शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
4
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
5
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
6
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
7
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
8
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
9
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
10
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
11
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
12
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
13
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
14
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
15
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
16
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
17
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
18
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
19
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...

वनजमिनीवर अवैध खनन; गुरांची होतेय उपासमार

By admin | Updated: November 9, 2016 01:05 IST

चराईक्षेत्र घटले आणि चाऱ्यासाठी भटकंती करावी लागत असल्याने गुरांच्या संख्येत घट होत आहे.

गोपालक, शेतकरी त्रस्त : विटांसाठी केला जातोय मातीचा उपसा, प्रशासनाचे दुर्लक्षविनोद घोडे  चिकणी (जामणी)चराईक्षेत्र घटले आणि चाऱ्यासाठी भटकंती करावी लागत असल्याने गुरांच्या संख्येत घट होत आहे. यामुळे परिसरातील गोपालक, शेतकरी गुरे चारण्याकरिता वन विभागाच्या पडिक १०० ते १२५ एकर जमिनीचा उपयोग करीत होते; पण या जमिनीवरही आता खनन होत असल्याने चराई क्षेत्र घटले आहे. परिणामी, गुरांची उपासमार होत आहे. परिसरातील जमीन मुरमाटी (बरड) भाग असल्याने येथे लगतच्या गावातील गुरेही चरण्याकरिता आणली जातात. कालांतराने या परिसरात पाच वीटभट्ट्या सुरू झाल्या. विटांसाठी मातीची गरज असते. मातीसाठी काही शेतजमिनी विकत घेतल्या. एवढ्या मातीने होत नसल्याने वन विभागाच्या जमिनीवरही खन्नन करून माती नेली जात आहे. खन्नन होत असल्याने येथे खड्डे पडले असून गवत उगवत नाही. गवत न उगविल्याने गुरे चरू शकत नाहीत. यामुळे गुरांख्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या अवैध खननाकडे वन विभागानेही दुर्लक्ष केल्याचेच दिसून येत आहे. यामुळे आता गुरे कुठे चारावित, असा प्रश्न शेतकरी व गोपालकांना पडला आहे.वन अधिकाऱ्यांशी या वीटभट्टी धारकांची हात मिळवणी आहे की काय, असा ही प्रश्न उपस्थित होत आहे. वीटभट्ट्यांमुळे परिसरात मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे. परिणामी, आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. वन विभागाच्या पडिक जागेमध्ये अवैधरित्या खनन करून माती चोरली जात असल्याने महसूलही बुडत आहे. प्रशासनाने याकडे लक्ष देत संबंधितांवर कार्यवाही करणे गरजेचे झाले आहे.