शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपतीपदाच्या निडणुकीचा कार्यक्रम जाहीर, ९ सप्टेंबरला होणार मतदान, निवडणूक आयोगाची घोषणा, असा आहे संपूर्ण कार्यक्रम
2
ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान भारताचा मोठा निर्णय; अमेरिकेकडून 'एफ ३५' जेट खरेदी करणार नाही!
3
"मोहन भागवत यांना पकडण्याचे आदेश होते"; मालेगाव स्फोट प्रकरणी माजी ATS अधिकाऱ्याचा दावा
4
सॅमसंगचे स्मार्ट टीव्ही बंद पडले, ग्राहक ठणाठणा ओरडू लागले; सर्व्हर डाऊनचे मेसेज दिसू लागले...
5
Pune Crime: कोयता काढला अन् सपासप वार करत सुटला; बारामती-इंदापूर धावत्या बसमध्ये प्रवाशावर हल्ला
6
बँकेत नोकरीची सुवर्णसंधी; IPBS ची १०,२७७ पदांवर मेगाभरती, महाराष्ट्रासाठी किती जागा?
7
आता PF काढणं झालं एकदम सोपं! फक्त 'हे' काम करा आणि कागदपत्रांशिवाय काही दिवसांत पैसे मिळवा!
8
ऑगस्ट २०२५ पासून बँकिंग आणि पैशांशी निगडीत नियमांत बदल; तुमच्यासाठी जाणून घेणं अतिशय महत्त्वाचं
9
पत्नीने पतीला नपुंसक म्हणणं गुन्हा आहे?; मुंबई हायकोर्टानं दिला महत्त्वाचा निर्णय
10
मुंबई आणि मालेगाव बॉम्बस्फोटात दुटप्पी राजकारण; केशव उपाध्ये यांचा काँग्रेसवर हल्लाबोल
11
अमेरिका एवढ्या खालच्या पातळीवर जाईल असे...; केव्हा केव्हा भारताविरोधात कारस्थाने रचलेली...
12
"मला कोंडून ठेवलं, पत्नीला दुखापत..."; आमदार चेतन आनंद यांचे एम्स कर्मचाऱ्यांवर गंभीर आरोप
13
जावई पहिल्यांदा सासरवाडीत आला, सासुने मस्त चिकनचा बेत आखला; विषबाधेमुळे दोघांचाही मृत्यू
14
प्रेमाचा त्रिकोण! आमच्या दोघींपैकी एकीला निवड; गर्लफ्रेंडच्या सांगण्यावरून पतीने केला मोठा कांड
15
२४ घरं, ४ प्लॉट, ४० एकर शेतजमीन... १५ हजार पगार असलेल्या क्लार्ककडे ३० कोटींचं घबाड
16
एकमेकांना शेवटचं बघताच आलं नाही! अल्जेरियात मुलाचा मृत्यू, मृतदेहाची वाट पाहणाऱ्या वडिलांचेही निधन 
17
एन चंद्रशेखरन यांच्या हाती पुन्हा टाटा सन्सची धुरा; IPO ची वाट पाहणाऱ्यांना पुन्हा एकदा मोठा झटका
18
वडिलांचा मृत्यू, बॉयफ्रेंडसोबत पळाली आई; लेकाची पोलिसांत धाव, म्हणाला, "ते मला मारुन टाकतील..."
19
नोकरी सुरू होताच १५,००० रुपये तुमच्या खात्यात! मोदी सरकारने आणली 'ही' खास योजना, कंपनीलाही मिळेल फायदा!

पर्यावरण पुरक विसर्जनाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

By admin | Updated: September 13, 2016 00:59 IST

उच्च न्यायालयाने पर्यावरण पुरक विसर्जनाच्या सूचना दिल्या आहेत. असे असताना येथील धाम नदीच्या

कुठल्याही सुविधा नाही : सुरक्षेच्या दृष्टीने केवळ पोलीस प्रशासनाच्या हालचालीपवनार : उच्च न्यायालयाने पर्यावरण पुरक विसर्जनाच्या सूचना दिल्या आहेत. असे असताना येथील धाम नदीच्या तिरावर जिल्हा प्रशासनाच्यावतीने कुठल्याही उपाययोजना करण्यात आल्या नाहीत. या नदी तिरावर केवळ सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस प्रशासनाच्यावतीने काही उपाय योजना आखण्याकरिता हालचाली होत असल्याचे दिसत आहे. ग्रामपंचायत प्रशासनाने साफसफाई कर आकारण्यासंदर्भात जिल्हाधिकारी महोदयांना आमसभेचा ठराव देऊन रितसर परवानगी मागितली होती; परंतु अद्याप तशी परवानगी मिळाली नसल्याने ग्रामपंचायत प्रशासनानेही पुढाकार घेतलेला दिसत नाही. गत वर्षी नदीतून १७ ट्राल्या निर्माल्य व ४० ट्रेलर नदीतील मूर्त्यांचे अवशेष तसेच गाळ काढण्याकरिता ग्रामपंचायतीला अवास्तव खर्च करावा लागला होता. हा खर्च सामान्य फंडातून करण्यात आला होता. आता हा खर्च या फंडातून करू नये असा ठराव ग्रामपंचायतीने घेतला आहे. त्यामुळे हा खर्च कोण करणार यावर प्रश्नचिन्ह लागलेले आहे. जिल्हा परिषद प्रशासन ही बाब ग्रामपंचातीवर ढकलून मोकळी होते. जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत तर या प्रकरणावर कुठली चर्चा होताना दिसत नाही. विसर्जन पर्यावरणपूरक व्हावे या दृष्टीकोनातून पोलीस प्रशासन मात्र हालचाली करताना दिसत असून संदर्भित त्यांनी अनेक बैठकीतून मौखिक सूचनाही केल्याची माहिती देण्यात आली आहे. सुरक्षेच्या दृष्टीकोनातून वॉच टॉवर, प्रकाश योजना, ध्वनीक्षेपक, सिक्यूरिटी गार्डस, पट्टीचे पोहणारे, लाईफ जॅकेटस या सर्व बाबींची व्यवस्था पोलीस प्रशासनाने केलेल्या दिसत आहे. धाम नदी तिरावर नंदीखेडा परिसरात घरगुती गणपती व छत्री परिसरात सार्वजनिक गणेशाचे विर्सजन केले जाते. या दोन्ही ठिकाणी सुरक्षाप्रदान करताना पोलीस प्रशासनाची चखांगीलच दमछाक होते. तसेच वाहतुकीची कोंडी होऊ नये म्हणून छोट्या पुलावरील मार्गाचा अवलंब करावा लागतो. निर्माल्य नदीत जाऊ नये म्हणून बऱ्याच सामाजिक संस्था पुढकार घेतात; परंतु पीओपीच्या मूर्ती मात्र नदीपात्रातच विसर्जित केल्या जातात. त्यामुळे पाण्यामध्ये अनेक रसायने मिसळून पाणी दूषित होते. त्यामुळे पवनार ग्रा.पं. प्रशासनाने पिओपीच्या मूर्तीचे विसर्जन नदीपात्रात करू न देण्याचा ठराव घेतला असला तरी वेळेवर तसा विरोध केल्यास परिस्थिती चिघळण्याची शक्यता नाकारता येत नाही.(वार्ताहर) लोकांनी जागरूक होणे गरजेचे असून निर्माल्य हे आपल्या घरच्या कुंडीतच टाकले तर त्याचे हिरवळीचे खत तयार होईल, तसेच पीओपीच्या मूर्तीची स्थापना करू नये. त्या मूर्तीचे पाण्यात विघटन होत नाही व त्याचे घातक रसायन पाणी अशूद्ध करते. तेव्हा जिल्हाधिकारी महोदयांनी याबाबत कडक कारवाई करून ग्रा.पं. प्रशासनाला पुढील वर्षी साफ सफाई कर आकारण्याची परवानगी दिल्यास पर्यावरणपुरक विसर्जनाची संपूर्ण जबाबदारी ग्रा.पं. प्रशासन घेईल. - अजय गांडोळे, सरपंच, ग्रा.पं. पवनार गतवर्षी प्रमाणेच यावर्षीही पर्यावरण पूरक विसर्जनासाठी पूर्ण उपक्रम राबविले जाईल. निर्माल्य नदीत जाऊ नये म्हणून सामाजिक संघटनेची मदत घेतली जाईल. जि.प. प्रशासनाकडे याकरिता जरी निधीची तरतूद नसली तरी ग्रा.पं. प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने तोडगा काढता येईल. भविष्यात कायमस्वरूपी उपाययोजना आखल्या जातील. - महेश डोईजोड, माहिती शिक्षण संवाद सल्लागार, पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग, जि.प. वर्धा.