शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

बजाज चौकातील खड्ड्यांच्या डागडुजीकडे दुर्लक्ष

By admin | Updated: June 17, 2017 00:47 IST

पावसाळ्याला सुरूवात झाली तरी शहरातील वर्दळीच्या रस्त्यांवरील खड्ड्यांची डागडुजी करण्यात आली नाही.

वाहनचालकांना त्रास : पावसाळ्यापूर्वी दुरुस्तीची मागणी लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : पावसाळ्याला सुरूवात झाली तरी शहरातील वर्दळीच्या रस्त्यांवरील खड्ड्यांची डागडुजी करण्यात आली नाही. बजाज चौकातील खड्ड्यांमध्ये पाणी जमा होऊन पहिल्याच पावसात या चौकात ठिकठिकाणी डबके तयार झाले होते. येथून मार्ग काढताना वाहन चालकांना त्रास सहन करावा लागतो. सदर चौक शहरातील मुख्य वर्दळीचा असल्यामुळे खड्ड्यांची त्वरीत डागडुजी करण्याची मागणी सागर युवा सामाजिक संघटनेने केली आहे. या मागणीचे निवेदन नगर परिषद प्रशासनाला देण्यात आले. बजाज चौकातून वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ सुरू असते. या भागात रस्त्यावरील डांंबर उखडले असून ठिकठिकाणी खड्डे पडले आहे. अनेकदा खड्डे चुकविण्याच्या प्रयत्नात वाहन चालकांना अपघात होतात. रस्त्यावर खोल खड्डे पडले आहे. पावसाळ्यात खड्ड्यात पाणी साचल्याने वाहन चालकांना खड्डे नजरेस पडत नाही. त्यामुळे येथे मोठी दुर्घटना होण्याचा धोका आहे. येथील परीस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन बांधकाम विभागाच्यावतीने तात्काळ खड्डे बुजविण्याची कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली. या चौकातील रस्त्याची दुरूस्ती करणे गरजेचे झाले आहे. १५ दिवसांच्या आत बजाज चौकातील काम पूर्ण करण्यात यावे, अन्यथा सागर युवा सामाजिक संघटनेच्यावतीने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला. या मागणीचे निवेदन न.प. बांधकाम सभापती निलेश किटे यांनी स्वीकारले. सागर युवा सामाजिक संघटनेचे निवेदन वर्धा-यवतमाळ मार्गाचे बांधकाम सुरू आहे. सदर काम अत्यंत संथगतीने होत असल्याने या मार्गावरील वाहतूक प्रभावीत होत आहे. सावंगीपर्यंत एकेरी वाहतूक सुरू असल्याने वाहतुकीचा मोठ्या प्रमाणात खोळंवा होतो. सदर बांधकामाला गती देण्याची मागणी निवेदनातून केली. यावेळी संदीप कुत्तरमारे, उमाकंत काळे, रिजवाण अली, गुंजन मेंढुले, राजू मेंढुले, किशोर शेंडे, प्रशांत कांबळे व पदाधिकारी उपस्थित होते.