शहरं
Join us  
Trending Stories
1
'हवाई हलकल्लोळ' सुरूच! आधी दिल्ली-लेह फ्लाइट... नंतर हैदराबाद-तिरूपती विमानाचा 'यू टर्न'
2
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
3
Pandharpur Wari 2025: वारकऱ्यांसाठी टोलमाफी! पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांना कसे मिळणार टोलमाफीचे पास?
4
६२ टक्क्यांच्या प्रीमिअमसह लिस्टिंग, नंतर लागलं अपर सर्किट; पहिल्याच दिवशी गुंतणूकदार मालामाल
5
Sonam Raghuvanshi : बनावट मृतदेह, संजय वर्मा...; राजा रघुवंशीच्या हत्येसाठी सोनम आणि राजचं खतरनाक प्लॅनिंग
6
एक पैशाचा खर्च नाही, ‘हा’ उपाय एकदा करून पाहा; स्वामी कायम पाठीशी असतील, अशक्यही शक्य होईल!
7
Israel Rran War: अमेरिका आणि इस्रायलला इराणच्या अयातुल्लाह खामेनींनाच का संपवायचं आहे?
8
मायक्रोसॉफ्टमध्ये पुन्हा नोकरकपात: हजारो कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार! AI खाणार का तुमच्या नोकऱ्या?
9
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, दोघांचा मृत्यू, सात जण जखमी
10
नोबेलच्या शिफारशीबदल्यात लंच! मोठं स्वप्न बघतायत डोनाल्ड ट्रम्प; व्हाइट हाऊसनं आसिम मुनीरला आमंत्रण का दिलं? बिंग फुटलं
11
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इराणनं केली हल्ल्याची तयारी; आता अमेरिकाही युद्धात उतरणार?
12
सब्सक्रिप्शनवर मिळणार Hero ची नवीन EV स्कूटर; पुढील महिन्यात होणार लॉन्च, पाहा फिचर्स...
13
सई ताम्हणकरला 'या' अभिनेत्याशी करायचं होतं लग्न, म्हणाली- "मी आईलाही सांगितलं होतं..."
14
"आधी युक्रेनसोबतचा तुमचा वाद निस्तरा, मग…’’, मध्य पूर्वेची चिंता करणाऱ्या पुतीन ट्रम्प यांचा टोला  
15
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं जोडले 'हे' फायदे, काय परिणाम होणार?
16
इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणले; ११० विद्यार्थ्यांना घेऊन विमान सकाळीच पोहोचले
17
Guru Purnima 2025: २० जूनपासून गुरुपौर्णिमेपर्यंत सलग २१ दिवस करा 'ही' स्वामी उपासना!
18
अनिल अंबानींकडे असलेली सर्वात महागडी वस्तू कोणती? किंमत ऐकून अवाक व्हाल!
19
Israel Iran: इस्रायलचे हल्ले, इराणमध्ये मृत्यूचे तांडव! आतापर्यंत किती लोकांचा झाला मृत्यू? 
20
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप

शिक्षण सेवकांना उच्च न्यायालयाचा दिलासा; सेवा समाप्ती आदेश रद्द

By admin | Updated: February 7, 2016 00:20 IST

नेहरू विद्यालय सालोड येथे कार्यरत शिक्षण सेविकेला सेवा समाप्तीचा आदेश शिक्षणाधिकारी (माध्य.) यांनी दिला होता.

शिक्षणाधिकाऱ्यांना चाप : पातोंड यांनी दाखल केली होती याचिकावर्धा : नेहरू विद्यालय सालोड येथे कार्यरत शिक्षण सेविकेला सेवा समाप्तीचा आदेश शिक्षणाधिकारी (माध्य.) यांनी दिला होता. याविरूद्ध उच्च न्यायालयात दाद मागितली असता सदर आदेश रद्द करण्यात आला. यामुळे शिक्षण सेवकांना दिलासा मिळाला आहे. सोनल पातोंड यांना २० एप्रिल २०१२ रोजी शिक्षण सेविका म्हणून नेहरू विद्यालय सालोड येथे नियुक्ती देण्यात आली. त्यांना शिक्षणाधिकारी (माध्य.) जि.प. वर्धा यांनी २८ जुलै २०१४ रोजी शिक्षण सेवकांची सेवा समाप्त करण्याचे आदेश दिले. नोव्हेंबर २०१४ पासून शिक्षण सेवकाचे वेतनही बंद करण्यात आले. याबाबत सोनल पातोंड यांनी अनेकदा निवेदने दिलीत; पण शिक्षणाधिकाऱ्यांनी कुठलीही दखल घेतली नाही. उलट पातोंड यांना शिक्षण सेविकेचे मानधन मिळणेही बंद झाले. याविरूद्ध त्यांच्यामार्फत अ‍ॅड. संजय घुडे यांनी उच्च न्यायालय मुंंबईच्या नागपूर खंडपीठाकडे रिट याचिका ९७/२०१६ दाखल केली. ८ जानेवारी रोजी न्यायमूर्ती बी.आर. गवई व पी.एन. देशमुख यांच्या खंडपीठापुढे सदर प्रकरण सुनावणीस आले. उच्च न्यायालयाने शिक्षणाधिकारी यांच्या शिक्षण सेवकांच्या सेवा समाप्तीच्या आदेशाला स्थगिती देण्याच्या प्रार्थनेला अंतरीम दिलासा दिला. यामुळे पातोंड यांचे वेतन सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यांना तीन वर्षे पूर्ण झाली असल्याने अतिरिक्त शिक्षण सेविका म्हणून सेवा समाप्त होण्याचे संकटही उद्भवणार नसल्याचे अ‍ॅड. संजय घुडे यांनी स्पष्ट केले.(कार्यालय प्रतिनिधी)निवृत्ती वेतनातून वसूली न करण्याचे आदेशहिंगणघाट पंचायत समितीचे सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक बाबा मानकर हे ३१ मार्र्च १९९९ रोजी सेवानिवृत्त झाले. त्यांना नियमित सेवानिवृत्ती वेतन मिळत होते; पण अचानक गटविकास अधिकारी पं.स. हिंगणघाट यांनी १९ सप्टेंबर २०१५ च्या आदेशान्वये त्यांची तीन हजार रुपये प्रती महिना वसुली सुरू केली. याबाबत अ‍ॅड. संजय घुडे यांनी ३० नोव्हेंबर २०१५ रोजी गटविकास अधिकारी यांना कायदेशीर नोटीस बजावली; पण वसुली सुरूच होती. अखेर उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाकडे रिट याचिका ५३७/१६ दाखल केली. यावर न्यायमूर्ती बी.आर. गवई व न्यायमूर्ती पी.एन. देशमुख यांनी याचिकाकर्ते बाबा मानकर यांच्या सेवानिवृत्ती वेतनातून वसूली न करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प. वर्धा, शिक्षणाधिकारी व गटविकास अधिकारी यांना जारी केले. यामुळे मानकर यांना दिलासा मिळाला.