शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

वर्ध्यातील विद्यार्थ्यांच्या याचिकेने ४५ वैद्यकीय विद्यार्थ्यांना हायकोर्टाचा दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2020 14:20 IST

खासगी मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश घ्याव्या लागणाऱ्या विद्यार्थ्यांकडून खासगी कॉलेजेसने शुल्क वसुलीची सक्ती करू नये, असा अंतरिम आदेश मुंबई उच्च न्यायालय आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला.

ठळक मुद्देशुल्कवसुलीची सक्ती करू नका

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : मराठा आरक्षणामुळे गुणवत्ता यादीत वरच्या क्रमांकावर असतानाही शासकीयऐवजी खासगी मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश घ्याव्या लागणाऱ्या विद्यार्थ्यांकडून खासगी कॉलेजेसने शुल्क वसुलीची सक्ती करू नये, असा अंतरिम आदेश मुंबई उच्च न्यायालय आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला. त्यामुळे राज्यातील ४५ विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला. ही याचिका वर्धा येथील बालरोग तज्ज्ञ डॉ. सचिन पावडे यांचे सुपुत्र आयुष पावडे व इतर १५ विद्यार्थ्यांनी दाखल केली होती.

आयुष पावडे व इतर १५ विद्यार्थ्यांना शासकीय मेडिकल कॉलेजऐवजी नागपुरातील एनकेपी साळवे मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश घ्यावा लागला होता. तर दृष्टी पटेल आणि इतर ३० विद्यार्थ्यांना मुंबईतील खासगी कॉलेजेसमध्ये प्रवेश घ्यावा लागला होता. त्या ३५ विद्यार्थ्यांनी त्या त्या कॉलेजचे एमबीबीएस प्रथम वर्षाचे शुल्क जमा केले होते. दरम्यान, मराठा आरक्षणामुळे ज्यांना शासकीय कॉलेजमध्ये प्रवेश घेता आला नाही, त्यांचे शुल्क परतावा करण्याबाबत राज्य सरकारने अध्यादेश काढला होता. त्या अध्यादेशानुसार या विद्यार्थ्यांनी खासगी कॉलेजेसमध्ये शासकीय मेडिकल कॉलेजइतकेच शुल्क जमा करावे, उर्वरित रक्कम राज्य सरकार कॉलेजेसला देणार होती. मात्र, राज्य सरकारकडून शुल्क परतावा करण्यात न आल्याने संबंधित खासगी कॉलेजेसने विद्यार्थ्यांना आठ ते दहा लाख रुपयांचे शुल्क जमा करण्याची नोटीस बजावली.

त्यामुळे आयुष पावडे यांच्यासह १५ जणांनी नागपूर खंडपीठातील न्या. मनीष पितळे आणि न्या. नितीन सूर्यवंशी यांच्या खंडपीठासमोर तर दृष्टी पटेल व इतर २० विद्यार्थ्यांनी मुंबई उच्च न्यायालयातील न्या. ए.ए. सय्यद आणि न्या. नितीन बोरकर यांच्या खंडपीठासमोर याचिका दाखल केल्या. त्या याचिकांवर सोमवारी सुनावणी झाली.याचिकाकर्त्यांच्या वतीने बाजू मांडताना अ‍ॅड. अश्विन देशपांडे म्हणाले, ज्यांना मराठा आरक्षणामुळे शासकीय कॉलेजऐवजी खासगी कॉलेजमध्ये प्रवेश घ्यावा लागला होता, त्यांच्या शुल्क परताव्याचे ४० कोटी रुपये सरकारने अद्याप मंजूर केलेले नाही. त्यामुळे खासगी कॉलेज शुल्क वसुली करीत आहेत.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयStudentविद्यार्थी