शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
5
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
8
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
9
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
10
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
11
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
12
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
13
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
14
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
15
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
16
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
17
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
18
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
19
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
20
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

होमगार्डच्या समस्या शासन सोडविणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2019 23:29 IST

होमगार्ड महासमादेशक यांच्या आदेशानुसार जिल्हास्तरावर होमगार्ड्सच्या समस्यांच्या निवारणासाठी संमेलन आयोजित होते. याप्रसंगी होमगार्ड मुख्यालय व शासनाद्वारे होमगार्डस्च्या समस्यांवर धोरणात्मक उपाय, सुविधा तरतुदी व कार्यामध्ये गतिमानता यावी या हेतूने संपूर्ण माहिती कार्यरत होमगार्डस्ना देण्यात आली.

ठळक मुद्देनीलेश मोरे : जिल्हास्तरीय होमगार्ड संवाद संमेलन

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून सण-उत्सवात सेवा देणाऱ्या होमगार्डस्च्या समस्या सोडविण्यासाठी शासन कटिबद्ध आहे, असे मत अपर पोलिस अधीक्षक नीलेश मोरे यांनी व्यक्त केले.होमगार्ड जिल्हा प्रशिक्षण केंद्रात जिल्ह्यातील मानसेवी होमगार्ड अधिकारी व होमगार्ड्स यांचे तिमाही संवाद संमेलन आयोजित करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.होमगार्ड महासमादेशक यांच्या आदेशानुसार जिल्हास्तरावर होमगार्ड्सच्या समस्यांच्या निवारणासाठी संमेलन आयोजित होते. याप्रसंगी होमगार्ड मुख्यालय व शासनाद्वारे होमगार्डस्च्या समस्यांवर धोरणात्मक उपाय, सुविधा तरतुदी व कार्यामध्ये गतिमानता यावी या हेतूने संपूर्ण माहिती कार्यरत होमगार्डस्ना देण्यात आली. मुख्यालयाने निर्धारित केलेले कर्तव्य, जबाबदारी, संगणकीय प्रणालीमुळे कामकाजातील पारदर्शकता व गतिमानता आणण्याचे दृष्टीने आवश्यक सूचना व माहिती जिल्हा समादेशकांनी दिली. आगामी काळातील कायदा व सुव्यवस्था बंदोबस्ताबाबत, होमगार्डसचे कार्य व अभिलेख पोलीस ठाणीनिहाय ऑनलाईन पद्धतीने जिल्हा कार्यालयस्तरावर करण्यात आल्या. जिल्ह्यातील पोलीस ठाण्यांना योग्य ते निर्देश देण्यात येतील. तसेच येणाऱ्या दैनंदिन बंदोबस्ताबाबत उपस्थित होमगार्डना मार्गदर्शन व आवश्यक सूचना जिल्हा समादेशकांनी दिल्या. संमेलनास प्रशिक्षण केंद्राचे केंद्रनायक शेख, प्रशासकीय अधिकारी येवतकर, निदेशक राम पिंजरकर, जवादे, गुरनुले, भलमे, सूर्यवंशी, यादव, पातुरकर व सर्व कार्यालयीन कर्मचारी व संपूर्ण जिल्हा पथकातील समादेशक अधिकारी रोकडे, थेरे, कांबळे व महिला, पुरुष असे एकूण ६१३ होमगार्ड्स सैनिकांचा या संवाद संमेलनात सहभाग होता.

टॅग्स :Policeपोलिस