शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये मदत द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2018 22:09 IST

जिल्ह्यात अवकाळी पाऊस तथा गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या गहु, चणा, तूर, फळबाग, कांदा, कपाशी, भाजीपाला आदी पिकांचे मोठे नुकसान झाले. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये मदत द्या, अशी मागणी जिल्हा काँगे्रस कमिटीने केली.

ठळक मुद्देजिल्हा काँग्रेस कमिटीची मागणी : जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

आॅनलाईन लोकमतवर्धा : जिल्ह्यात अवकाळी पाऊस तथा गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या गहु, चणा, तूर, फळबाग, कांदा, कपाशी, भाजीपाला आदी पिकांचे मोठे नुकसान झाले. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये मदत द्या, अशी मागणी जिल्हा काँगे्रस कमिटीने केली. जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना याबाबत निवेदनही देण्यात आले.जिल्ह्यात अवकाळी पाऊस व गारपीटामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले. राज्य शासनाने भरपाईपोटी तुटपुंजी मदत जाहीर केली. ही मदत शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसणारी असून तीन वर्षात शासनाने ज्या-ज्या घोषणा केल्या, त्या सर्व फोल ठरल्या. आजपर्यंत शेतकºयांना मदतच झाली नाही. यामुळे नुकसानग्रस्त शेतकºयांना सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये मदत द्यावी. शेतकºयांच्या विजेचे १०० टक्के बिल माफ करावे, अल्पभूधारक वयोवृद्ध शेतकऱ्यांना मासिक १० हजार रुपये मानधन द्यावे, ठिंबक व तुषार सिंचनाचे रखडलेले अनुदान त्वरित द्यावे, नव्याने १०० टक्के अनुदानावर तुषार व ठिंबक सिंचन योजना लागू करावी, चालू वर्षातील पीक कर्ज माफ करावे, शेतकरी, शेतमजूर कुटुंबातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती द्यावी, आदी मागण्या करण्यात आल्या.निवेदन देताना जिल्हाध्यक्ष सुनील कोल्हे, पांडूरंग देशमुख, मनोज चांदुरकर, मोहन शिदोडकर, संदीप सुटे, धैर्यशिल जगताप, बाबाराव निवल, अमित गावंडे, हरिभाऊ नाखले, अक्षय पाटील, हेडाऊ आदी उपस्थित होते.