शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

गरिबांना घरकुलाची आशा; नवं घर यावर्षी तरी पूर्ण होणार का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2024 18:01 IST

सात हजार घरकुलांना मंजुरी : मोजकीच घरे पूर्ण, अनुदानाची प्रतीक्षा

लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : जिल्ह्यात २०२४-२५ वर्षात 'पीएमएवाय' अंतर्गत मंजूर घरकुलांपैकी ५ हजार लाभार्थ्यांना अनुदानाचा पहिला हप्ता वितरीत करण्यात आला; तर २ हजार १० लाभार्थ्यांचे पहिल्या हप्त्याचे अनुदान रखडले आहे. त्यामुळे घरकुलांची बांधकामे रखडली आहेत. शासन अनुदान कधी देणार, असा सवाल लाभार्थ्यांतून केला जात आहे.

प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत जिल्ह्यात २०२४-२५ या वर्षात ७ हजार १६ घरकुलांना मंजुरी देण्यात आली. मंजुरीनंतर पहिला हप्ता लाभार्थ्यांना मिळाल्याने बांधकामे गतीने सुरू झाली. दुसरा आणि तिसऱ्या हप्त्यासाठी अनेकांना प्रतीक्षा करावी लागत आहे. निवडणूक आचारसंहिता काळात अनुदानाला थांबा देण्यात आला होता. अनेकांनी उसनवार करून घराची कामे सुरू ठेवली आहेत. मात्र, अनुदान न मिळाल्याने आता लाभार्थ्यांची कोंडी होत आहे. अनुदान कधी येणार? याची निश्चिती नाही. पण, संबंधित विभागात आश्वासन देत वेळ मारून नेण्यात येत आहे. घरकुलांच्या बांधकामासाठी उपलब्धतेनुसार अनुदान वितरीत केले जात आहे. या बांधकामासाठी रकमेचा व लागणाऱ्या साहित्याचा विचार केल्यास हे घरकुल बांधणे अवघड झाले आहे. सिमेंट, लोखंड, वाळूचे दर गगनाला भिडल्याने लाभार्थी हैराण झाले आहेत. 

६,९८८ घरे अपूर्ण चालू आर्थिक वर्षात जिल्ह्याला साडेसात हजार घरकुलाचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यापैकी ७ हजार १६ घरकुलांना मंजुरी देण्यात आली होती. मात्र, गत आठ महिन्यात केवळ २८ घरे पूर्ण झाली आहेत. ६ हजार ९८८ घरे अपूर्ण आहेत. उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी दीड वर्षाचा कालावधी असला तरी वेळेत ही घरे पूर्ण होणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

कोणत्या तालुक्यात किती घरकूल मंजूर? तालुका                  मंजूर घरे आर्वी                        ९७७ आष्टी                        ६३८ देवळी                     १,०२६ हिंगणघाट                १,३०२ कारंजा                     ७२२ समुद्रपूर                   ९९६ सेलू                         ७६१ वर्धा                         ५९४

५ हजार लाभार्थ्यांना मिळाला पहिला हप्ता या योजनेअंतर्गत पात्र ५ हजार ६ लाभार्थ्यांना पहिला हप्ता वितरीत करण्यात आला आहे, तर दुसरा हप्ता १८८, तर तिसरा हप्ता केवळ ५७ जणांना देण्यात आला आहे.

जिल्ह्यात ७ हजार ६२३ घरकुलांना मान्यता जिल्ह्यात प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत सन २०२४-२५ साठी ७ हजार ६२३ घटकुलांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यापैकी ७ हजार १६ घरकुलांना मान्यता देण्यात आली आहे.

टॅग्स :wardha-acवर्धाgovernment schemeसरकारी योजना