शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर, ट्रम्प टॅरिफ मुद्द्यांवर विरोधक आक्रमक, आजपासून संसद अधिवेशन; सर्व मुद्द्यांवर चर्चेस सरकार तयार
2
उड्डाण करताच डाव्या बाजूचं इंजिन पेटलं; आगीमुळे बोईंगचे इमर्जन्सी लँडिंग
3
Latur: मारहाणीनंतर ‘छावा’चे कार्यकर्ते रात्री उशिरा रस्त्यावर; राष्ट्रवादीचे बॅनर फाडले
4
योगींचा दिल्ली दौरा अन् प्रदेशाध्यक्ष निवडीची चर्चा; ओबीसी चेहरा किंवा महिला नेत्याची होऊ शकते निवड
5
प्रचंड उष्म्यामुळे विद्यार्थ्यांच्या शालेय शिक्षणावर होतोय परिणाम, दीड वर्षांपर्यंत होऊ शकते घट
6
जगातील कोणीही भारताला आदेश देऊ शकत नाही, ट्रम्प यांचा दावा अन् उपरराष्ट्रपतींचे खडेबोल
7
इस्रायल की सशस्त्र टोळ्यांचा हल्ला? गाझामध्ये मदतीची प्रतीक्षा करणाऱ्यांवरच गोळीबार, ७३ जण ठार
8
तरुणांना भाषणबाजी नको, रोजगार हवा! राहुल गांधी यांनी व्यक्त केली चिंता
9
कोकाटेंचा राजीनामा मागितला, तटकरेंना निवेदन देत पत्ते फेकले, छावा आणि अजितदादांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा
10
"आमच्या निवेदनाला लाथाबुक्क्यांनी उत्तर देत असाल तर…’’, विजय घाडगे यांची संतप्त प्रतिक्रिया 
11
ऑपरेशन सिंदूरवेळी जीव धोक्यात घालून केली जवानांना मदत, आता लष्कराने १० वर्षांच्या मुलाला दिलं मोठं बक्षीस
12
"माणिकराव कोकाटे यांचा 'तो' व्हिडीओ AIच्या मदतीनं, मी स्वतः..."; भाजप आमदाराचा दावा
13
राजस्थानात मुसळधार पाऊस, अजमेरमध्ये तरुण वाहून जाता-जाता बचावला; असा वाचला जीव, बघा VIDEO
14
प्रवेश करताच लिफ्ट बंद, प्रवीण दरेकरांसह १७ जण अडकले, १० मिनिटं चालला थरार, अखेर दरवाजा तोडून केली सुटका
15
मांत्रिकाकडून पूजा केली, खड्डा खणला, तेवढ्यात आले पोलीस, गुप्तधन शोधताना पाच जणांना अटक
16
416%नं वाढला कंपनीचा नफा, आता शेअर खरेदीसाठी लोकांची झुंबड; ₹40 पेक्षाही कमी आहे किंमत!
17
हरीण बिथरले, महामार्गावरून सैरावैरा पळत सुटले, पुलावरून मारली उडी, झाला करुण अंत
18
असंवेदनशिल कृषीमंत्री कोकाटेंचा राजीनामा घ्या; विधान परिषदेतील विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांची मागणी
19
जम्मू-काश्मीरच्या किश्तवाडमध्ये चकमक, जैश-ए-मोहम्मदचे दहशतवादी लपल्याचा संशय
20
इंडोनेशियात प्रवासी बोटीला भीषण आग; प्रवाशांनी समुद्रात मारल्या उड्या...

एमपीतील चोरट्यांकडून वर्धेत घरफोड्या

By admin | Updated: June 19, 2016 01:58 IST

गत महिन्यात वर्धा शहरात घरफोड्यांचे सत्रच सुरू झाले होता. या घरफोड्यांचा छडा लावण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना यश आले आहे.

