शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
3
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
4
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
5
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
6
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
7
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
8
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
9
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
10
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
11
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
12
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
13
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
14
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
15
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
16
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
17
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

पॅनकार्ड क्लब गुंतवणुकदारांचे जिल्हा कचेरीसमोर धरणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2018 23:45 IST

पॅनकार्ड क्लबमध्ये गुंतवणूक करणाºया अनेकांचे पैसे अडकले आहेत. ही रक्कम सुमारे ७ हजार कोटींच्या घरात आहे. पॅनकार्ड क्लबच्या गुंतवणुकदारांना शासनाने न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी लढा वेल्फेअर फाऊंडेशनने केली आहे.

ठळक मुद्दे७ हजार कोटींचा गंडा : लढा वेल्फेअर फाऊंडेशन करणार उपोषण

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : पॅनकार्ड क्लबमध्ये गुंतवणूक करणाऱ्या अनेकांचे पैसे अडकले आहेत. ही रक्कम सुमारे ७ हजार कोटींच्या घरात आहे. पॅनकार्ड क्लबच्या गुंतवणुकदारांना शासनाने न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी लढा वेल्फेअर फाऊंडेशनने केली आहे. या मागणीसाठी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.मार्केटींग पर्सन म्हणून ग्राहकांकडून १९५६ च्या कायद्यानुसार व केंद्र शासनाच्या निर्देशानुसार मेंबरशिप मार्केटमधून गोळा करण्यात आली. सदर कंपनीमध्ये ५ लाखांपेक्षा अधिक मार्केटींग पर्सन फुलटाईम व्यवसाय करीत होते. कंपनीकडे १९९७ पासून मार्केटींग पर्सनच्या माध्यमातून अरबो रुपये जमा करून कंपनीने आपला विस्तार आंतरराष्ट्रीय पातळीवर केला आहे. सद्यस्थितीत या कंपनीकडे ५५ लाख ग्राहक असून त्यांच्या माध्यमातून ७ हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम गोळा करण्यात आली आहे.३१ जुलै २०१४ पर्यंत पॅनकार्ड क्लब कंपनी सुरळीत सुरू होती. ग्राहकांचा परतावा नियमित दिला जात होता; पण ३१ जुलै २०१४ ला सेबीने कंपनीला अंतरीम आॅर्डर देऊन व्यवसाय बंद करण्यास सांगितले. ३१ जुलै २०१४ ते मे २०१७ पर्यंत कंपनी व सेबीमध्ये न्यायालयीन वाद सुरू होता. १२ मे २०१७ रोजी अंतिम निकाल सेबीच्या बाजूने लागलेला आहे. यावेळी ग्राहकांचे सर्व परतावे परत करण्यास ३ महिन्यांचा कालावधी कंपनीला देण्यात आला होता. पॅनकार्ड क्लबने शासनाला टॅक्स, मार्र्केटींग पर्सनचा टीडीएस तसेच सर्व प्रकारचा कर भरलेला आहे. बऱ्याच वर्षांनंतर शासनाला ही कंपनी फ्रॉड आहे, हे कसे कळले. सेबीने लवकरात लवकर कंपनीची सर्व मालमत्ता विक्रीस काढावी. शिवाय विक्रीस काढलेल्या मालमत्तेच्या लिलावातील राखीव किंमतीनुसारच मालमत्तेची विक्री करावी. त्यापेक्षा कमी किमतीमध्ये विक्री करू नये. मालमत्ता विक्रीतून जसजशी रक्कम सेबीकडे जमा होईल, त्यानुसार ग्राहकांचे दावे निकाली काढावेत. लिलाव प्रक्रिया पारदर्शक करण्यासाठी संघटनेचे पाच पदाधिकारी लिलाव प्रक्रिया समितीमध्ये सेबीने सहभागी करून घ्यावेत. ग्राहकांचे दावे निकाली काढण्याचा कालावधी सेबीने जाहीर करावा, आदी मागण्यांसाठी मंगळवारी धरणे आंदोलन करण्यात आले.आंदोलनादरम्यान मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाºयांना सादर करण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्त्व लढा वेल्फेअर फाऊंडेशनचे महाराष्ट्र संघटक प्रमोद यादव यांनी केले. आंदोलनात दिनेश भुते, गणेश बावणे, भाऊ शंभरकर, गजानन हांडे, गणेश भोगे, वामन मते, गणपत जोगे, गजेंद्र ढोक, मनोहर मसकर, संदीप रघाटाटे, भीमराव मुटे, ज्ञानेश्वर ढोक, सोनिया यादव यांच्यासह मोठ्या संख्येने गुंतवणुकदार सहभागी झाले होते.