शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टीलच्या ग्लासात सुतळी बॉम्ब ठेवून फोडला; २० वर्षीय युवक जीवाला मुकला, कुठे घडला भयानक प्रकार?
2
भाजपा मंत्र्यांच्या समर्थकांची गुंडगिरी; युवकाला नाक घासून माफी मागायला लावली, पोलिसही हतबल
3
सुवर्णाची झळाळी, शिर्डीत लक्ष्मीपूजनाचा सोहळा; साईमंदिरात दिवाळी, साई मूर्तीवर अडीच कोटींचे अलंकार
4
पाकिस्तानात मोठा हल्ला, २५ सैनिक मारले गेले; TTP चा खैबर पख्तूनख्वा इथल्या लष्करी तळावर कब्जा
5
एका रात्रीत मोठा गेम! महायुतीचेच ३ माजी आमदार भाजपा फोडणार?; स्थानिक कार्यकर्तेच संतापले
6
क्रिकेटमधील पराभव जिव्हारी लागला, १०० च्या स्पीडने कार पळवली; दिवाळीची खरेदी करणाऱ्यांना चिरडले
7
ट्रेनमधील पांढऱ्या बेडशीट्स विसरा; भारतीय रेल्वे आता देणार खास प्रिंटेड कव्हर ब्लँकेट्स !
8
Mumbai: व्हॅनमधून रडण्याचा आवाज आला, पोलिसांनी पुढं जाऊन पाहिलं तर...; घटनेनं परिसरात खळबळ!
9
दिवाळीत ₹6 लाख कोटींची विक्रमी उलाढाल; भारतीयांची 'Made In India' वस्तूंना पसंती
10
कोण आहे फ्रांसेस्का ऑर्सिनी? ज्यांच्याकडे ५ वर्षाचा ई-व्हिसा असूनही भारतात प्रवेश नाकारला
11
Crime: आधी हात-पाय बांधले, नंतर उशीनं तोंड दाबलं...; व्यसनमुक्ती केंद्रातील घटनेनं खळबळ!
12
ODI Record: वनडेमध्ये आतापर्यंत कधीच 'असं' घडलं नव्हतं, ते वेस्ट इंडीजनं केलं!
13
सोलापूरात भाजपात दुफळी! "बाहेरून येणाऱ्यांनी किमान ३-४ वर्ष पक्षाचं काम करावं, त्यानंतरच.."
14
मोठी बातमी! १२ हजार भावांनी घेतला लाडकी बहीण योजनेचा लाभ; १६४ कोटींचा घोटाळा आला समोर
15
मुहूर्त ट्रेडिंग: शेअर बाजारात तेजी; निफ्टी वर्षाच्या सर्वोच्च पातळीवर, सेन्सेक्स 62 अंकांनी वधारला
16
Mumbai Fire: माजी उपमहापौर अरुण देव यांच्या अंधेरी येथील घराला आग
17
२० एकर जमिनीसाठी लेकीने आईचा घेतला बळी, पतीच्या मदतीने मृतदेह रिक्षात भरला अन् तितक्यात...
18
BCCI: "आशिया चषक भारताला न दिल्यास..." बीसीसीआयचा मोहसिन नक्वी यांना इशारा!
19
Beed: फटाका विझलाय समजून पुन्हा पेटवायला गेला अन्...; बीडमध्ये सहा वर्षांच्या मुलासोबत भयंकर घडलं!
20
"तात्या विंचू तुम्हाला चावेल...", संजय राऊतांच्या टीकेवर महेश कोठारेंची प्रतिक्रिया, म्हणाले- "ते माझ्याविषयी जे बोलले..."

प्रश्न विचारायला शिकाल तर विचार प्रक्रियेला गती मिळेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2017 22:19 IST

निरंतर शिक्षणातून नाविण्यपूर्ण गोष्टी शिकायला मिळतात. शिक्षण घेताना केवळ ‘फॅक्ट्स अ‍ॅड फिगर’ लक्षात घेण्यापुरत्या नसाव्या तर जे शिक्षण आपण ग्रहण करतो त्यावर विचार करायला हवा.

