लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : देवळी तालुक्याच्या पुलगावं आयुध निर्माण परिसरात २० नाव्हेंबर २०१८ रोजी भीषण बॉम्बस्फोट झाला होता. या घटनेच्या उच्चस्तरीय चौकशी रक्षा मंत्रालयालकडून प्रारंभ झाला असून याकरिता चौकशी समिती गठीत करण्यात आल्याची माहिती केंद्रीय रक्षा राज्यमंत्री सुभाष भामरे यांनी खासदार रामदास तडस यांनी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देतांना दिली. पुलगांव येथे कालबाह्य बॉम्ब निकामी करतांना घडलेल्या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करुन ज्या नागरिकांना आपला जीव गमवावा लागला, त्यांना न्याय मिळावा अशी मागणी खा. तडस यांनी केली होती. कंत्राटदाराने कुठलीही सुरक्षा व उपाययोजना न करता चुकीच्या पद्धतीमुळे हा अपघात घडला. यामुळे गावात भीतीचे वातावरण असल्याने पुन्हा असा प्रकार घडू नये, याकरिता या प्रकरणाची सखोल चौकशी करणे गरजेचे होते. त्यामुळे खा.तडस यांनी संसदेतही प्रश्न उपस्थित करुन सभागृहाचे लक्ष वेधले. आता चौकशीला सुरुवात झाल्याने दोषीवर नक्कीच कठोर कारवाई होईल, असा विश्वासही खा.तडस यांनी व्यक्त केला.
पुलगांव बॉम्बस्फोटाच्या उच्चस्तरीय चौकशीला प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2019 00:25 IST
देवळी तालुक्याच्या पुलगावं आयुध निर्माण परिसरात २० नाव्हेंबर २०१८ रोजी भीषण बॉम्बस्फोट झाला होता. या घटनेच्या उच्चस्तरीय चौकशी रक्षा मंत्रालयालकडून प्रारंभ झाला असून याकरिता चौकशी समिती गठीत करण्यात आल्याची माहिती केंद्रीय रक्षा राज्यमंत्री सुभाष भामरे यांनी खासदार रामदास तडस यांनी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देतांना दिली.
पुलगांव बॉम्बस्फोटाच्या उच्चस्तरीय चौकशीला प्रारंभ
ठळक मुद्देरामदास तडस : संसदेत मांडला प्रश्न