महावितरणचा प्रकार : ग्राहकांना दहाऐवजी चार बल्बचे वितरणतळेगाव (श्या.पं.) : शासनाने विजेची बचत व्हावी, सर्वसामान्यांना त्याचा लाभ व्हावा, या हेतूने वीज ग्राहकांना अनुदानित रूपात एलईडी बल्बचे वाटप सुरू केले आहे. या योजनेत प्रत्येक ग्राहकाला दहा बल्बचे वाटप करावयाचे आहे; पण संबंधित कंत्राटदारातर्फे ग्राहकाला दहाऐवजी चार बल्बचेच वाटप केले जात आहे. यात शासनाच्या योजनेला तिलांजली देण्याचा प्रकार सुरू आहे. अनुदानित बल्ब वाटप योजनेत गैरप्रकाराची शक्यता ग्राहकांतर्फे वर्तविली आहे.शासनाच्या एलईडी बल्ब वाटप योजनेंतर्गत ग्राहकांना सात वॅटचे एलईडी बल्ब केवळ १०० रुपयांत देण्यात येत आहे. यात १० रुपये रोख तर उर्वरित ९० रुपये नऊ महिने बिलात जोडले जाणार आहे. यामुळे ग्राहकांची हे बल्ब खरेदी करण्यासाठी गर्दी होत आहे. यात ५ नामांकित कंपनीच्या बल्बचे वाटप करण्यात येत आहे. त्यानुसार ग्राहकांना विविध नामांकित कंपन्या पुरवठा करणार आहेत. या योजनेला ग्राहकांतर्फे भरभरून प्रतिसाद मिळत आहे. चौका-चौकात स्टॉल उभारून या बल्बचे वाटप सुरू आहे; पण या योजनेत प्रत्येक ग्राहकाला १० एलईडी बल्ब देण्याचे आदेश असताना संबंधित कंत्राटदारांतर्फे केवळ चार बल्बचेच वाटप केले जात आहे. शासनाने ही योजना सर्व सामान्यांना लाभ पोहोचावा या हेतूने सुरू केली आहे. यामुळे या योजनेनुसार ग्राहकांना सुलभ हप्त्यातही हे बल्ब खरेदी करता येणार आहे. या योजनेला ग्राहकांकडून भरभरून प्रतिसाद मिळत आहे; पण केवळ चारच बल्ब ग्राहकांना मिळत असल्याने ग्राहकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.(वार्ताहर) बल्बच्या वॉरंटीबाबत ग्राहकांमध्ये संभ्रमशासनाच्या या योजनेत वितरित करण्यात आलेल्या एलईडी बल्बची तीन वर्षे वॉरंटी आहे; पण रस्त्यावर बसून हे बल्ब विकणाऱ्यांतर्फे वितरण झाल्यावर सदर बल्ब बंद पडल्यास त्याची दुरूस्ती तसेच बदलून देण्याची तरतूद नाही. यामुळे ग्राहकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. शासनाच्या या योजनेत वितरित करण्यात आलेल्या एलईडी बल्बची तीन वर्षे वॉरंटी आहे; पण रस्त्यावर बसून हे बल्ब विकणाऱ्यांतर्फे वितरण झाल्यावर सदर बल्ब बंद पडल्यास त्याची दुरूस्ती तसेच बदलून देण्याची तरतूद नाही. यामुळे ग्राहकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. प्रत्येक ग्राहकाला एक हजार रुपयांमध्ये दहा बल्ब देण्याची वीज कंपनीची योजना आहे. नगदी १०० रुपये देऊन उर्वरित ९०० रुपये बिलामध्ये प्रत्येक महिन्याला ९० रुपये, असे वसूल करावयाचे आहे. माझी दहा बल्बची मागणी असताना केवळ चार बल्ब देण्यात आलेत.- मुकुंद ठाकरे, ग्राहक.
एलईडी बल्ब वाटप योजनेत गैरप्रकार?
By admin | Updated: November 25, 2015 06:15 IST