ठळक मुद्देपर हेगन्स यांचे प्रतिपादन : २३७ गरजू विद्यार्थिनींना शिष्यवृत्ती देऊन सहकार्य

आॅनलाईन लोकमतवर्धा : निरंतर शिक्षणातून नाविण्यपूर्ण गोष्टी शिकायला मिळतात. शिक्षण घेताना केवळ ‘फॅक्ट्स अ‍ॅड फिगर’ लक्षात घेण्यापुरत्या नसाव्या तर जे शिक्षण आपण ग्रहण करतो त्यावर विचार करायला हवा. आयुष्यात नेहमी प्रश्न विचारायला शिका, प्रश्न पडला म्हणजे विचारप्रक्रियेला गती मिळते आणि त्यातूनच प्रश्नांची उकल होते, असे मत आयकेईए फाउंडेशन, नेदरलँडचे सीईओ पर हेगन्स यांनी व्यक्त केले.लीला पुणावाला फाउंडेशनतर्फे बोरगाव (मेघे) येथील औषधीनिर्माण व संशोधन संस्थेत आयोजित कार्यक्रमात गरजू व गुणवंत विद्यार्थिनींना रविवारी शिष्यवृत्तीचे वितरण करण्यात आले. यावेळी पर हेगन्स कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून बोलत होते. भारत देशाला ऐतिहासिक वारसा लाभला आहे. भारतीय संस्कृतीचा इतिहास समृद्ध व वैविध्यपूर्ण आहे. देशातील मुलींचेही समाजाप्रती काही कर्तव्य आहे जे त्यांनी पार पडायला हवेत, असा संदेश त्यांनी विद्यार्थिनींशी संवाद साधतांना दिला.यावेळी फाउंडेशनच्या अध्यक्षा पद्मश्री लीला पुणावाला, फिरोज पुणावाला, रोडा मेहता, कारेन हेगन्स, पॅट्रीक आॅबेनो, अल्का भुगूल, सारीका डेहनकर, योगिता मानकर, स्मिता बढिये यांची उपस्थिती होती.यावेळी नर्सिंग, अभियांत्रिकी, फार्मसी अभ्यासक्रमात शिक्षण घेत असलेल्या जिल्ह्यातील २३७ गरजु व गुणवंत विद्यार्थिनींना शिष्यवृत्ती वितरीत करण्यात आली. ही शिष्यवृत्ती टप्प्याटप्प्याने देण्यात येणार आहे. मागील वर्षी २७६ विद्यार्थिनीची शिष्यवृत्तीकरिता निवड करण्यात आली होती. मुलींना मार्गदर्शन करताना लीला पुणावाला म्हणाल्या, ज्या विद्यार्थिनींना शिष्यवृत्ती मिळाली आहे त्या ‘लीला गर्ल्स’ आहेत. त्यांच्या शिक्षणासोबतच सर्वांगीण विकासाची जबाबदारी आम्ही घेतली आहे. या विद्यार्थिनींना इंग्रजी भाषेसह संवाद कौशल्य, व्यक्तीमत्व विकास, विविध कला गुणांचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. विद्यार्थिनींनी आपली गुणवत्ता सिद्ध करायची आहे. समाजाकडून आपण काही घेतले ते भविष्यात समाजालाच परत करायचे, असेही त्या पुढे म्हणाल्या. फिरोज पुणावाला यांनी मत व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन आयरिन डेविड व युनिता कोसे यांनी केले. आभार समृद्धी खराडे यांनी मानले. विद्यार्थिनी, पालकवृंद यावेळी उपस्थित होते. पूनम जैन, स्रेहल कुबडे, चांदणी गोपाल, शिवानी बत्तुलवार, सुरभी मोरस्कर, प्रिया पेठीया, ममता चौबे, मृणाल राऊत, साक्षी पिम्परवर, मोनाली वाळके, नेहा खेडकर, अंजली मंडळ, आम्रपाली रामटेके, भक्ती मुर्दिओ यांनी सहकार्य केले.