शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

घरपोच गॅस सिलिंडरसाठी ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2018 00:01 IST

देवळी येथील तहसील कार्यालयात मंगळवारी युवा परिवर्तन की आवाजच्या नेतृत्त्वात संतप्त गॅस सिलिंडर धारकांनी घरपोच गॅस सिलिंडर देण्यात यावे या मुख्य मागणीसह विविध मागण्यांसाठी ठिय्या आंदोलन केले.

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : देवळी येथील तहसील कार्यालयात मंगळवारी युवा परिवर्तन की आवाजच्या नेतृत्त्वात संतप्त गॅस सिलिंडर धारकांनी घरपोच गॅस सिलिंडर देण्यात यावे या मुख्य मागणीसह विविध मागण्यांसाठी ठिय्या आंदोलन केले. या आंदोलनादरम्यान विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना सादर करण्यात आले.देवळी येथे एकमेव अधिकृत गॅस सिलिंडर एजन्सी आहे; पण या एजन्सी धारकाकडून ग्राहकांना वेळीच व घरपोच गॅस सिलिंड दिले जात नाही. सण व उत्सवादरम्यान नागरिकांना सर्वाधिक त्रास सहन करावा लागतो. शिवाय सदर गॅस एजन्सीधारक ग्राहकांकडून अ‍ॅडवान्स पैसे घेऊन त्यांना सुमारे आठ ते दहा दिवस उशीराने गॅस सिलिंडर दिले जात आहे. यापूर्वी संबंधितांना निवेदन सादर करण्यात आले. परंतु, त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याने संतप्त गॅस सिलिंडरधारकांनी मंगळवारी तहसील कार्यालय गाठून ठिय्या आंदोलन केले. यावेळी विविध मागण्यांचे निवेदन नायब तहसीलदार देशमुख यांना सादर करण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्त्व युवा परिवर्तन की आवाजचे संस्थापक अध्यक्ष निहाल पांडे, देवळी तालुका अध्यक्ष स्वप्नील कामळी यांनी केले. आंदोलनात पवन आव्हाळ, सलमान शेख, शुभम राठोड, मिरान पटेल, प्रतीक घोडे, शेखर इंगोले, प्रज्वल ढभारे, सुरज दुरघुडे, शुभम मातकर, वैभव वाघ, सुरज डुकरे, वैभव भोयर, कामळी आदी सहभागी झाले होते.

टॅग्स :Cylinderगॅस सिलेंडर