे सगळीकडे चिखल झाला असून या ठिकाणावरून जाणे येणे करणे अशक्य होत नाही. विद्यार्थ्यांची हाल होत आहे. याची दखल घेत प्राधीकरणाने पाईपलाईन जोडणी करावी अशी मागणी येथील रहिवाशांनी केली आहे.विलंबामुळे नागरिक त्रस्तजीवन प्राधिकरणाची पाणी योजना १२ गावांसाठी आहे. अनेक भागात मोठे पाईप टाकण्याचे काम सुरू आहे.मात्र मागील एक महिन्यापासून केवळ खड्डेच खणून ठेवण्यात आल्याने नागरिकांना रहदारीस अडचण निर्माण झाली आहे. ग्रामपंचायतीचेही प्राधिकरण ऐकत नाही अशी स्थिती आहे.
नळ पाईपलाईनचे काम ताबडतोब करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2020 05:00 IST
सदर पाईपलाईन टाकण्याचे काम पूर्ण करण्याची मागणी येथील नागरिकांनी केली आहे. स्थानिक सिंदी मेघे वॉर्ड क्र. ३ व इतर भागात जीवन प्राधीणकरण विभागाच्यावतीने रस्त्याच्या बाजूला नळाकरिता जेसीबीच्या सहाय्याने खोदकाम केलेले आहे. पण मागील एक ते दीड महिण्यापासून खोदकाम करून झाले अद्यापही काही ठिकाणी नळाची पाईपलाईन टाकण्यात आलेली नाही. व ते खोदलेले खड्डे तसेच आहे. या पाईपलाईनचे काम तातडीने करावे.
नळ पाईपलाईनचे काम ताबडतोब करा
ठळक मुद्देसिंदी (मेघे) वासीयांची मागणी : खड्ड्यामुळे झाला चिखल