शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

हिंगणघाटचे जळीत प्रकरण; शासकीय मदतीसाठी होतोय तुलनात्मक अभ्यास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2020 13:42 IST

हिंगणघाट येथील पीडितेला शासनाच्या कुठल्या योजनेतून भरीव मदत करता येईल यासाठीचा तुलनात्मक अभ्यास सध्या जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्यावतीने केला जात आहे.

ठळक मुद्देपीडिता शासकीय मदतीच्या प्रतीक्षेत 

महेश सायखेडे।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : हिंगणघाट शहरात प्राध्यापिकेवर पेट्रोल टाकून  जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. या घटनेतील गंभीर जखमीवर नागपूर येथील रुग्णालयात उपचार सुरू असले तरी तिला अद्यापही कुठलीही शासकीय मदत देण्यात आलेली नाही. पीडितेला शासनाच्या कुठल्या योजनेतून भरीव मदत करता येईल यासाठीचा तुलनात्मक अभ्यास सध्या जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्यावतीने केला जात आहे.हिंगणघाट येथील घटनेनंतर गुन्हा दाखल होताच पोलिसांच्यावतीने पीडितेला शासकीय मदत मिळावी म्हणून प्रस्ताव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण विभागाकडे पाठविण्यात आला आहे. पूर्वी मनोधैर्य योजनेच्या माध्यमातून अ‍ॅसिड हल्ला, पोस्को, बलात्कार आदी गुन्ह्यातील पीडितेला महिला व बालविकास विभागाच्यावतीने शासकीय मदत दिली जात होती. परंतु, सध्या ही योजना जिल्हा विधी सेवा प्राधिकरणकडे वळती करण्यात आली आहे. त्यामुळे हिंगणघाट येथील पीडितेला शासकीय मदत देण्याचा प्रस्ताव पोलिसांकडून या विभागाकडे सादर करण्यात आला आहे. परंतु, अद्यापही कुठलीही मदत सदर पीडितेला मिळालेली नाही. हिंगणघाट येथील पीडितेला तातडीने भरीव मदत देण्यात यावी, अशी मागणी आहे.

पेट्रोल हल्लाचे प्राविधान नाहीचच्शासनाच्या ‘मनोधैर्य’ योजनेच्या माध्यमातून पोस्को, बलात्कार, अ‍ॅसिड हल्ला आदी गुन्ह्यातील पीडितांना शासकीय मदत देण्याचे सदर योजनेच्या नियमावलीत नमुद आहे. परंतु, एखाद्या तरुणीसह महिलेवर पेट्रोल टाकून तिला जीवंत जाळण्याचा प्रयत्न केल्यास तिला या योजनेचा लाभ देता येईल काय? शिवाय शासनाच्या दुसऱ्या कुठल्या योजनेच्या माध्यमातून अशा पीडितेला भरीव शासकीय मदत देता येते काय, याबाबतचा तुलनात्मक अभ्यास सध्या जिल्हा विधी सेवा प्राधिकारण करीत आहे.

मुख्यमंत्री सहाय्यता निधी देणार दिलासामुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हिंगणघाट येथे प्राध्यापिकेवर पेट्रोल टाकून जाळण्याच्या प्रकरणाची दखल घेत भाजलेल्या जखमी तरुणीवर योग्य ते उपचार करावे. या उपचारांचा खर्च मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीतून करण्यात येईल, असे सांगितले आहे.

हिंगणघाट येथील घटनेतील पीडितेला शासकीय भरीव मदत देण्यासाठी शासनाच्या विविध योजनांचा तुलनात्मक अभ्यास केला जात आहे. पीडितेला शासकीय मदत देण्यासाठीचा पोलिसांकडून प्रास्ताव आम्हाला प्राप्त झाला आहे. लवकरच पीडितेला भरीव शासकीय मदत देण्यात येईल.- निशांत परमा, सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, वर्धा.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी