शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

हेल्मेट सक्तीच्या संभ्रमात दंडाची ‘लगीनघाई’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2018 22:26 IST

जिल्ह्यात हेल्मेट सक्ती करण्यात आली. यात प्रारंभी ७ मे पर्यंत नागरिकांना हेल्मेटची सवय लागावी याकरिता नोटीस बजावण्यात येणार असल्याचे पोलीस विभागाकडून सांगण्यात आले; मात्र नेहमी वसुलीचे टार्गेट बाळगणाऱ्या वाहतूक पोलिसांकडून यात वसुली होणार नाही तर नवलच.

ठळक मुद्देवाहतूक पोलिसांची दंडेली : नोटीस बजाविण्याच्या नावावर ठोकला जातो दंड

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यात हेल्मेट सक्ती करण्यात आली. यात प्रारंभी ७ मे पर्यंत नागरिकांना हेल्मेटची सवय लागावी याकरिता नोटीस बजावण्यात येणार असल्याचे पोलीस विभागाकडून सांगण्यात आले; मात्र नेहमी वसुलीचे टार्गेट बाळगणाऱ्या वाहतूक पोलिसांकडून यात वसुली होणार नाही तर नवलच. सुमारे १५ दिवस नोटीस बजावण्याचे सांगणाऱ्या वाहतूक पोलिसांकडून या हेल्मेटसक्तीच्या नावावर दंड ठोठावण्याची लगीनघाई झाली असल्याचे दिसत असून अनेकांना दंड ठोठावण्यात आला आहे.वर्धा शहर सुमारे चार किमीच्या परिघात संपणारे एक छोटे शहर आहे. येथे हेल्मेटसक्तीची चर्चा झाली त्या वेळातच सर्व सामान्यांकडून त्याला विरोध झाला. तरीही जिल्हा पोलीस प्रशासनाने ही सक्ती केली. हेल्मेट सक्ती करण्यापुर्वी शहरातील अनियंत्रित वाहतूक नियंत्रित करण्याची मागणी नागरिकांकडून झाली. याकडे मात्र वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष असल्याचे दिसून आले आहे. अशातच झालेली हेल्मेटसक्ती अनेकांना त्रासाची ठरत आहे. यात प्रारंभी नागरिकांना सवय लागावी याकरिता व हेल्मेटचे महत्त्व नागरिकांना पटावे याकरिता त्यांना नोटीस बजावण्यात येणार असल्याचे वाहतूक पोलिसांकडून सांगण्यात आले. यावेळी कोणताही दंड आकारण्यात येणार नसल्याचेही पोलिसांकडून सांगण्यात आले होते.यानुसार शहरातील मोठ मोठ्या चौकात वाहतूक पोलिसांकडून नागरिकांना अडवून त्यांना हेल्मेटबाबत विचारणा करून त्याला नोटीस बजावणे सुरू झाले. कालपर्यंत वाहतूक पोलिसांकडून ४५० नागरिकांना नोटीस बजावल्याचे सांगण्यात आले. या नोटीस बजावण्याची कार्यवाही सुरू असताना काही ठिकाणी वाहतूक पोलिसांकडून दंडात्मक कार्यवाही करण्याचा सपाटा सुरू केला आहे.आदित्य संजय भिसे हा विद्यार्थी परीक्षा असल्याने पिपरी (मेघे) येथील रामकृष्ण बजाज अभियांत्रिकी महाविद्यालयात जात असताना तंत्रनिकेतनजवळ वाहतूक पोलिसांनी अडविले. वाहन चालविण्याचा परवाना नसल्याचा दंड आकारतानाच हेल्मेटसाठी तब्बल १५०० रुपयांचा दंड आकारला. यातील एक हजार रुपये त्याचे वडील संजय भिसे यांनी अदा केले. वास्तविक, पोलिसांनी ७ मे नंतर दंडात्मक कारवाई केली जाईल, असे सांगितले होते; पण कारवाईची लगीनघाई झालेल्या वाहतूक पोलिसांनी २६ एप्रिलपासूनच दंडात्मक कारवाईला प्रारंभ केल्याचे दिसते.नागरिकांना हेल्मेटची सवय लावण्याकरिता असलेली ही सक्ती आता दंडात्मक कारवाईकडे दिलेल्या मुदतीच्या पहिलेच वळत आहे. यामुळे हेल्मेटच्या नावाखाली वाहतूक पोलिसांना हेल्मेट सक्तीच्या नावाखाली काय साधायचे आहे, याचा अंदाज येत आहे.शहरातून बाहेर जाणाऱ्या रस्त्यांवर पोलिसांची गस्तहेल्मेट सक्तीच्या नावावर होत असलेल्या कारवाईकरिता वाहतूक पोलीस केवळ शहरातच नाही तर शहराबाहेर असलेल्या रस्त्यांवरही पोलिसांची गस्त सुरू झाली आहे. शहराबाहेर होत असलेल्या पोलिसांच्या कारवाईबाबत नागरिकांचे समर्थन आहे. पण शहरात होत असलेल्या दंडात्मक कारवाईमुळे मात्र असंतोष पसरत असल्याचे दिसून आले आहे. या संदर्भात पोलीस विभागाच्या अधिकाºयांनी लक्ष देत होत असलेल्या या प्रकारावर आळा घालण्याची मागणी जोर धरत आहे. नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने उचलण्यात आलेल्या या पावलाचा संबंधितांकडून अतिरेक होणार नाही याची वेळीच काळजी घेण्याची गरज आहे. याकडे दुर्लक्ष झाल्यास नागरिकांचा उद्रेक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या दंडात्मक कार्यवाहीवर प्रतिबंधाची मागणी आहे.विद्यार्थ्याला १५०० रुपयांचा दंडपिपरी (मेघे) येथील रामकृष्ण बजाज अभियांत्रिकी महाविद्यालयात जात असताना तंत्रनिकेतनजवळ वाहतूक पोलिसांनी अडविले. वाहन चालविण्याचा परवाना नसल्याचा दंड आकारतानाच हेल्मेटसाठी तब्बल १५०० रुपयांचा दंड आकारला.पिपरी येथील रामकृष्ण बजाज तथा अन्य महाविद्यालयांत स्वत: जाऊन विद्यार्थ्यांना सूचना केल्या होत्या. यावरून बहुतांश विद्यार्थी हेल्मेट घालूनच दुचाकी चालविताना आढळले; पण आदित्यने परवाना नसतानाही हेल्मेटचा वापर केला नाही. यामुळे त्याला स्वत: दंड केला.- दत्तात्रय गुरव, सहायक पोलीस निरीक्षक, वाहतूक नियंत्रक शाखा, वर्धा.

टॅग्स :traffic policeवाहतूक पोलीस