शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगडमध्ये मोठा एन्काऊंटर! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
2
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
3
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
4
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
5
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
6
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
7
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
8
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
9
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
10
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
11
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
12
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
13
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
14
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
15
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
16
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
17
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
18
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
19
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
20
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान

हेमाडपंथी रूद्रेश्वर मंदिरात यात्रा महोत्सवाला प्रारंभ

By admin | Updated: February 21, 2017 01:14 IST

श्री श्रेत्र कोटेश्वर देवस्थान (रोहणी) येथे महाशिवरात्रीनिमित्त यात्रा आहे. कोटेश्वर देवस्थानतर्फे यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम घेण्यात येत आहे.

महाशिवरात्रीचे औचित्य : १५ दिवस चालणार यात्रा कोटेश्वर देवस्थानात महाशिवरात्री यात्राविजयगोपाल - श्री श्रेत्र कोटेश्वर देवस्थान (रोहणी) येथे महाशिवरात्रीनिमित्त यात्रा आहे. कोटेश्वर देवस्थानतर्फे यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम घेण्यात येत आहे. विदर्भातील भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या कोटेश्वर देवस्थानात दरवर्षी यात्रा भरते. परंपरेनुसार यंदाही २४ ते २७ फेबु्रवारीदरम्यान यात्रा महोत्सव आयोजित आहे. या यात्रेत अनेक व्यापारी दुकाने थाटतात. यंदा यात्रेतील आकाश पाळणा, मौत का कुआ हे आकर्षण ठरणार आहे. १४ फेबु्रवारी रोजी सकाळी ११ वाजता ट्रस्टचे सचिव विरेंद्र देशपांडे व अध्यक्ष चंद्रशेखर येरावार यांच्या हस्ते घटस्थापना झाली. २४ रोजी सकाळी ६ ते ७.३० रुद्राभिषेक व पुजा आरती, ११ ते १.३० बालकीर्तनकार भाविका खंडारकर नागपूर यांचे कीर्तन, दुपारी २ ते ५ विष्णू हांडे महाराज व संच हिंगोली यांचे भारुड, ५ वाजता श्री गुरुदेव सेवा मंडळ विजयगोपाल यांची भजनसंध्या आहे. २५ रोजी दुपारी ३ ते ५ संत ज्ञानेश्वरी वारकरी भजनी मंडळ विजयगोपाल यांचे भजन, २६ रोजी दुपारी पद्मावती महिला भजन मंडळ रोहणी यांचे भजन, रात्री सुरेंद्र महाराज मुळे देवळी यांचे कृष्णजन्म कीर्तन तर २७ रोजी दहिहांडी, गोपाल काला, मुळे महाराज यांचे काल्याचे कीर्तन व पालखीची शोभायात्रा निघणार आहे.(वार्ताहर)पोहणा (पिपरी) : येथील प्रसिद्ध हेमाडपंथी रूद्रेश्वर मंदिरात २४ फेब्रुवारीपासून यात्रा महोत्सवास प्रारंभ होत आहे. १५ दिवस चालणाऱ्या या यात्रा महोत्सवामध्ये यात्रेनिमित्त चित्रपटगृहे, मुलांसाठी विविध प्रकारची मनोरंजन केंद्रे, विविध प्रकारच्या वस्तुंची दुकाने याशिवाय इतर दुकानांचे मोठ्या प्रमाणात आगमन झाले आहे.विदर्भात प्रसिद्ध असलेल्या या यात्रेत वर्धा जिल्हा वासीयांव्यतिरिक्त यवतमाळ व चंद्रपूर जिल्ह्यातील भाविक मंडळी मोठ्या प्रमाणात सहभागी होतात. राष्ट्रीय महामार्ग क्र. ७ वर असलेल्या पोहणा येथे हेमाडपंथी शिवमंदिर असून याला रूद्रेश्वर मंदिर म्हणून ओळखले जाते. मंदिरात एकाच दगडातून कोरलेली सव्वा दोन क्विंटल धान्य सामावेल, अशी दुर्मिळ पिंड आहे. अत्यंत कोरीव दगडाचे बांधकाम असलेले ५० फुट उंच, ८० फुट लांब व ३६ फूट रूंद असलेले हे मंदिर १००० ते १२०० वर्षापूर्वी वा त्याहीपूर्वी राष्ट्रकुटकालीन असावे, असे इतिहासतज्ञांचे मत आहे. मंदिराच्या प्रांगणात एक चतुर्मूख मूर्ती आहे. ती ब्रह्मदेवाची आहे. ही मूर्ती राष्ट्रकुटकालीन असून अशी मूर्ती क्वचितच पाहावयास मिळते. महाशिवरात्री यात्रेनिमित्त मंदिर परिसरात श्रीमद् महाशिवपुराण कथा ज्ञानयज्ञ सोहळ्यास रविवारपासून सुरूवात झाली आहे. हभप मयूर महाराज दरणे यांच्या अमृत वाणीने भाविक मंडळी मंत्रमुग्ध होतात. हा सोहळा २७ फेब्रुवारीपर्यंत राहणार आहे. शिवपुराण कथा व भारूड दररोज रात्री ७ ते १० वाजेपर्यंत राहणार आहे.(वार्ताहर)