लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : वर्धा आणि सेवाग्राम या दोन्ही रेल्वे स्थानकावर खाद्यपदार्थ विकणाऱ्या अवैध वेंडरचा शिरकाव झाला आहे. त्यामुळे प्रवाशांचे आरोग्य निकृष्ट खाद्यपदार्थांमुळे धोक्यात आले आहे. या विषयीची माहिती लोकमतने जाणून घेतली असता महिन्याला १.७५ लाखांची आर्थिक उलाढाल या अवैध व्यवसायामागे असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.वर्धा व सेवाग्राम रेल्वे स्थानकावर लोकमत प्रतिनिधीने काही प्रवाशांना घेऊन फेरफटका मारल्यावर असे निदर्शनास आले की काही विशिष्ट व्यक्तींनाच खाद्यपदार्थ विक्रीसाठी रेल्वे सुरक्षा बलाचे अधिकारी मदत करीत आहे, अशी माहिती येथे कार्यरत व्यावसायिकांनी नाव न प्रकाशित करण्याच्या अटीवर लोकमतच्या प्रतिनिधीला दिली.शिवाय तशी चर्चाही कारवाई करण्याची जबाबदारी असलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये होत आहे. सेवाग्राम येथील फलाटावर दहा हातगाड्या आणि प्रत्येक हातगाडीवर केवळ दोनच व्यक्तींची नेमणूक करून खाद्यपदार्थ विक्री होणे क्रमप्राप्त आहे; पण एका हातगाडीवर पाच ते सहा व्यक्तींकडून खाद्यपदार्थ विक्री होत असल्याचे बघावयास मिळाले. तसेच प्रत्येक महिन्याला नचूकता लक्ष्मीदर्शनाचा लाभ घेऊन हे अवैध वेंडर पोसले जात असल्याने रेल्वे प्रशासनातील वरिष्ठ अधिकाºयांनी याकडे लक्ष देण्याची तसेच विशेष पाऊल उचलण्याची गरज आहे.१.७५ लाखांच्या हिस्सेवाटपाची अशी आहे चर्चाजग्गा १५ हजार, जमिल २० हजार, कन्हैय्या १५ हजार, वीरू १० हजार, कल्लू १० हजार, चंद्रकांत १५ हजार, रंगारी १० हजार, तोला १५ हजार, सुनील १० हजार, जावेद ५ हजार, नासीर ५ हजार, समीर ५ हजार, मामा ५ हजार, नवीन १५ हजार आणि खान नामक व्यक्तीकडून २५ हजार रुपये प्रत्येक महिन्याला रेल्वे सुरक्षा बलाच्या अधिकाºयांना नियमांना डावलून खाद्यपदार्थ आणि इतर साहित्याची विक्री करण्यासाठी दिल्या जात असल्याचे नाव न प्रकाशित करण्याच्या अटीवर एका कर्मचाºयाने सांगितले.अधिकारी बदलताच मनमर्जीने मालसुताई?वर्धा रेल्वे सुरक्षा बलात तत्कालीन पोलीस निरीक्षक सुरेश कांबळे यांनी आपल्या कामामुळे सदर अवैध व्यवसायांवर चांगलाच आटोक्यात आणले होते. परंतु, त्याची वर्धा येथून बदली होताच धावत्या रेल्वेसह रेल्वे फलाटावर नियम डावलून खाद्यपदार्थांसह इतर साहित्य विक्रीच्या प्रकाराला पुन्हा एकदा उधाण आल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे वरिष्ठांनी याकडे लक्ष देण्याची गरज आहे.
रेल्वे फलाटावर लाचखोरीतून बहरतोय अवैध व्यवसाय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2020 06:00 IST
वर्धा व सेवाग्राम रेल्वे स्थानकावर लोकमत प्रतिनिधीने काही प्रवाशांना घेऊन फेरफटका मारल्यावर असे निदर्शनास आले की काही विशिष्ट व्यक्तींनाच खाद्यपदार्थ विक्रीसाठी रेल्वे सुरक्षा बलाचे अधिकारी मदत करीत आहे, अशी माहिती येथे कार्यरत व्यावसायिकांनी नाव न प्रकाशित करण्याच्या अटीवर लोकमतच्या प्रतिनिधीला दिली.
रेल्वे फलाटावर लाचखोरीतून बहरतोय अवैध व्यवसाय
ठळक मुद्देरेल्वे सुरक्षा बलाचे दुर्लक्ष : लाखो रुपयांची उलाढाल