शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

थंडावलेल्या खेम्यात पवार किती भरणार ऊर्जा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2017 22:44 IST

राज्याच्या नव्हे तर देशाच्या राजकारणातील वजनदार नेतृत्व माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांचा विदर्भ दौरा बुधवारपासून सुरू झाला.

ठळक मुद्देमुक्कामी दौºयाची उत्सुकता : कार्यकर्त्यांना करणार मार्गदर्शन

अभिनय खोपडे।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : राज्याच्या नव्हे तर देशाच्या राजकारणातील वजनदार नेतृत्व माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांचा विदर्भ दौरा बुधवारपासून सुरू झाला. शनिवारी येथील जुन्या नेत्यांसह नव्या कार्यकर्त्यांशी ते संवाद साधणार आहेत. सध्या राष्ट्रवादी खेम्यात प्रचंड स्मशान शांतता आहे. पक्षाचे संघटन पूर्णत: खिळखिळे झाले आहे. अशा स्थितीत शरद पवारांचा हा दौरा पक्षात किती ऊर्जा भरू शकतो हा उत्सुकतेचा विषय ठरणार आहे.कोणतीही निवडणूक नसताना शरद पवार सध्या विदर्भाच्या दौऱ्यावर निघाले आहे. कामाच्या व्यस्ततेत सर्व सामान्य कार्यकर्त्यांची भेट घेण्यासाठी अडचणी येतात. त्यामुळे आता या काळात शरद पवारांनी विदर्भावर लक्ष केंद्रीत केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासूनच विदर्भात पक्षाची स्थिती कधीही भक्कम राहिली नाही. विदर्भात पूर्वी राकाँचे चार आमदार होते. त्याची संख्या आता दोनवर आली आहे. जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या हाती असलेल्या सहकारी बँका, सूतगिरण्या व शैक्षणिक संस्थांना टाळे लागले आहे तर काही लागण्याच्या उंबरठ्यावर आहेत. त्यामुळे पक्षाची धुरा सांभाळणाºया नेत्यांचीही भाजपाच्या झंझावातात दयनीय अवस्था आहे. वर्धा जिल्ह्यात आमदार म्हणून प्रा. सुरेश देशमुख यांच्या रूपाने राष्ट्रवादी काँग्रेसला मतदारांनी एकदा संधी दिली. तर हिंगणघाटमधून प्रा. राजू तिमांडे एक वेळा आमदार राहिलेत. मात्र भाजपच्या झंझावात राष्ट्रवादीचे अनेक बालेकिल्ले ढासळले. आजही जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रावर राष्ट्रवादी काँग्रेसची पकड आहे. नव्हे तर हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समिती अ‍ॅड. सुधीर कोठारी यांनी अतिशय उत्तमपणे चालवून महाराष्ट्रात विदर्भाच्या सहकाराचा नावलौकिक वाढविण्याचे काम केले आहे. ऐवढीच एक जमेची बाजू राष्ट्रवादीसाठी जिल्ह्यात दिलासा देणारी आहे. त्यामुळे शरद पवारांना पक्षाची धुरा आता नवीन लोकांकडे जिल्ह्यात देण्याची तयारी ठेवावी लागणार आहे. जुन्या शिलेदारांच्या भरवशावर पक्ष मजबूत करता येणार नाही.सर्वसामान्यांचा विश्वास उडालेले नेतृत्व पक्षात नवीन जान फुंकू शकत नाही. सहकार व बँकींग क्षेत्राची वाट लावणाऱ्या लोकांच्याच भोवती पक्ष फिरत ठेवण्यापेक्षा चांगले काम करणारे लोक पक्षाशी जोडणे केव्हाही लाभदायक ठरेल, अशी भावना सर्वसामान्य कार्यकर्ते व्यक्त करीत आहेत. कार्यकर्त्यांच्या या भावनेची दखल या निमित्ताने पवारांनी घेतली तरच दौºयाचे फलीत होईल.जुन्या सहकाऱ्यालाही भेटणारमहाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळल्यापासून वर्धा जिल्ह्याच्या राजकारणात शरद पवारांचे अत्यंत विश्वासू सहकारी म्हणून माजी आमदार प्रा. वसंतराव कार्लेकर यांच्याकडे पाहिले जाते. कार्लेकरांचा शब्द पवारांनी कधीही पडू दिला नाही. विदर्भ दौºयात वर्ध्याला येतानाही कार्लेकरांच्या घरी ते भेटीसाठी जाणार आहेत. गेल्यावर्षी वसंतराव कार्लेकरांचे सुपूत्र मरण पावलेत. त्यावेळी शरद पवार येऊ शकले नाही. त्यामुळे यावेळी त्यांच्या भेटीमागे सांत्वनाची किनार आहे. अनेक वेळा प्रा. कार्लेकर दिल्लीला पवारांच्या भेटीसाठी दिवंगत अनिल मेघे यांना घेऊन जात होते. ते मेघे ही आता हयात नाही व कार्लेकरांना प्रकृतीमुळे पवारांच्या भेटीसाठी जाता येणे शक्य होऊ शकत नाही. त्यामुळे या जुन्या दोन सहकाºयांच्या भेटीतून अनेक ऋणानुबंधाना उजाळा मिळणार आहे.