शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर जायचेय आठ हजार द्या...चंद्रपूर जायचे असेल तर 12 हजार मोजा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 05:00 IST

कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत चालली आहे. यामुळे खासगी तसेच कोरोना सेंटर हाऊसफुल्ल झाली आहे.  शिवाय घरी उपचार घेत असलेल्या गंभीर रुग्णाला रुग्णालयात जाण्यासाठी खासगी रुग्णवाहिकेमध्ये ऑक्सिजन सेवा उपलब्ध असलेल्या रुग्णवाहिकेच्या शोधात रुग्णांच्या नातेवाइकांना फिरावे लागते. उपप्रादेशिक परिवहन विभागाने दर ठरवून दिलेले असताना रुग्णांच्या नातेवाइकांना खासगी रुग्णवाहिकेच्या चालक मालकांकडून लुटले जात आहे.

ठळक मुद्देखासगी रुग्णवाहिकेकडून लूट : रुग्णांच्या नातेवाइकांकडून आकारले जातेय अधिकचे भाडे

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे नागरिक चिंतेत आहेत. याच परिस्थितीचा फायदा घेत खासगी रुग्णवाहिकेमध्ये ऑक्सिजनची सुविधा उपलब्ध असलेल्या  रुग्णवाहिकेकडून रुग्णांच्या नातेवाइकांची लूट सुरू आहे. नागपूरला रुग्ण घेऊन जायचे असल्यास आठ हजार रुपये, तर चंद्रपूर येथे जायचे असल्यास १२ हजार रुपये अधिकचे भाडे आकारण्यात येत असून रुग्णांच्या नातलगांची एकप्रकारे लूट सुरू आहे. मृतदेह स्मशानभूमीपर्यंत नेण्यासाठी कुटुंबीय व नातेवाइकांकडून खासगी रुग्णवाहिकाचालक तासाला अव्वाच्या सवा पैसे घेत आहेत. इतकेच नव्हेतर रुग्णांना बाहेर जिल्ह्यातील रुग्णालयांत नेण्यासाठीही अधिकचे भाडे आकारण्यात येत असल्याचे दिसून येत आहे. एका रुग्णाला वर्ध्याहून नागपूरच्या रुग्णालयात नेण्यासाठी चक्का खासगी रुग्णवाहिकाचालकाने आठ हजार रुपये भाडे आकारले तर हिंगणघाट येथून चंद्रपूरला जाण्यासाठी तब्बल १२ ते १४ हजार रुपये आकारण्यात आल्याने रुग्णांच्या नातलगांची चांगलीच लूट होत आहे. हे म्हणजे मृताच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा प्रकार आहे.कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत चालली आहे. यामुळे खासगी तसेच कोरोना सेंटर हाऊसफुल्ल झाली आहे. शिवाय घरी उपचार घेत असलेल्या गंभीर रुग्णाला रुग्णालयात जाण्यासाठी खासगी रुग्णवाहिकेमध्ये ऑक्सिजन सेवा उपलब्ध असलेल्या रुग्णवाहिकेच्या शोधात रुग्णांच्या नातेवाइकांना फिरावे लागते. उपप्रादेशिक परिवहन विभागाने दर ठरवून दिलेले असताना रुग्णांच्या नातेवाइकांना खासगी रुग्णवाहिकेच्या चालक मालकांकडून लुटले जात आहे. खासगी रुग्णवाहिका सेवेच्या नावाखाली व्यवसाय करीत असल्याचे दिसून येत आहे. कोरोनाच्या संकटकाळात ऑक्सिजन सेवा असलेली रुग्णवाहिका मिळणे हे भाग्य असल्याचे समजून रुग्णांचे नातेवाईक रुग्णवाहिका  चालकाचे भाडे आकारणी करेल तेवढे देत आहे. याकडे उपप्रादेशिक परिवहन विभागाने लक्ष दिल्यास नागरिकांना लुटणाऱ्या खासगी रुग्णवाहिकेचे चालक मालक सुतासारखे सरळ होतील. 

सेवा भाव गेला कुठे ?खासगी रुग्णालयांसह विविध संस्था, राजकीय पक्षांच्या नेत्यांनी या धंद्यात शिरकाव केला आहे. त्यांच्यात कमाईसाठी सुरू असलेल्या स्पर्धेमुळे  या सेवेचे बाजारीकरण झाले आहे. याचा फटका मात्र, आधीच रुग्णांच्या आजारपणामुळे हतबल झालेल्या रुग्णांच्या नातलगांना बसत असून, सेवा भाव गेला कुठे, अशी म्हणण्याची वेळ या संकट काळात आली आहे.

जिल्ह्यात १०७ रुग्णवाहिकांची नोंदवर्धा जिल्ह्यात एकूण १०७ रुग्णवाहिका आहे या रुग्णवाहिकांची नोंद उपप्रादेशिक परिवहन विभागाकडे करण्यात आली आहे. मात्र, प्रत्यक्षात शेकडो खासगी रुग्णवाहिका जिल्हाभर धावताना दिसतात. बहुतांश खासगी रुग्णालयाकडे स्वत:ची खासगी रुग्णवाहिका आहे. १०८ क्रमांकाची रुग्णवाहिका खासगी रुग्णालयात रुग्णांना नेत नाहीत. मात्र, अनेकवेळा गंभीर रुग्णाला खासगी मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल्समध्ये नेणे गरजेचे असते. त्यामुळे रुग्ण व नातेवाइकांना खासगी रुग्णवाहिकेचाच आधार घ्यावा लागतो.  त्यामुळे खासगी रुग्णवाहिकेचा चालक वाटेल तेवढे पैसे घेऊन रुग्णांच्या नातेवाइकांची लूट करीत आहेत.

अनेक रुग्णवाहिकांची नोंदीकडे पाठ रुग्णवाहिका घेतल्यानंतर तिची पासिंग होतानाच रुग्णवाहिका म्हणून आरटीओ  कार्यालयात नोंद होते. मात्र, काही जणांनी आधी व्हॅनसारखी वाहने घेतली आहेत. नंतर पुढे त्यांना रुग्णवाहिका करून व्यवसाय सुरू केला आहे. त्यांची वाहन म्हणून नोंदणी असली तर रुग्णवाहिका म्हणून नोंद नाही. अशा अनेक रुग्णवाहिका जिल्ह्यात धावत असल्याची माहिती आहे.  विशेष म्हणजे रुग्णवाहिका असल्याने त्यांना रस्त्यावर तपासलेही जात नाही. याचाच फायदा ते घेत आहे.

बेदारकपणे चालविणे झाले धोक्याचे एका खासगी रुग्णवाहिकेच्या चालकाने रुग्णवाहिका बेदारकपणे चालविल्याने रविवारी ठाकरे मार्केट परिसरात रुग्णवाहिका रस्तादुभाजकावरील मातीत फसली. दरम्यान, रुग्णवाहिकेतील कुणालाही इजा झाली नाही.  वास्तविक रुग्णाला सुस्थितीत रुग्णालयात पोहोचविणे रुग्णवाहिका चालकाचे काम असते. करकचून ब्रेक मारणे, खड्ड्यातून वेगात नेणे, अशा प्रकारामुळे रुग्णाला त्रास होतो. मात्र, एखाद्या रुग्णाला दवाखान्यात सोडत असताना दुसऱ्या रुग्णांसाठी फोन आलाच तर पहिल्या रुग्णाला दवाखान्यात पोहोचविण्यासाठी वाहनचालकाला घाई सुटते.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याhospitalहॉस्पिटल