शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

हिंगणघाट जळित प्रकरण; रुग्णवाहिका अडवून नागरिकांनी पोलिसांवर केली दगडफेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2020 13:32 IST

Hinganghat Burn Case; हिंगणघाट जळित प्रकरणात मृत्युमुखी पडलेल्या प्राध्यापिकेचा मृतदेह घेऊन येणारी रुग्णवाहिका अडवल्याने पोलिसांनी केलेल्या लाठीहल्ल्याला प्रत्युत्तर देत सोमवारी दुपारी १ च्या सुमारास नागरिकांनीही पोलिसांवर दगडफेक केल्याची घटना घडली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगणघाट: जळित प्रकरणात मृत्युमुखी पडलेल्या प्राध्यापिकेचा मृतदेह घेऊन येणारी रुग्णवाहिका अडवल्याने पोलिसांनी केलेल्या लाठीहल्ल्याला प्रत्युत्तर देत सोमवारी दुपारी १ च्या सुमारास नागरिकांनीही पोलिसांवर दगडफेक केल्याची घटना घडली आहे.

येथे दुपारी पोहचलेल्या रुग्णवाहिकेला अडवून नागरिकांनी आरोपीला शिक्षा करण्याची मागणी लावून धरली. त्यावर पोलिसांनी सदर प्राध्यापिकेवर अंत्यसंस्कार होऊ द्या अशी विनंती नागरिकांना केली. मात्र ती धुडकावून लावत नागरिकांनी रुग्णवाहिका रोखून धरल्याने पोलिसांनी नागरिकांना हटवण्यासाठी सौम्य लाठीहल्ला केला. त्यावर संतप्त होऊन नागरिकांनी पोलिसांवरच दगडफेक सुरू केली. यावेळी रुग्णवाहिकेच्या काचाही फुटल्याचे वृत्त आहे.  आरोपीला कठोर शिक्षा करा, त्याला फाशी द्या, त्यालाच जाळून टाका अशा मागण्या करत संतप्त नागरिकांचा एक समूह सकाळपासूनच राष्ट्रीय महामार्गावर ठिय्या आंदोलन करीत होता. या प्राध्यापिकेचा मृतदेह घेऊन आलेली रुग्णवाहिका त्यांनी काही काळासाठी अडवून धरली. यावेळी बंदोबस्तासाठी आलेल्या पोलिसांनी सौम्य लाठी हल्ला केला. त्याला प्रत्युत्तर म्हणून नागरिकांनी पोलिसांवरच दगडफेक सुरू केल्याच ेवृत्त आहे.हिंगणघाटात आज कडकडीत बंद पाळण्यात आला असून, शाळा, महाविद्यालये, दुकाने सर्व बंद ठेवण्यात आले आहे. दरम्यान या पिडितेवर अंत्यसंस्कार करण्यासाठी मोक्षधाम घाटात तयारी सुरू करण्यात आली आहे.

 

टॅग्स :Hinganghatहिंगणघाट