शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पोटी पात्रातून वाळूचा अवैध उपसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2018 22:19 IST

हिंगणघाट तालुक्यातील पोटी येथील वर्धा नदी पात्रातून वाळू माफियांकडून अवैध पद्धतीने उपसा होत आहे.

ठळक मुद्देवर्धा नदीपात्र धोक्यात : ग्रामस्थांचे जिल्हाधिकाºयांना साकडे

आॅनलाईन लोकमतवर्धा : हिंगणघाट तालुक्यातील पोटी येथील वर्धा नदी पात्रातून वाळू माफियांकडून अवैध पद्धतीने उपसा होत आहे. हा प्रकार शासनाच्या महसुलाला चुना लावणारा असून तेथे कारवाई करावी, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनातून पोटी येथील ग्रामस्थांनी केली आहे.पोटी गावालगत वर्धा नदीचे मोठे पात्र आहे. येथे रेती साठा होत असल्याने घाट देण्यात आला आहे. वर्धा जिल्हाधिकाºयांनी या घाटाचा लिलावा केला नाही. शिवाय त्यासाठी पोटी ग्रा.पं.नेही ना हरकत प्रमाणपत्र दिलेले नसताना येथे रेतीचा उपसा होत आहे. नदी पलीकडील भाग यवतमाळ जिल्ह्यात येत असून तेथील वाऱ्हा  ता. राळेगाव या घाटाचा लिलाव जिल्हाधिकारी कार्यालय यवतमाळ यांच्यामार्फत झालेला आहे. यवतमाळ जिल्ह्यात येत असलेल्या भागात वाळूचा उपसा करणे कंत्राटदाराला क्रमप्राप्त असताना त्याच्याकडून वर्धा हद्दीत येत मोठ्या प्रमाणात रेतीचा उपसा होत आहे. याकरिता नियमांना फाटा देत थेट बोटीच्या सहाय्याने तसेच जेसीबीच्या सहाय्याने रेतीचा उपसा होत आहे.याबाबत हिंगणघाट येथील तहसीलदारांना व उपविभागीय महसूल अधिकाऱ्यांना वारंवार निवेदन देऊन योग्य कार्यवाहीची मागणी असून याकडे दुर्लक्ष होत आहे. इतकच नव्हे तर तहसीलदार या घाटमालकाला विशेष सूट देत असल्याचे बोलले जात आहे. या घाटावरील रेतीच्या उपस्याकरिता तहसीलदार आणि महसूल विभागातील काही अधिकाºयांत व्यवहार झाल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे.यामुळे येथे कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी निवेदनातून जगदीश उपासे, राजेश जाधव, श्रीकांत जगताप, दिलीप महाजन, निलेश रोंघे, विकास यादव, रामचंद्र चव्हाण यांच्यासह गावातील नागरिकांनी केली आहे.५०० ट्रक रेतीची उचलयवतमाळ जिल्ह्यातील कंत्राटदाराकडून वर्धा जिल्ह्यातील हद्दीत येत चक्क दिवसाला सुमारे ५०० ट्रक पेक्षा जास्त वाळूची उचल केली जात आहे. हा प्रकार गत २५ ते ३० दिवसांपासून मनमर्जीने सुरू आहे. वाळू उपस्यामुळे नदी पात्रात मोठाले खड्डे तयार झाले असून हा प्रकार एखाद्या मोठ्या अनुचित घटनेला आमंत्रण देणारा ठरत असल्याने योग्य कार्यवाहीची मागणी ग्रामस्थांची आहे.जिल्हाधिकाऱ्यांचे अजब उत्तरया रेती उपस्याची माहिती देण्याकरिता काही नागरिक जिल्हाधिकाऱ्यांकडे गेले असता त्यांना ‘तुम्ही बोटी पकडा’ असे अजब उत्तर देण्यात आले आहे. यामुळे नागरिक अवाक् झाले.तळेगाव परिसरातही नियम डावलून रेतीचा उपसातळेगाव (श्या.पंत.) - गावातून गेलेल्या वर्धा नदीचे पात्र विस्तृत आहे. या पात्रात तिथे तीन ते चार ठिकाणी रेतीघाट आहे. या घाटांचा विशिष्ट कालावधी व काही नियम देत लिलाव करण्यात येतो. यावेळी आखून दिलेले नियम धाब्यावर बसवून मोठ्या प्रमाणात रेती उपसा होत आहे. याची माहिती प्रशासनाला असूनही त्यांच्याकडून याकडे दुर्लक्ष होत आहे. या प्रकारामुळे शासनाचा लाखो रूपये महसूल बुडत आहे.तळेगाव पासून साधारणत: सहा ते सात किलोमीटर अंतरावर भिष्णूर, मुबारकपूर, ईस्लामपूर, नबाबपूर व अजून काही घाट आहेत. रेती माफियांनी या घाटामध्ये रेती उपसा करण्याकरिता आपली यंत्रणा सज्ज केली आहे. रेती उपस्याकरिता पोकलँड व बोटीचा वापर सर्रापपणे होत आहे. या घाटांकडे अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे. महसूल विभागाचे अधिकारी या घाटधारकांकडून मिळालेल्या बक्षीसाच्या भरोशावर गलेलठ्ठ झाले असून त्यांच्याकडून नावालाही कारवाई होत नाही. त्यामुळे या अवैध रेती उपस्याला कुणाचे निर्बंध नाही. जिल्हाधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देत स्वत: कारवाई करण्याची मागणी होत आहे.