शहरं
Join us  
Trending Stories
1
अंतरिम दिलासा हवा असेल तर मजबूत युक्तिवाद सादर करा; वक्फ सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
2
'आतापर्यंतचे पेपर चांगले गेले, उद्या गावाकडे येणार...'; गायत्रीने सकाळी केला आईला शेवटचा काॅल..!
3
भारत-पाक संघर्षावेळीही ज्योती ‘आका’च्या संपर्कातच एनआयए, आयबीकडून चौकशीतून निष्पन्न
4
आजचे राशीभविष्य २१ मे २०२५ : अचानक धनलाभ, मित्रांंसाठी खर्च कराल...
5
गावालाच जवानांचा वेढा, ५ जहाल माओवादी ताब्यात; तीन महिलांचा समावेश, ३६ लाख रुपयांचे होते बक्षीस
6
कल्याणमध्ये स्लॅब कोसळून सहा ठार; सहा जखमी; मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाखांचे अर्थसहाय्य
7
आंदोलनाची धार कमी झाल्यानंतर भुजबळांना मिळाली मंत्रिपदाची संधी; धनंजय मुंडेंचे दोर कापले
8
राज्यात पाच वर्षांत ३५ लाख घरे; झोपडपट्टीमुक्त शहरांचा संकल्प 
9
Pune Rains: पुण्यात पावसाचा हैदोस! अनेक ठिकाणी रस्ते पाण्याखाली, घरात शिरले पाणी
10
वैभव सूर्यंवशीनं धरले MS धोनीचे पाय; मग रंगली स्फोटक बॅटरमध्ये दडलेल्या संस्कारी मुलाची चर्चा
11
मुंबईसह उपनगराला पावसाने झोडपले! गोरेगाव, मालाडमध्ये तुफान पाऊस, अंधेरी भुयारी मार्ग बंद
12
RR vs CSK : धोनीसमोर संजू ठरला भारी! विजयासह राजस्थाननं शेवट केला गोड
13
कामात दिरंगाई झाली तर अधिकाऱ्यांवर कारवाई; पालकमंत्री बावनकुळे यांचा इशारा
14
कहानी पुरी फिल्मी है : चिमुकले गाडीत, आई फलाटावर पाणी भरत राहिली अन् ट्रेन मुंबईच्या दिशेने निघाली
15
Kalyan Building Collapses: कल्याण दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांसाठी राज्य सरकारची मोठी घोषणा
16
पाकिस्तानने असीम मुनीरचे केले प्रमोशन, लष्करात फील्ड मार्शल रँक किती महत्त्वाची?
17
गुड न्यूज! नागपूर -बिलासपूर मार्गावरील वंदे भारत एक्सप्रेसला आणखी आठ डब्बे जोडणार
18
IPL 2025 : १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीची 'परिपक्व' खेळी; सिक्सर मारत साजरी केली फिफ्टी!
19
'मीर जाफर vs एक बिर्याणी देशावर भारी'; भाजप-काँग्रेसमध्ये पोस्टर वॉर! का वाढला वाद?
20
आयुष म्हात्रेनं २०० च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या धावा; माफाकानं बेस्ट कॅचसह साधला विकेटचा डाव

चालानच्या गोंडस नावाखाली महामार्ग पोलिसांची वसुली

By admin | Updated: April 25, 2016 01:52 IST

महामार्गावर बॅरिकेट्स लावून रस्ता अडवायचा. ट्रक चालकाला कागदपत्र विचारात कारवाईची धमकी द्यायची.

जाम महामार्गावरील प्रकार : दिवस-रात्र चालतो गोरखधंदासुधीर खडसे  समुद्रपूरमहामार्गावर बॅरिकेट्स लावून रस्ता अडवायचा. ट्रक चालकाला कागदपत्र विचारात कारवाईची धमकी द्यायची. यातूनच चालानच्या नावाखाली वसुली करण्याचा प्रकार नागपूर-कन्याकुमारी या महामार्गावर जाम परिसरात महामार्ग पोलिसांकडून सुरू असल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. दळण वळणाच्या सुविधेकरिता तयार झालेला नागपूर-कन्याकुमारी हा महामार्ग पोलिसांकरिता कमाईचे साधन ठरत आहे. येथे कार्यरत असलेले पोलीस या वाहन चालकांकडून चालानच्या नावाखाली चांगलीच वसुली करीत आहेत. याबाबत महामार्ग पोलिसांना विचारणा केली असता त्यांच्याकडून चालान करण्याचा आम्हाला अधिकार आहे, असे उत्तर दिल्या जाते. मात्र वर्षभरात चालानच्या माध्यमातून किती महसूल गोळा केला, हे सांगण्याकरिता त्यांच्याकडे माहिती उपलब्ध नसल्याचे सांगण्यात येते. यातूनच या मार्गावर पोलिसांचा हा गोरखधंदा सुरू आहे. तो आजचा नसून कित्येक वर्षांपासून सुरू असल्याचे बोलले जात आहे. या महामार्गवरून वाहतुकीदरम्यान नागरिकांना त्रास होणार नाही याची दक्षता घेण्याकरिता येथे राज्य शासनाने महामार्ग पोलीस मदत केंद्राची स्थापना केली. मात्र या केंद्रातून वाहतूक करणाऱ्यांना मदत करण्यापेक्षा त्यांच्याकडून वसुलीच अधिक होत असल्याचे समोर आले आहे. जाम येथील महामार्ग मदत केंद्राच्या पोलिसांकडून सुरू असलेला हा प्रकार बंद करण्याची मागणी या भागात जोर धरत आहे. चालानच्या नावावर करण्यात येत असलेल्या अवैध वसुलीकरिता महामार्ग पोलिसांकडून बॅरिकेटस् लावण्यात येत आहेत. या बॅरिकेटस्मुळे अपघाताची शक्यता बळावत आहे. पोलीस मदत केंद्र गावाबाहेर हलविण्याची मागणी गावात येत असलेल्या या महामार्ग पोलीस मदत केंद्रामुळे अनेक अपघात झाले आहेत. यामुळे सदर केंद्र गावाबाहेर हलवावे, या मागणीचे निवेदनही जाम चौरस्ता येथील नागरिकांनी लोकप्रतिनिधींना दिले; मात्र यावर काहीच कार्यवाही करण्यात आलेली नाही. १३ किमीच्या परिघात वसुलीजाम चौरस्ता ते कानकाटी या १३ कि़मी.च्या परिघात रात्री ११ ते सकाळी ६ वाजेपर्यंत वेगवेगळ्या ठिकाणी वसुली होते. विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या मदत केंद्रावरील अधिकारी व कर्मचाऱ्यांची योग्य चौकशी करून अवैध वसुली बंद करावी अशी मागणी जोर धरत आहे.