हिंगणघाट : येथील मोहता चौक परिसरातील एका कापडाच्या दुकानातून चोरट्याने रोख व कपडे असा एकूण १ लाख ६६ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. ही घटना शुक्रवारी सकाळी उघड झाली. या प्रकरणी हिंगणघाट पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहीत जयचंद लोनिया रा. राममंदिर वॉर्ड हे आज सकाळी दुकान उघडण्याकरिता गेले असता त्यांना दुकानाचे शटर वाकून असल्याचे दिसून आले. त्यांनी दुकान उघडून पाहणी केली असता दुकानातून कपडे व रोख लंपास केल्याचे दिसून आले. त्यांच्या दुकानातून ३२ हजार रुपयांच्या रोखीसह कपडेही लंपास केल्याचे समोर आले. या प्रकरणी भादंविच्या ४५७, ३८० कलमान्वये गुन्हा दाखल आहे.(तालुका प्रतिनिधी) रोहित्रातून तांब्याची तार पळविलीदेवळी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असलेल्या रामपूर (फतेपूर) येथील रोहित्रातून तांब्याची तार लंपास केल्याचे दिसून आले. ही घटना शुक्रवारी सकाळी उघड झाली. या प्रकरणी कनिष्ठ अभियंता अमोल बोंडे याच्या तक्रारीवरून भादंविच्या कलम ३७९ व विद्युत कायद्याच्या कलम १३६, १३९ कलमान्वये गुन्हा अज्ञात आरोपीविरूद्ध दाखल करण्यात आला आहे. सौर पथदिव्याची बॅटरी बेपत्तादेवळी पोलीस ठाण्यांतर्गत येत असलेल्या पडेगाव येथील ग्रामपंचायतीच्या हद्दीतील सौर दिव्याच्या दोन बॅटऱ्या लंपास करण्यात आल्या. ही घटना शुक्रवारी सकाळी उघड झाली. या प्रकरणी सचीव राजेंद्र बावणकर यांच्या तक्रारीवरून देवळी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे.
कापड दुकानातून दीड लाखांचा ऐवज लंपास
By admin | Updated: August 8, 2015 02:18 IST