लोकमत न्यूज नेटवर्कआंजी (मोठी) : स्थानिक वॉर्ड १ मधील उर्दू शाळे मागील परिसरात राहणारे प्रकाश मारोती कपाट यांच्या घराला शुक्रवारी सकाळी अचानक आग लागली. यात घरातील सर्व जीवनावश्यक साहित्याचा कोळसा झाल्याने कपाट यांचे सुमारे १ लाखांचे नुकसान झाले. ही घटना सकाळी ९.४५ वाजताच्या सुमारास घडली.कपाट दाम्पत्य घटनेच्यावेळी शेतात गेले होते. तर मुलगा व मुलगी अंगणात खेळत होते. अशातच घरातून धूर निघत असल्याचे लक्षात येताच मुलीने घरात डोकावून पाहिले. शिवाय आरडा-ओरड केल्याने परिसरातील नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. तसेच आगीवर पाण्याचा मारा करून घरातील गॅस सिलिंडर तातडीने घराबाहेर काढले. सुमारे एक तासांच्या शर्तीच्या प्रयत्नाअंती आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. घरातील संपूर्ण साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने पराते यांचे मोठे नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच सरपंच जगदीश संचेरिया, जि. प. सदस्य जयश्री गफाट, खरांगणाचे ठाणेदार संजय गायकवाड, उपसरपंच दिलीप रघटाटे, ग्रा.पं. सदस्य मोहन पराते, आंजी पोलीस चौकीचे प्रभारी गिरीश चंदनखेडे आदींनी घटनास्थळ गाठून पाहणी केली.नुकसानग्रस्त कुटुंबाला मदत करू - संचेरियाआगीमुळे पराते कुटुंबाचे मोठे नुकसान झाले आहे. या कुटुंबाला दिलासा देण्यासाठी लोकवर्गणी करून आर्थिक मदत करण्यात येणार असल्याचे सरपंच जगदीश संचेरिया यांनी सांगितले.
घराला आग; एक लाखाचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2020 05:00 IST
कपाट दाम्पत्य घटनेच्यावेळी शेतात गेले होते. तर मुलगा व मुलगी अंगणात खेळत होते. अशातच घरातून धूर निघत असल्याचे लक्षात येताच मुलीने घरात डोकावून पाहिले. शिवाय आरडा-ओरड केल्याने परिसरातील नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. तसेच आगीवर पाण्याचा मारा करून घरातील गॅस सिलिंडर तातडीने घराबाहेर काढले. सुमारे एक तासांच्या शर्तीच्या प्रयत्नाअंती आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले.
घराला आग; एक लाखाचे नुकसान
ठळक मुद्देवॉर्ड एकमधील घटना : जीवनावश्यक साहित्याचा झाला कोळसा