शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
7
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
8
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
9
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
10
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
11
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
12
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
13
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
14
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
15
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
16
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
17
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
18
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
19
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
20
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन

सरपंच सक्षम असल्यास गावाचा विकास निश्चित होतो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2019 00:03 IST

गावाचा विकास करणे ग्रामसेवकासह सरपंचांच्या हातात आहे. सरपंच हा गाव विकासाचा मुख्य घटक असून ज्या गावचा सरपंच सक्षम, त्या गावाचा विकास उत्तम होतो. सरकारच्या अनेक योजनांचा निधी आता थेट ग्रामपंचायतस्तरावर मिळत असल्याने सरपंचांना मोठ्या प्रमाणात अधिकार मिळाले आहेत.

ठळक मुद्देरामदास तडस : लोणी येथे सत्कार सोहळा

लोकमत न्यूज नेटवर्कदेवळी : गावाचा विकास करणे ग्रामसेवकासह सरपंचांच्या हातात आहे. सरपंच हा गाव विकासाचा मुख्य घटक असून ज्या गावचा सरपंच सक्षम, त्या गावाचा विकास उत्तम होतो. सरकारच्या अनेक योजनांचा निधी आता थेट ग्रामपंचायतस्तरावर मिळत असल्याने सरपंचांना मोठ्या प्रमाणात अधिकार मिळाले आहेत. जिल्हा परिषदेपेक्षा ग्रामपंचायतीचे महत्त्व वाढल्याने निधीचा योग्य विनियोग करण्यासाठी सरपंचांनी नियोजन करावे. तसाच लोकसहभाग व सर्व सदस्यांना सोबत घेऊन सरपंचांनी आपल्या गावांचा कायापालट करावा, असे आवाहन खासदार रामदास तडस यांनी केले.लोणी येथे येथे खासदार स्थानिक विकास निधी २०१८-१९ अंतर्गत ८ लाख रुपयांतून विविध विकासकामे, जिल्हा परिषदेअंतर्गत १ कोटी रुपयांचे आरोग्य उपकेंद्र, जिल्हा परिषद १७ सामूहिक निधीअंतर्गत ४.५० लाखांची विकास कामे, मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून २.७३ लक्ष किमतीचे रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन तसेच मान्यवरांचा सत्कार कार्यक्रम खासदार तडस यांच्या हस्ते झाला.यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला माजी सरपंच साहेबराव ढोणे, जिल्हा परिषदेच्या आरोग्य व शिक्षण सभापती जयश्री गफाट, पंचायत समिती सभापती विद्या भुजाडे, जिल्हा परिषदेच्या सदस्य सुनीता राऊत, पंचायत समिती सदस्य युवराज खडतकर, दिलीप अग्रवाल, सुनील गफाट, दीपक फुलकरी, गजानन राऊत, दशरथ भुजाडे, अरविंद झाडे, चंद्र्रकांत ठाकरे, सरपंच सविता सपाट, उपसरपंच नरेश निकम, सरपंच गजानन हिवरकर, माजी जिल्हा परिषद सदस्य सदस्य यशोदा मेंढे, सदस्य उषा गजबे, माया तिरळे, कुसुम जगताप आदी प्रामुख्याने उपस्थित होते.खासदार तडस म्हणाले, कमी कालावधीत सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याचे प्रश्न मार्गी लागलेत. सततच्या पाठपुराव्याने विविध विकासकामे मंजूर करण्यात आली आहेत, तसेच नितीन लोणकर यांनी गावातील तसेच परिसरातील नागरिकांचे आरोग्य हित लक्षात घेऊन आरोग्य केंद्राकरिता १ एकर जागा दिली, ही अभिमानास्पद बाब आहे, असेही यावेळी म्हणाले.यावेळी नितीन लोणकर यांचा सत्कार करण्यात आला तसेच गावातील विविध क्षेत्रामध्ये कार्य करणाऱ्या मान्यवरांचासुद्धा यावेळी सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे संचालन सदस्य वैभव श्यामकुवर यांनी केले तर आभार सदस्य उमेश जंगले यांनी मानले. कार्यक्रमाला खेडकर, सुभाष लोणकर, किशोर लोणकर गोविंदा हांडे, मोनाली आडकिने, शंकर राऊत, हिंमत मेश्राम, वसंतराव लोणकर, पुंडलिक निमकर, हर्षल भोयर, प्रफुल्ल मेश्राम, सोनाली चहारे, आकाश कोल्हे, अजंली तिरळे, आरती तिरळे, हेमंत लांडगे, तुषार लोणकर, अतुल कानफाडे, नितीन सपाट, जगदीश पायघन, संजू ढोणे, अरुण पेटकर, विवेक ढोणे, कवडू भोयर, अनिल पारधी, प्रकाश भोयर, वैभव जंगले, विनोद भोयर, किशोर जाचक, संजय कवाडे, मंगलदीप गाडे, दिपक इंगोले, राज पवार, प्रतीक्षा बचत गटाच्या अध्यक्ष, सदस्य महिला, गुरुदेव सेवा मंडळाचे सदस्य व लोणी येथील ग्रामस्थ, परिसरातील गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :Ramdas Tadasरामदास तडसsarpanchसरपंच