शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

पाणीपट्टी वसुलीची उद्दिष्टपूर्ती न झाल्यास पाणीपुरवठा होणार खंडित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 05:00 IST

सुरुवातीपासून ग्रामपंचायतीने पाणीपट्टी वसुलीकडे दुर्लक्ष केल्याने ऑगस्ट महिन्यापर्यंत चालू पाणीपट्टीपैकी केवळ ०.७४ टक्के, तर थकीत वसुली शून्य टक्के झाल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे २३ सप्टेंबर रोजी झालेल्या जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण विशेष सभेत सभागृहाने नाराजी व्यक्त केली, तसेच ३१ ऑक्टोबरपूर्वी २० टक्के, ३० नाव्हेंबरपूर्वी ४० टक्के, तर ३१ डिसेंबरपर्यंत ६० टक्के वसुली न झाल्यास ग्रामपंचायतचा पाणीपुरवठा खंडित करण्यासंदर्भात ठराव पारित केला. 

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : गावांना शुद्ध पाणी मिळावे याकरिता जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या माध्यमातून आठ पाणीपुरवठा योजना कार्यान्वित केल्या आहेत. या योजनेवर जिल्हा परिषदेकडून दरवर्षी तीन ते साडेतीन कोटींचा खर्च केला जातो; परंतु पाणीपट्टी वसूल करण्याकरिता ग्रामपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने या योजनांची थकबाकी वाढली आहे. त्यामुळे दिलेल्या उद्दिष्टानुसार वसुली न झाल्यास गावांचा पाणीपुरवठा खंडित केला जाईल. त्यामुळे तातडीने वसुली करा, असे निर्देश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी ग्रामपंचायतींच्या सरपंच आणि सचिवांना दिलेत.जिल्ह्यातील  साहूर व २ गावे, भारसवाडा व सहा गावे, वडाळा, नारा व १९ गावे, बेलोरा व ६ गावे, अल्लीपूर व ५ गावे, कोरा-साखरा आणि नाचनगाव-गुुजखेडा या आठ प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांकडे एकूण ३ कोटी ८२ लाख ०६ हजार १९३ रुपयांची थकबाकी असून वसुली केवळ २ लाख ३१ हजार २४२ इतकीच झाली. सुरुवातीपासून ग्रामपंचायतीने पाणीपट्टी वसुलीकडे दुर्लक्ष केल्याने ऑगस्ट महिन्यापर्यंत चालू पाणीपट्टीपैकी केवळ ०.७४ टक्के, तर थकीत वसुली शून्य टक्के झाल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे २३ सप्टेंबर रोजी झालेल्या जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण विशेष सभेत सभागृहाने नाराजी व्यक्त केली, तसेच ३१ ऑक्टोबरपूर्वी २० टक्के, ३० नाव्हेंबरपूर्वी ४० टक्के, तर ३१ डिसेंबरपर्यंत ६० टक्के वसुली न झाल्यास ग्रामपंचायतचा पाणीपुरवठा खंडित करण्यासंदर्भात ठराव पारित केला. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी पाणीपुरवठा योजनेतील ग्रामपंचायतींना पत्र पाठवून सरपंच आणि ग्रामसेवकांची आज शुक्रवारी सुनावणी घेतली. या सुनावणीला जिल्हा परिषद अध्यक्ष सरिता गाखरे, उपाध्यक्ष वैशाली येरावार, सभापती माधव चंदनखेडे व सभापती मृणाल माटे, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता दीपक वाघ यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. यावेळी ठरवून दिलेल्या उद्दिष्टानुसार पाणीपट्टीची वसुली करावी. पाणीपट्टीअभावी पाणीपुरवठा खंडित झाल्यास सर्वस्वी जबाबदारी सरपंच आणि ग्रामसेवकांची राहणार, असेही स्पष्ट केले असून त्यांच्याकडून हमीपत्रही भरून घेण्यात आले. आता ग्रामपंचायतीपुढे पाणीपट्टी वसुलीचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे.

आठ प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांच्या पाणीपट्टीची थकीत आणि चालू वसुलीची टक्केवारी फारच कमी असल्याने आज जवळपास ४० ग्रामपंचायतीच्या सरपंच आणि ग्रामसेवकांची सुनावणी घेण्यात आली. यात सर्वच ग्रामसेवक उपस्थित झाले होते. काही सरपंच उपस्थित न झाल्याने तीन दिवसानंतर त्यांची सुनावणी ठेवण्यात आली आहे. त्यांना तात्काळ उद्दिष्टानुसार वसुली करण्याच्या सूचना दिल्या असून त्यांच्याकडून हमीपत्र भरुन घेतले.डॉ. सचिन ओम्बासे, मुख्य कार्यकारी अधिकारी. जि.प.वर्धा

 

टॅग्स :zpजिल्हा परिषदwater transportजलवाहतूक