आठ चोऱ्या उघड : चार जणांना अटक, तिघे फरार, १ लाख २१ हजारांचा मुद्देमाल जप्तवर्धा : गत महिन्यात वर्धा शहरात घरफोड्यांचे सत्रच सुरू झाले होता. या घरफोड्यांचा छडा लावण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना यश आले आहे. या घरफोड्या वर्धेतील काही चोरट्यांच्या साह्याने मध्य प्रदेश येथील चोरट्यांनी केल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी पोलिसांनी चार जणांना अटक केली असून तिघे फरार आहे. चोरट्यांकडून शहरातील आठ घरफोड्या उघड झाल्या आहेत. त्यातील चार चोऱ्यांमधील १ लाख २१ हजार ३०५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. शिवाय घर फोडण्याकरिता वापरण्यात आलेले साहित्यही जप्त करण्यात आले आहे. या चोरी प्रकरणी पोलिसांनी चरणसिंग गब्बूसिंग भादा रा. पांढुर्णा व गोपालसिंग बिसनसिंग भादा रा. समतानगर सिख बेडा अशी अटकेतील आरोपींची नावे असल्याचे पोलिसांनी सांगितले. अन्य दोघांना अटक करण्यात आली असून ते अल्पवयीन असल्याने त्यांची रवानगी बालसुधार गृहात करण्यात आली आहे. बल्लूसिंग भादा, जोगिदारसिंग ऊर्फ लूल्ला राजूसिंग भादा दोन्ही रा. शास्त्री वॉर्ड पांढुर्णा मध्य प्रदेश, करणसिंग मुकीमसिंग बावरी रा. शीख बेडा, तळेगाव (श्या.पंत.) हे तिघे फरार आहेत. शहर व रामनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गणेशनगर, हरिहर नगर, श्रीराम कॉलनी, बोरगाव (मेघे), विक्रमशीला नगर, भीमनगर, जिजाऊ नगर, आलोडी या परिसरात गत १५ ते २० दिवसांच्या काळात सातत्याने घरफोडीच्या घटना घडल्या. ३ जूनच्या रात्री सुरेश कुंभलकर (४९) रा. गणेश नगर हे कुटुंबीयांसह बाहेरगावी गेले असता त्यांच्या घरी चोरी झाली. या चोरीत चोरट्याने एकूण १ लाख ७० हजार रुपयांचा माल चोरून नेला. याप्रकरणी ४५७, ३८० अन्वये गुन्हा दाखल दाखल केला. ७ जून रोजी विठ्ठल पाटील (६५) गणेशनगर वॉर्ड क्र. ३ बोरगाव मेघे हे बाहेरगावाहून परत आले असता त्यांच्या घरी चोरी झाल्याचे लक्षात आले. या चोरीत १५ हजार रुपयांची रोकड लंपास केल्याचे निदर्शनास आले. या प्रकरणी वर्धा शहर पोलिसांत भादंविच्या कलम ४५७, ३८० अन्वये गुन्हा दाखल आहे. या चोऱ्यांचा तपास सुरू असताना स्थानिक गुन्हे शाखेला खबरींकडून मिळालेल्या माहितीप्रमाणे बोरगाव लगतच्या शीख बेड्यावर बाहेरगावावरून काही इसम समारंभाकरिता आलेले असून त्यांनीच या चोऱ्या केल्याची दाट शक्यता वर्तविण्यात आली. त्यांना ताब्यात घेत विचारणा केली असता या चोऱ्या त्यांनीच केल्याचे कबूल केले. यात अटक करण्यात आलेल्या चोरट्यांनी पोलीस कोठडीदरम्यान चोरीतील रोख ३५ हजार रुपये, सोन्याचे दागिने, एक घड्याळ, काही बेंटेक्सचे दागिने, एक लोखंडी रॉड असा एकूण १ लाख २१ हजार ३०५ हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला. सदर गुन्ह्यातील आरोपी यांनी वर्धा शहर व रामनगर पोलीस ठाण्यातील आठ गुन्ह्यांची कबूली दिलेली आहे. सदर कारवाई पोलीस अधीक्षक अंकित गोयल व अपर पोलीस अधीक्षक स्मीता पाटील यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक पराग पोटे यांच्या निर्देशाप्रमाणे पोलीस उपनिरीक्षक एस.बी. कडू, अचल मलकापुरे, उदयसिंग बारवाल, अशोक वाट, नरेंद्र डहाके, सलाम कुरेशी, अमर लाखे, दिवाकर परिमल, किशोर आप्तूरकर, आनंद भस्मे, समीर कडवे, कुणाल हिवसे, दिनेश बोथकर, कुलदिप टाकसाळे, सचिन खैरकार, अनूप कावळे, मुकेश येल्ले, आत्माराम भोयर यांनी केली.(प्रतिनिधी)