शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना मदतीचा हात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2018 23:40 IST

स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालयात तालुक्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांना मदतीच्या अनुदानाचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी आत्महत्याग्रस्त १४ शेतकरी कुटुंबीयांना प्रत्येकी पाच हजार रुपये मदतीचे धनादेश वितरित करण्यात आले.

ठळक मुद्देकृषी उत्पन्न बाजार समितीचा उपक्रम : १४ वारसांना दिले प्रत्येकी पाच हजार रुपये

लोकमत न्यूज नेटवर्कआर्वी : स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालयात तालुक्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांना मदतीच्या अनुदानाचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी आत्महत्याग्रस्त १४ शेतकरी कुटुंबीयांना प्रत्येकी पाच हजार रुपये मदतीचे धनादेश वितरित करण्यात आले.कार्यक्रमाला तहसीलदार विजय पवार, पोलीस निरीक्षक चौधरी, सहायक निबंधक सहकारी संस्थाचे प्रतिनिधी ठाकरे, बाजार समितीचे सभापती दिलीप काळे, उपसभापती ज्ञानेश्वर पडोळे व संचालक उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन उमेश घोडखांदे यांनी केले. प्रास्ताविक समितीचे प्रभारी सचिव विनोद कोटेवार यांनी केले. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना श्रद्धांजली देण्याकरिता दोन मिनीट मौन पाळून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. समितीचे सदस्य संदीप काळे, अ.सं. लोहकरे, राजू पावडे, तहसीलदार व ठाणेदार तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष दिलीप काळे यांनी उपस्थित आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारस व उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. घरातील प्रमुख व्यक्तीने आत्महत्या केल्याने मोठे संकट कोसळते. अशा संकटग्रस्त परिवारांना मदतीचा हात देण्याकरिता हा उपक्रम राबविण्यात आला आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या पिकाचा हमीभाव मिळवून देण्याकरिता शासनाने पूर्वतयारी करून गोदामांची पूर्तता करावी वा बाजार समित्यांना गोदाम बांधण्याची परवानगी द्यावी. यामुळे अधिकाधिक शेतकऱ्यांना त्यांच्या पिकाचा योग्य भाव मिळू शकेल, असे सांगितले.याप्रसंगी अतिथी व संचालक यांच्या हस्ते १४ आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाना प्रत्येकी पाच हजार रुपये धनादेशाद्वारे देण्यात आले. अनुदान ही रक्कम ज्योती श्रीधरराव कदम, श्रीकृष्णराव काळकर, सुशीला लोखंडे, वैष्णवी जामखुटे, गोविंद भुसाटे, इंदिरा सोनटक्के, कृष्णा मेश्राम, भावना मानकर, निकहत परवीन परवेज खाँ पठाण, सुलभा बगेकर आदी आत्महत्याग्रस्त शेतकºयांचे वारस उपस्थित होते. २०१७-१८ च्या उन्हाळी परीक्षेत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ नागपूर येथील एमए मराठी या विषयात प्रथम आलेल्या रूपाली महादेव ठाकरे या आर्वी बाजार समिती क्षेत्रातील गुणवंत विद्यार्थिनीच्या पुढील शिक्षणासाठी ५००० रुपये मदत देण्यात आली. आभार लेखापाल चेतन निस्ताने यांनी मानले.

टॅग्स :farmer suicideशेतकरी आत्महत्या