शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
2
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
3
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
4
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
5
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
6
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
7
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
8
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
9
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
10
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
11
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
12
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
13
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
14
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
15
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
16
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
17
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
18
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
19
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
20
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार

सिंचनात निष्काळजीपणा केल्यास माफी नाही

By admin | Updated: November 3, 2015 02:42 IST

बोरधरण तसेच डोंगरगाव धरण क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या शेताच्या शेवटच्या टोकापर्यंत पाणी पोचविण्यास कुचराई करणाऱ्या

वर्धा : बोरधरण तसेच डोंगरगाव धरण क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या शेताच्या शेवटच्या टोकापर्यंत पाणी पोचविण्यास कुचराई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल. असा दम आ. डॉ. पंकज भोयर यांनी बोरधरण येथे आयोजित कालवे सल्लागार समितीच्या बैठकीत दिला. याप्रसंगी जि.प.सदस्य अरूण उरकांदे, कार्यकारी अभियंता ढवळे उपस्थित होते. लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी पाटचऱ्याच्या अनेक तक्रारी आ. भोयर यांच्याकडे मांडल्या. यावर आमदारांनी अधिकाऱ्यांना खडसावत एका महिन्याच्या आत शेतकऱ्यांनी उपस्थित केलेल्या समस्यांचा अहवाल सादर करून कोणत्या कामाला किती निधीची आवश्यकता आहे, त्याचा सादर सादर करण्याचे निर्देश दिले. सेलडोह येथील शेतकऱ्याने गत चार वर्षांपासून सायपन दुरूस्तीसाठी पाठपुरावा केल्याचे पुरावेच आमदारांना दिले तर हिंगणीचे अशोक मुडे यांनी अपुऱ्या मनुष्यबळामुळे सिंचनाच्या कामात अडथळे येत असल्याची बाब आमदारांच्या निदर्शनास आणून दिली. केळझरचे धनंजय थुल, खडकीचे राजू लाडीस्कर, महाबळ्याचे अरूण ठोंबरे, मंडगावचे उपसरपंच राजेंद्र खाडे, तुळजापूरचे प्रमोद तमगिरे, घोराडचे विठ्ठल झाडे, अशोक तेलरांधे, हिंगणीचे सुरेंद्र पाटील बोरचे शालिक करपाते, हरि विचोरे, गेंदलाल अमनेरकर, मुकुंद गावंडे यांच्यासह अनेक शेतकऱ्यांनी मुख्यत: पाटबंधारे विभागाच्या जमिनीवरील अतिक्रमण, कामाचा निकृष्ट दर्जा, पाण्याचे योग्य नियोजन नसने, पाणी सोडल्यावर कालव्याची दुरूस्ती करणे, कर्मचारी मुख्यालयी नसणे, अशा समस्या मांडल्या. शेतकऱ्यांशी संवाद साधतांना अधिकाऱ्यांनी संवेदनशील राहावे, असे निर्देश यावेळी त्यांनी दिल्या.कालव्याचे काम चालू असताना ते जर निकृष्ट दर्जाचे होत असेल तर त्याबाबत ताबडतोब माझ्याशी संपर्क साधावा, असे आवाहन शेतकऱ्यांना केले. यावेळी शेतकऱ्यांची उपस्थिती होती.(प्रतिनिधी)