शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : जड्डू -ब्रायडन कार्स यांच्यात टक्कर! मग वातावरण चांगलेच तापलं! नेमकं काय घडलं?
2
"तुला पक्षात यावं लागेल"; उद्धव ठाकरेंच्या ऑफरवर प्रवीण दरेकर म्हणाले, "मी बाळासाहेबांचा शिवसैनिक"
3
अस्तित्वातच नसलेला माणूस बनला जगातील बारावी सर्वात श्रीमंत व्यक्ती, कोण आहे तो? एवढी आहे एकूण संपत्ती
4
विमानांच्या इंजिन फ्यूल स्विचची तात्काळ तपासणी करावी; DGCA चा सर्व कंपन्यांना आदेश
5
याला म्हणतात ढासू शेअर...! 1 लाखाचे केले 3.7 कोटी, 5 वर्षांत दिला 36900% चा बंपर परतावा; करतोय मालामाल
6
IND vs ENG: लॉर्ड्सवर अक्षय कुमारसोबत मॅच बघायला आली 'ही' अभिनेत्री, एकेकाळी गाजवलंय बॉलिवूड
7
जिममध्ये चोरी करणं महागात पडलं, ट्रेनरनं अशी शिक्षा दिली की...; आता चोर कधी मनात चोरीचा विचारही आणणार नाही!
8
हिंदी-मराठी वादामुळे वाढलेला तणाव कमी करण्यासाठी काँग्रेसकडून आम्ही मराठी, आम्ही भारतीय भाषा, कार्यक्रमाचं मिरारोड येथे आयोजन
9
काव्या मारनचा अजब निर्णय ! ५० विकेट्सही न घेता आलेल्या गोलंदाजाला केलं SRH 'बॉलिंग कोच'
10
"सरकार आणि उद्योगपतींच्या फायद्यासाठी जनसुरक्षा कायदा, काँग्रेस त्याची प्रत्येक जिल्ह्यात होळी करणार”, हर्षवर्धन सपकाळ यांची घोषणा
11
पाकिस्तान जय श्रीरामच्या घोषणेने दुमदुमले; कराचीत मुस्लिम कलाकारांकडून रामलीलेचे सादरीकरण
12
मुंबई सेंट्रल स्टेशनचे नाव बदलले जाणार, नवे नाव काय असणार? CM देवेंद्र फडणवीस म्हणाले...
13
हरयाणा,गोव्यासह लडाखला मिळाले नवे राज्यपाल; घोष, गुप्ता आणि गजपती राजू यांची राष्ट्रपतींकडून नियुक्ती
14
IND vs ENG : गौतम गंभीरने Live सामन्यात दिली शिवी; अपशब्द उच्चारतानाचा Video झाला व्हायरल
15
नो टॅक्स, नो टेन्शन! 'या' देशांमध्ये श्रीमंत लोकही भरत नाहीत एक रुपयाही कर, मग पैसा कुठून येतो?
16
खऱ्या आयुष्यातही सचिवजी अन् रिंकी प्रेमात? सानविकाच्या 'त्या' उत्तरावर जितेंद्र लाजला
17
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा जास्त उकळणं आरोग्यासाठी हानिकारक, कारण...
18
वैभव सूर्यवंशीची स्फोटक फलंदाजीनंतर आता गोलंदाजीत कमाल! युवा टीम इंडियाकडून कसोटीत रचला इतिहास
19
"नाव घ्यायला भीती वाटते तर बोलू नका" ; आदित्य ठाकरेंनी चड्डी बनियन गॅँगचा उल्लेख करताच राणे संतापले
20
घरभाडं, वीजबिल भरायला पैसे नव्हते, राष्ट्रीय खेळाडू बनले चोर, व्यापाऱ्याचं अपहरण करून लुटले, त्यानंतर... 

धान्य वाटपात हिंगणघाट उपविभाग अव्वल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2019 21:55 IST

गावातील गरजूंना स्वस्त दरात आवश्यक ते धान्य पुरवठा करण्यासाठी गावोगावी स्वस्त धान्य दुकानाची निर्मिती करण्यात आली आहे. पण, या दुकानातून धान्य वाटपामध्ये गैरप्रकार वाढल्याने काहींना लाभापासून वंचित राहावे लागत होते. हा गैरप्रकार टाळण्यासाठी शासनाने पॉस मशीनची व्यवस्था सुरु केली.

