शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

युवकांना सर्वोदयशी जोडल्यास संजीवनी प्राप्त होईल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2018 22:14 IST

भारत देश युवकांचा देश आहे. त्यामुळे युवकांना एकत्र करणे गरजेचे आहे. त्यांना विचार दिल्यास योग्य शक्तीचा उपयोग होऊ शकतो.

ठळक मुद्देएस.एन. सुब्बाराव : अखिल भारतीय सर्वोदय समाज संमेलनाचा समारोप

ऑनलाईन लोकमतसेवाग्राम : भारत देश युवकांचा देश आहे. त्यामुळे युवकांना एकत्र करणे गरजेचे आहे. त्यांना विचार दिल्यास योग्य शक्तीचा उपयोग होऊ शकतो. याच युवकांना सर्वोदयाशी जोडल्यास संजीवनी प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही, असे मत गांधी विचारवंत व राष्ट्रीय युवा योजनेचे डॉ. एस.एन. सुब्बाराव यांनी व्यक्त केले.सर्वोदय समाज संमेलनाचा समारोप रविवारी झाला. अध्यक्षस्थानी डॉ. सुब्बाराव तर अतिथी म्हणून न्या. चंद्रशेखर धर्माधिकारी, राधाबहन भट, जयवंत मठकर, डॉ. उल्हास जाजू आदी उपस्थित होते. डॉ. सुब्बाराव पूढे म्हणाले की, आज हिंसामुक्त भारत पाहिजे. भाषेच्या नावावर विरोध होता कामा नये. आजही देशात भुकेलेल्यांचे प्रमाण ३० कोटी आहे. ग्रामोद्योगाच्या माध्यमातून देशातील रोजगाराचा प्रश्न सुटू शकतो. पर्यावरण रक्षण व भ्रष्टाचार मुक्तीसाठी सर्वांनी प्रयत्न करावे, असे आवाहनही त्यांनी केले. न्या. धर्माधिकारी यांनी माणसांचे जीवन निर्भय असावे. निडलेस लाईफ असावी, ग्रीड बेस नसावे. धर्मनिरपेक्ष समाज व्यवस्था असावी. शोषण समाप्त व्हावे. समानता व सर्वांचा आदर झाला पाहिजे, असे सांगितले. डॉ. जाजू यांनी सामाजिक स्तरावरील कामात वैयक्तिकता आणू नये. निष्ठापूर्ण कामात यश मिळते. शरीरात श्वासाचे महत्त्व असते. बुद्धीत अहंकाराला स्थान देता कामा नये. मैत्री सर्वोदयचे हृदय आहे. मतभिन्नता असू शकते; पण मनभिन्नता होऊ देऊ नका, असे सांगितले. याप्रसंगी सर्व स्वयंसेवक व कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला.शेवटी घोषणापत्राचे वाचन करण्यात आले. यात दारूमुक्त भारत बनविणे, राष्ट्रनिर्माणासाठी अहिंसा मार्ग स्वीकारून युवकांत संजिवनी निर्माण करणे, स्थानिक संसाधनांचा उपयोग आणि रोजगार वाढविणे, महिला शेतकरी, आदिवासी सिस्टम-पासून पिडीत असून निर्भयतेसाठी काम करणे, गणतंत्र व पंचायत राजला अधिक बळकट करणे, गांधीजींच्या स्वप्नाला पूर्ण करण्यासाठी ग्राम-स्वराज्याला वाढविणे, अंत्योदयाची सुुरुवात करणे, सर्वोदय समाजाला व्यापक बनविणे, जय जगत नारा अधिक प्रभावी व्हावा, मूलभूत मुल्यांवरील संकटांचा सामना करण्यासाठी आम्ही सर्व सर्वोदयी व गांधीजन तत्पर असावे, असे दहा मुद्यांचे वाचन संयोजक आदित्य पटनायक यांनी केले. संचालन गिताजंली पटनायक व महादेव विद्रोही यांनी केले तर आभार डॉ. सुगम बरंठ यांनी मानले. संमेलनात देशभरातील ४५०० सर्वोदयी सहभागी झाले होते.पारंपरिक नृत्य सादरीकरणअखिल भारतीय सर्वोदय समाज संमेलनात सहभागी होण्याकरिता देशातील कानाकोपºयातून सर्वोदयी आले होते. सोबतच आसाम, त्रिपूरा येथून काही स्वयंसेवकही आले होते. त्यांनी समारोपीय कार्यक्रमात पारंपरिक लोकनृत्यातून कला, संस्कृतीचे सादरीकरण केले.