शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

‘व्हायरल फ्ल्यू’ने रुग्णालये फुल्ल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2017 23:11 IST

वातावरणातील बदल व अत्यल्प पावसामुळे सध्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे. ढगाळ वातावरण तथा ठिकठिकाणी वाढणारा डासांचा प्रादुर्भाव आदींमुळे सध्या व्हायरल फ्ल्यूचे रुग्ण जिल्ह्यातील प्रत्येक गावात आढळून येत आहेत.

ठळक मुद्देखासगी दवाखान्यांत बालरुग्णांची गर्दी : औषधोपचारासाठी लागतात रुग्णांच्या रांगा

महेश सायखेडे।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : वातावरणातील बदल व अत्यल्प पावसामुळे सध्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे. ढगाळ वातावरण तथा ठिकठिकाणी वाढणारा डासांचा प्रादुर्भाव आदींमुळे सध्या व्हायरल फ्ल्यूचे रुग्ण जिल्ह्यातील प्रत्येक गावात आढळून येत आहेत. विविध आजारांची लागण झालेले नागरिक रुग्णालयांमध्ये एकच गर्दी करीत असल्याने रुग्णालयेही फुल्ल झाली आहेत. विविध आजारांपासून बचावासाठी नागरिकांनी दक्ष राहून परिसर आणि स्वत:ची स्वच्छता हा फॉर्म्यूला वापरावा, असे आवाहन आरोग्य विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.१ हजार १२६ तापाचे रुग्णपावसाचे पाणी छतावर, तुटलेल्या मातीच्या व इतर भांड्यात आदी ठिकाणी साचते. शिवाय रिकाम्या प्लॉटवरही पावसाचे पाणी साचते. सदर ठिकाणांसह विविध ठिकाणी साचणाºया पाण्यात झपाट्याने डासांची निर्मिती होते. डासांमुळे डेंग्यू, मलेरिया आदी आजार होतात. चार महिन्यांत जिल्ह्यातील १ हजार १२६ नागरिकांना तापाची लागण झाल्याची नोंद आरोग्य विभागाने घेतली आहे. विविध आजारांपासून बचावासाठी नागरिकांनी आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळण्याचे आवाहन समाजातील विविध स्तरातून करण्यात येत आहे.सहा फुटाचे ठेवावे अंतरव्हायरल फ्ल्यू झालेल्या रुग्णाने शक्यतोवर आठ दिवस घरीच विश्रांती घ्यावी. त्यांनी गर्दीच्या ठिकाणी जाताना तोंडाला रूमाल बांधून जावे. व्हायरल फ्ल्यूची लागण झालेल्या व्यक्तीपासून इतर नागरिकांनी किमान सहा फुटाचे अंतर ठेवावे. शिवाय हस्तांदोलन करण्याचेही टाळावे. या लहान-लहान गोष्टी नागरिकांनी केल्यास व्हायरल फ्ल्यूच्या होणाºया झपाट्याने प्रसाराला आळा बसेल.२ हजार ३८९ रुग्णांच्या थुंकीचे नमूनेवर्धा जिल्ह्यातील अनेक नागरिक विविध कामानिमित्त नागपूर येथे दररोज ये-जा करतात. नागपूर जिल्ह्यातील नागरिकांमध्ये सध्या स्वाईन फ्ल्यूचे लक्षणे मोठ्या प्रमाणात आढळून येत असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे शेजारच्या जिल्ह्यातून वर्धा जिल्ह्यात स्वाईन फ्ल्यू हा आजार येण्याची शक्यता नाकारता येत नाही. मागील चार महिन्यांत स्वाईन फ्ल्यू सदृश्य लक्षणे आढळलेल्या २ हजार ३८९ रुग्णांच्या थुंकीचे नमूने तपासणीकरिता घेण्यात आले. यापैकी दोन व्यक्ती संशयित असल्याचे लक्षात येताच पुढील तपासणीकरिता नमूने पूणे येथे पाठविण्यात आले आहेत.डायरियाच्या ६४१ रुग्णांची नोंदअशुद्ध पाणी व उघड्यावरील खाद्यपदार्थांचे सेवन केल्याने डायरिया या आजाराची लागण होते. पावसाळ्याच्या दिवसांत सदर आजाराची लागण झालेले रुग्ण सर्वाधिक आढळून येतात. मागील चार महिन्यांच्या कालावधीत जिल्ह्यातील ६४१ नागरिकांना डायरियाची लागण झाल्याची नोंद घेण्यात आली आहे. वेळोवळी वातावरणात बदल होत असल्याने नागरिकांनी योग्य दक्षता घेण्याची गरज निर्माण झाली आहे.वातावरणातील बदलामुळे सध्या अनेक आजारांनी डोके वर काढले आहे. विविध आजारांच्या बचावासाठी नागरिकांनी स्व:स्वच्छता आणि परिसर स्वच्छतेकडे लक्ष दिले पाहिजे. पाणी साचून डासांची निर्मिती होणार नाही, याची दक्षता नागरिकांनी घेतली पाहिजे. सुदृढ आरोग्याच्या दृष्टीने उघड्यावरील अन्नपदार्थ खाणे टाळण्यासह अन्य लहान-सहान बाबी नागरिकांनी केल्या पाहिजेत. नागरिकांना योग्य आरोग्य सेवा देण्याचे प्रयत्न आम्ही करीत असून नागरिकांनीही दक्ष राहण्याची गरज आहे.- डॉ. निवृत्ती राठोड, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक, वर्धा.