ठळक मुद्देजिल्ह्यात मारली बाजी : पॉस मशीनमुळे यंत्रणा झाली पारदर्शक

भास्कर कलोडे।लोकमत न्यूज नेटवर्कहिंगणघाट : गावातील गरजूंना स्वस्त दरात आवश्यक ते धान्य पुरवठा करण्यासाठी गावोगावी स्वस्त धान्य दुकानाची निर्मिती करण्यात आली आहे. पण, या दुकानातून धान्य वाटपामध्ये गैरप्रकार वाढल्याने काहींना लाभापासून वंचित राहावे लागत होते. हा गैरप्रकार टाळण्यासाठी शासनाने पॉस मशीनची व्यवस्था सुरु केली. त्यामुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी याची प्रभावीपणे अंमलबजावणी केल्याने गरजूंपर्यंत धान्य पुरवठा करण्यात यश मिळविले असून हिंगणघाट उपविभाग जिल्ह्यात अव्वल ठरला आहे.वर्धा जिल्ह्यात हिंगणघाट उपविभागात हिंगणघाट व समुद्रपूर या दोन तालुक्याचा समावेश आहे. या उपविभागात सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत २५० स्वस्त धान्य दुकान कार्यरत असून या सर्वच दुकानात पॉस मशीनच्या माध्यमातून धान्य वितरण करण्यात येते. यामध्ये हिंगणघाट तालुक्यात १३३ स्वस्त धान्य दुकानातून ६ हजार ६५६ अंत्योदय शिधा पत्रिकाधारक, १ लाख ४० हजार २६० प्राधान्य कुटुंबातील लाभार्थी (व्यक्तीनुसार वाटप) व २० हजार ९९० शेतकरी लाभार्थी (व्यक्तीनुसार वाटप) यांना धान्य वितरण करण्यात येते.तसेच समुद्रपूर तालुक्यात ४ हजार ९८७ अंत्योदय शिधा पत्रिकाधारक, ८१ हजार ३८० प्राधान्य कुटुंबातील लाभार्थी (व्यक्तीनुसार वाटप ) व १७ हजार ९८२ शेतकरी लाभार्थी ( व्यक्तीनुसार वाटप ) आहे. या सर्व लाभार्थ्यांना दरमहा धान्य पुरवठा केल्या जात आहे.धान्य वितरण व्यवस्था प्रभावीपणे राबविण्यासाठी हिंगणघाटचे उपविभागीय अधिकारी चंद्रभान खंडाईत, तहसीलदार श्रीराम मुंदडा, अन्न पुरवठा निरीक्षण अधिकारी सुहास टोंग, हिंगणघाटचे पुरवठा निरीक्षक विशाल गवई तर समद्रपूरचे तहसीलदार राजू रणविर व समुद्र्रपूरचे पुरवठा निरीक्षक अजय साबळे यांच्यासह तहसील कार्यालयातील कर्मचारी परिश्रम घेत आहे.समुद्रपूर तालुक्याची वितरणामध्ये आघाडीसार्वजनिक वितरण व्यवस्थेत पारदर्शकता आणण्याकरिता फेब्रुवारी २०१७ पासूनच पॉस मशीन स्वस्त धान्य दुकानात उपलब्ध करून दिल्या. त्यानुसार फेब्रुवारी २०१७ पासून हिंगणघाट उपविभागाने आॅनलाईन धान्य वितरणात आघाडी घेतलेली होती. ती आघाडी आजपर्यंत कायम ठेवलेली आहे. जुलै २०१९ मध्ये समुद्रपूर तालुक्याने ९५.११ टक्के धान्य वितरण करुन प्रथम क्रमांक पटकाविला तर हिंगणघाट तालुक्याने ९४.२१ टक्के धान्य वितरण करुन दुसरा क्रमांक मिळविला आहे. धान्याच्या वितरणात पारदर्शकता आणून सर्वांना लाभ दिला जात आहे.स्वस्त धान्य हे गरजूंपर्यंत पोहोचविणे खरेतर प्रशासनाची जबाबदारी आहे. पॉस मशिनद्वारे धान्य वितरणातील चोरीला आळा बसला असून प्रत्येक गरजूला दरमहा धान्य दिल्या जात आहे. हिंगणघाट उपविभागील समुद्रपूर व हिंगणघाट तालुक्यातील अडीचशे स्वस्त धान्य दुकानांमार्फत पारदर्शकपणे धान्य वितरण केले जात आहे. सर्व अधिकाऱ्यांचेही सहकार्य मिळत असल्याने जिल्ह्यात हिंगणघाट उपविभाग प्रथम ठरला आहे.चंद्रभान खंडाईत, उपविभागीय अधिकारी, हिंगणघाट