शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील ३,७३० ठिकाणी होळी दहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2020 05:00 IST

जिल्ह्यात विविध गाव आणि शहरात २ हजार १४५ ठिकाणी सार्वजनिक होळी तर १ हजार ५८५ ठिकाणी खासगी होळी दहन करण्यात आल्याची नोंद पोलीस प्रशासनाने घेतली आहे. तर जिल्ह्यातील १९ पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांच्याकडून देण्यात आल्या आहेत. पर्यावरणपुरक होळी प्रत्येकाने साजरी करावी असे आवाहन समाजातील प्रत्येक स्तरातून केले जात आहे. त्यावरही काही नागरिक कृती करीत आहेत.

ठळक मुद्देअनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलीसदादा सज्ज

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : मनातील द्वेष आणि राग याची होळीकरून आनंदाच्या रंगाची उधळण करण्याचा सण म्हणजे होळी. याच सणाचे औचित्य साधून जिल्ह्यातील एकूण ३,७३० ठिकाणी सोमवारी सायंकाळी होळी दहन करून नागरिकांनी आनंंदोत्सव साजरा केला. या सणादरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून जिल्ह्यातील पोलीस प्रशासनही सज्ज झाले आहे.जिल्ह्यात विविध गाव आणि शहरात २ हजार १४५ ठिकाणी सार्वजनिक होळी तर १ हजार ५८५ ठिकाणी खासगी होळी दहन करण्यात आल्याची नोंद पोलीस प्रशासनाने घेतली आहे. तर जिल्ह्यातील १९ पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांच्याकडून देण्यात आल्या आहेत. पर्यावरणपुरक होळी प्रत्येकाने साजरी करावी असे आवाहन समाजातील प्रत्येक स्तरातून केले जात आहे. त्यावरही काही नागरिक कृती करीत आहेत.काही गुन्हेगारी प्रवृत्तीचे व्यक्ती या होळी या सणादरम्यान अनुचित प्रकार करू शकत असल्याने त्यांना पोलीस ठाण्याच्या आवारात स्थानबद्ध करण्याची मोहिमही पोलिसांनी हाती घेतली आहे. त्यासाठी ठिकठिकाणी नाकेबंदी करण्यात आली आहे. शिवाय जिल्ह्यात दारू येऊ नये म्हणून दक्षताही पोलीस घेत आहेत.धुळवडच्या पार्श्वभूमीवर २७ गुन्हेगारांना केले स्थानबद्धवर्धा : होळी सणानिमित्त पोलीस विभागाकडून गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्याचे काम सुरू असून रामनगर, सावंगी, सेवाग्राम पोलीस ठाण्यांतर्गत तब्बल २७ गुन्हेगारांना स्थानबद्ध करण्यात आले आहे. रामनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील १०, सावंगी (मेघे) ठाण्याच्या हद्दीतील १२ तर सेवाग्राम पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ५ गुन्हेगारांना स्थानबद्ध करण्यात आले आहे.शस्त्र बाळगणाऱ्यावर कारवाईरामनगर पोलीस ठाण्यांतर्गत दोन गुन्हेगारांना शस्त्र बाळगल्याप्रकरणी त्यांच्यावर हत्यार कायद्यान्वये गुन्हे दाखल केले आहे. रामनगर ठाण्याकडून निरंतर ही कारवाई करण्यात येणार आहे.८२ गुन्हेगारांवर हद्दपारीची टांगती ‘तलवार’शहरारात गुन्हेगारी प्रवृत्तीने डोकेवर काढले असून शहरातील चौका-चौकात दारूविक्रीची अवैध दुकाने थाटून सर्रास दारू विक्री केल्या जात आहे. मागील काही दिवसांपासून पोलीस विभागाने अशांवर कारवाई करीत तब्बल २५ ते ३० गुन्हेगारांना हद्दपार केले आहे. पोलीस विभागाने अशा ८२ गुन्हेगारांची यादी तयार केली असून त्यासर्व गुन्हेगारांना तसेच दारूविक्रेत्यांवर हद्दपारिची टांगती तलवार आहे.दारूविक्रेत्यांवर नजरजिल्ह्यात दारूबंदी असताना होळीचे औचित्य साधून काही दारूविक्रेत्यांकडून इतर जिल्ह्यातून विविध ब्रॉण्डच्या दारूची आयात केली जाते. हाच प्रकाराला आळा घालण्यासाठी तसेच दारूविक्रीच्या प्रकाराला आळा घालण्यासाठी प्रत्येक दारूविक्रेत्यावर पोलिसांकडून करडी नजर ठेवली जाणार आहे.

टॅग्स :Holiहोळी